Get it on Google Play
Download on the App Store

ती चार वर्षे

५ मे २०१७ रोजी मोहम्मद आयेशा या खालाश्याने एम.वी. अमन हे “शापित जहाज” चढले होते.  

आत्ताच चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तब्बल चार वर्ष इजिप्तदेशाच्या जवळ किनाऱ्यालगतच्या जहाजावर अडकलेला मोहम्मद आपल्या मायदेशी सिरीयाला पोहोचला होता. त्याला पोहोचवला होता. त्याला तिथे कुणीतरी विचारले,

“मोहम्मद आता तुला कसे वाटते?”.

कैरो एअरपोर्टवर असताना त्याने या प्रश्नाला दिलेले उत्तर जितके लहान तितके गहन होते. त्याचे उत्तर होते

“सुटका, आनंद.”

त्यानंतर त्याचा वॉईस मेसेज आला,

“मला कसं वाटतंय? मला असे वाटतंय सरतेशेवटी जणू मी एखाद्या तुरुंगातून बाहेर पडलो आहे. मी आता माझ्या परिवाराला भेटू शकेन. मी आता त्यांना बघू शकेन. मला अपेक्षाही नसताना घडलेला चमत्कार आहे.”

या सगळ्या प्रकारचा भुर्दंड मोहम्मदला भरावा लागला होता. मोहम्मदच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला दिसत होता. हा घडलेला प्रकार म्हणजे त्याला शापित जीवन मिळाल्यासारखे होते. असे जीवन ज्यात स्वच्छता, वीज आणि कुणाचीही साथ नव्हती.

ही सगळी कथा खरतर जुलै २०१७ मध्ये चालू झाली. एम.वी. अमन मालवाहू जहाज जेव्हा इजिप्तच्या अद्बियाच्या बंदरात ताब्यात घेण्यात आले होते. हे मालवाहू जहाज अद्बियाच्या बंदरात ताब्यात घेण्यात आले होते कारण, त्यातली सुरक्षा उपकरणे आणि त्या उपकरणाची वर्गवारी किंव्हा प्रतवारी करणारी कागदपत्रे याची मुभा संपली होती. खरतर हा पेच सोडवणं फारच सोप्पं होते परंतु, त्या मालवाहू जहाजाच्या लेबनीज कॉन्ट्रॅक्टरने इंधनासाठी पैसे दिलेच नाहीत शिवाय एम.वी. अमनच्या मालकाला आर्थिक नुकसान झाले होते. अश्या परिस्थितीत त्या जहाजाचा इजिप्तशियन कप्तान किनारपट्टीवर थांबला. ह्या मालवाहू जहाजाची संपूर्ण जबाबदारी इजिप्तच्या कोर्टाने मोहम्मदवर सोपवली. तो आता त्या जहाजाचा सर्वेसर्वा झाला होता. एम.वी. अमनचा कायदेशीर पालक. चीफ ऑफिसर मोहम्मद आयशा.

मोहम्मद सिरीयातल्या भूमध्य बंदराजवळ जन्माला होता. त्याला इजिप्तची भाषा ज्ञात नव्हती. त्याला इजिप्त कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अर्थ कळला नाही. त्याला कुणी सांगितले नाही, शेवटी जेंव्हा जहाजावरचे खलाशी आणि इतर कर्मचारी जहाज सोडून निघून जाऊ लागले तेव्हा त्याला कोर्टाच्या निर्देशाचा खरा अर्थ उमगला.

ती भयाण चार वर्षे मृत्यू आणि जीवन मोहम्मदने फार जवळून पहिले होते. त्याने जवळच्या सुएझ कालव्यातुम अनेक जहाजांची वाहतूक आणि दळणवळण होताना पाहिले होते. त्याचे रिकामपण खायला उठलेले. आत्ता काही दिवसांपूर्वी मालवाहू एव्हरगीवन जहाज अडकले होते त्यामुळे, सुएझ कालव्यात रहदारी ठप्प झाली होती. त्यावेळी तिथे बरीच इतर मालवाहू जहाजे अडकली होती. मोहम्मदने वेळ घालवण्याचे साधन म्हणून ती जहाजे मोजली होती.

