रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ ठाकूर ज्यांना “गुरुदेव” असेही म्हणतात. हे एक ब्राम्होपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, कवी, संगीतकार होते. कलकात्त्याच्या पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व संगीतात बरेच बदल घडून आले. रवींद्रनाथ हे भारतीय वंशाचे व आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते होते. बंगाली साहित्य हे रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अश्या भागात विभागले जाते. यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव व त्यांच्या साहित्याची व्याप्ती लक्षात येते. शांतीनिकेतन उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जण-गण-मन- व आमार सोनार बा ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला हप्ता. तो आजही यशस्वी आहे असे दिसते. बंगालच्या सांकृतिक आणि साहित्यिक समृद्धीत रवींद्रनाथ टागोर याचा मोलाचा वाट आहे.