Get it on Google Play
Download on the App Store

प्रयत्न

रोज रोज चा हा दुरावा सोसताना पिल्लू तू रोज नव्याने मरतेस ना?
तुझ्या आयुष्याचं भलं काय किव्हा बुरं काय मला भाग धरतेस ना?

कधीतरी वाटतं सगळं सगळं सोडून तुझ्या मिठीत यावं,
आणि आपल्या ह्या नात्याला हक्काचं नाव द्यावं,

तुझी माझ्यावर असलेली प्रेमाची सावली जगण्यासाठी नवीन हुरूप देते,
आणि रोज झोपताना तुझी आठवण आली कि आपणच जवळ असलेली उशी मग तुझं रूप घेते,

पण उशीला तू समजून कुशीत घेतली तर तुझा फील कसा येणार,
माझा चिकू, असं म्हणून उशी थोडीच मला तिचा कुशीत घेणार?

पिल्लू तुझ्या सारखच रोज नव्याने मी पण मरत आहे,
फक्त तिकडे तुझा हसरा चेहरा बघून जगण्याचा प्रयत्न करत आहे

---- शारनिक

कविता संग्रह

शारनिक
Chapters
प्रयत्न प्रयत्न