मोह्म्मद बरोबर त्याच जहाजावर काम करणाऱ्या त्याच्या भावाला मोहम्मदने बऱ्याचदा तिथून दुसऱ्या जहाजाने ये-जा करताना पहिले होते. त्याचे त्या भावाशी फोनवर बोलणेही झाले होते. त्याचा भाऊ खूप  लांब होता.

“सुएझ कालवयाची रहदारी ठप्प करण्यासाठी मलाच दोष देण्यात आला.''

मोहम्मदचे त्याच्या आईवर अधिकच प्रेम होते. तिनेच त्याला अस्खलित इंग्रजी बोलायला शिकवले होते. ती त्याची गुरु होती. ऑगस्ट २०१८ मध्ये त्याची आई वारल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचली. ही वेळ त्याच्या आयुष्यातली सगळ्यात निराशाजनक होती. त्यावेळी खरच त्याला आपला जीव द्यावासा वाटला. त्याला आईच्या शेवटच्या क्षणी भेटता आले नाही याचे दुखः सलत राहिले.

२०१९ च्या ऑगस्ट पर्यंत मोहम्मद एकटाच त्या डिझेल नसलेल्या बंद कोठडीत अडकला होता आणि परिणामी वीज नव्हती. परंतु अधूनमधून तोच या जहाजाचा गार्ड व्हायचा.

मोहम्मद कायदेशीररीत्या ते जहाज सोडून जाऊ शकत नव्हता. त्याला तेथेच राहावे लागणार होते. साधारणतः खालाष्याला अश्या परिस्थितीची सवय असते परंतु तेव्हा त्याला पगार मिळत असतो. तो या जहाजावर बिनामोबदला, बिनापगार राहण्यासाठी बांधील होता. त्याच्या मुलाखतीच्यावेळी एका पत्रकाराला सांगितले.

“रात्रीच्या वेळी जहाज थडग्यासारखे भासत होते. तुम्ही काही बघू शकत नाही. तुम्हाला काहीही ऐकू येत नाही. जणू तुम्ही खूप मोठ्या ,प्रशस्थ पण शवपेटीत आहात.”

मार्च २०२० मध्ये आलेल्या वादळाने या अमन जहाजाचा नांगर हलवून, आठ किलोमीटर लांब भिरकावले गेले होते. ते जिथे उभे होते तिथून लांब गेले असले तरी, अगदी शंभर एक मीटरच्या अंतरावर किनाऱ्यालगत पोहोचले होते. ह्या वादळाचा अनुभव भयांक वेगळाच होता. मोहम्मदने याला एक संधी म्हणून पहिले कदाचित हा देवाचा कौल असेल असे त्याला वाटले. आता हे शंभर एक मित्रचे अंतर तो पोहून पार करू शकणार होता. तो मधूनमधून किनाऱ्यावर जायचा थोडेसे जेवण खरेदी करायचा. आपला मोबाईल रिचार्ज करायचा. मोहम्मदची कथा जशी आश्चर्यकारक आहे, तसा त्याचा अनुभव अतिशय सामान्य आहे. खलाश्यांची अश्या प्रकारची हेळसांड होणे हे फारच वाढत चालले आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात २५० हून अधिक सक्रिय खटले आहेत ज्यात खलाश्यांना जहाजाबरोबर बेवारस सोडण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की २०२० मध्ये नवे ८५ खटले दाखल करण्यात आले आहेत. हा आकडा मागील वर्षापेक्षा दुप्पट आहे.

दरम्यान, असलुयेह या इराणी बंदरात, जुलै २०१९ मध्ये मालकाने त्याचे मालवाहू जहाज “उला” दुर्लक्षित केले. त्यात १९ भारतीय जहाजावरील खलाशी आहेत. ते उपोषणावर बसले आहेत. क्रूच्या एका सदस्याने नुकतेच शिपिंग जर्नल लॉईडच्या पत्रकाराला सांगितले की जहाजावरील परिस्थिती "अत्यंत गंभीर", औदासिन्य आहे शिवाय खलाश्यांच्या कुटुंबांकडे पैसेही नाहीत. मिशन टू सीफेअर्सचे मिडल इस्ट आणि दक्षिण आशियाचे संचालक अ‍ॅन्डी बोव्हरमन म्हणाले,

"या प्रकरणांपैकी पहिल्यांदा जेव्हा मला या प्रकरण कळले तेव्हा मला धक्काच बसला."

दुबईतील त्याच्या ठिकाणावरून, वारंवार या घडणार्‍या विदारक घटनांचा पाठपुरावा करताना त्यांना असे जाणवले कि, या जहाजांच्या मालकांचे एकच रडगाणे असते.

“आम्ही सध्या येथे एका खटल्याचे काम करत आहोत, कंपनीकडे जहाजांवर प्रचंड तारण आहे, परंतु त्यांचे कर्ज त्या पलीकडे गेले आहे. म्हणून कधीकधी क्रूला जहाजाच नांगर टाकण्यास सांगणे सोपे जाते. शब्दशः तेथून निघून जाणे सांगणे सोपे होते. जहाजाला परत मिळवण्यासाठी त्याच्या कर्जाच्या किमतीपेक्षा खर्च जास्त येणार असतो.”

टायलोस शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस या एम.वी.अमन मालवाहू जहाजाच्या मालकांनी बी.बी.सी.ला सांगितले की, त्यांनी मोहम्मदला मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हात कायद्याने बांधलेले होते.

“मी इजिप्तशियन कोर्टातील न्यायाधीशांना कायदेशीर ताबा काढून टाकण्यास भाग पाडू शकत नाही,” त्या कंपनीच्या प्रतिनिधीने आम्हाला सांगितले.

"त्याला पुनर्स्थित करणारी व्यक्ती मी या ग्रहावर तरी शोधू शकलो नाही आणि मी प्रयत्न केला आहे." त्यांनी जरा उपहासानेच सांगितले.

ते म्हणाले “मोहम्मदने नोकरी पकडताना प्रथमतः या करारपत्रांवर मंजुरी द्यायलाच नको होती.”

डिसेंबरमध्ये मोहम्मदचा खटला लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिवहन कामगार महासंघाचे मोहम्मद अरचेडी म्हणाले की,  

“जहाज वाहतूक उद्योगातील प्रत्येकाच्या हे क्षण लक्षात असावेत.”

"जहाजावरील समुद्री प्रवास करणाऱ्या खलाश्यांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखण्यासाठी मोहम्मदच्या प्रकरणात गंभीर चर्चा सुरू झाली आहे." ते म्हणाले,

“या चर्चेत जहाज मालक, बंदर आणि सागरी अधिकारी आणि जिथे जहाज उभे आहे ते राज्य समाविष्ट करावे.”

"जहाजावरील जबाबदारी असणार्‍या मालकांनी आणि पक्षांनी आधी त्या खालाश्यांची जबाबदारी स्वीकारली असती आणि त्यांनी परत जाण्याची व्यवस्था केली असती तर, मोहम्मद आयशाचे हे मानसिक आणि शारीरिक हाल टाळता आले असते."

त्याच्या दृष्टीने, मोहम्मद म्हणाला की, तो स्वत ओढवून न घेतलेल्या अशा परिस्थितीत पुरता अडकल्यासारखे वाटले. इजिप्शियन कायद्यानुसार संकटात पाडले आणि जहाजाच्या मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला की “ अनेक महिने कुणाशीही संभाषण  करता गेले. त्याला त्या काळात खूप निराशाजनक आणि एकांततेची भावना सोडून दुसरे काही विचार मनात आलेच नाहीत. आपण समुद्राकडे परत जाण्याबद्दल साशंक आहोत असे सांगताना तो म्हणाला, “ मी परत असे काही मिशन घेताना दोनदा विचार करेन असे वाटते.”

मोहम्मद आयशाचे शापित जहाज

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
ती चार वर्षे