Get it on Google Play
Download on the App Store

'म'मराठीचा...!!

"म" मराठीचा "म" मातृभाषेचा "म" राजभाषेचा कुसुमाग्रजांचा जन्मदिन, "मराठी राजभाषा दिन" २७ फेब्रुवारी म्हणून साजरा केला जातो.जिथे आपला जन्म झाला ती धरणी जिच्यासवे आपण पहिली धुळाक्षरे गिरवली ती आपली मातृभाषा "मराठी" हिचे स्थान आपल्या मनात आई सारखेच असे मानले तर मग आई म्हणजे आधार प्रेम मर्यादा या सगळ्याबाबतीत जे लागू पडेल तेच या मराठी मायबोलीलाही लागू पडेल.

मग ही मातृभाषा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमे पुस्तके जी आपली साथ कधीच सोडणं नाहीत असे म्हणतात. ज्यांच्याकडे विचार आहेत पुस्तके आहेत ते कधीच एकटे पडत नाहीत अशा या माध्यमातून पुस्तकरूपाने मराठीची पाऊले पुढेपुढे पडत गेली आणि अक्षरांच्या त्या शब्दांनी हातात हात धरत पुस्तकांच्या नगरीत आपल्या मराठीला अभिमानाने मिरवले खरे, मातृभाषा मनाची भाषा वाणीतून जरी असंख्य भाषांचे फवारे उडाले तरी विचार आपण प्रथम आपल्या मातृभाषेतूनच करणार मग मराठीची आस कास धरून ठेवणे अभिप्रेत फक्त तोंडीलावण्यापूरते मराठी न बोलता. प्रामुख्याने मराठी अनिवार्याच करायला हवी आपणच आपल्या स्वतःसाठी एक दैनंदिन नियम वैखरीतून उधळावी पुष्पे मराठीची असे म्हणूयात.

१९२५ मध्ये दत्तो वामन पोतदारांनी मराठी बांधवांसाठी मराठी एक कार्यक्रम म्हणूनच आचरणात आणावी असे सांगितले.जसे रोजचे दैनंदिन व्यवहार आपण पाळतो तसेच आपल्या या मातृभाषेचा प्रसार प्रचार एक मराठी बांधव म्हणून केला जावा.  मग त्यात एकतरी मराठी वर्तमानपत्र असावे, एक पुस्तक महिन्यातून वाचण्याचा मी प्रयत्न करेन, माझे सगळे व्यवहार मी मराठीतूनच करेन असे स्वतःला नियम लावून घेतले ते मराठीचा प्रसार आप्तेष्टांतही होईलच अन मराठी भाषेला बळकटी आणता येईल.

"मराठी असे आमुची मायबोली" मराठी किती समृद्ध, मराठी भाषेमुळेच उत्तमोत्तम लेखक, अभिनेते घडवले त्यांच्या भूमिका गाजल्या त्या त्यांच्यातील कलागुणांमुळे पण मराठी भाषेच्या साथीने अनेक भूमिका गाजल्या, नाट्यवल्यांनीही समृद्ध काळ पहिल्या "श्वास" या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले. यावरूनच मराठी भाषा किती सुंदर समृद्ध हे लक्षात येते तर सध्या नुकतेच परत रंगभूमीवर आलेले "हॅम्लेट" चा उल्लेख करावा लागेल. उत्तम अभिनय, शब्दफेक यामुळे त्या पात्राची ओळख जास्त पटकन होते.अशाच प्रकारचे पुन्हा चांगल्या पुस्तकांनी ही कसे पुर्नज्जीवीत करता येईल व लोकांपर्यंत हा साठवणीचा ठेवा आठवणीच्या रूपाने पोहोचवता येईल तर सर्वात तरुणांचा देश भारत म्हणतात त्यांची मूल्ये खोलवर रुजली गेली आहेत हे पुन्हा एकदा दाखवून नवीन संदर्भात तरुणांना प्रेरणादायी ठरतील ह्या मराठी भाषेचा अस्सल मराठमोळ्या सौंदर्यामुळे.

मराठी भाषेच खर लावण्य तिच्या शालिनतेत कसे आहे तिचे सौंदर्य खुलवण्याचा कविता पुन्हा एकदा पुर्नज्जीवित करायला हव्यात. पण डोळसवृत्तीने लक्ष दिले तरच चांगल्या विषयावरील पुस्तकांना नवीन विषयांचा संदर्भ देवून पुर्ननिर्मित केले तर मराठीची खरी "अस्मिता" मराठी भाषेला बळकटी आणून टिकवता येईल, पर्यायाने महाराष्ट्राला बळकटी येईल. कारण सक्षम विचारांची मनाची भाषा आपुली मातृभाषा मराठी असेल तर सहभागी मनांचा ओघ आपल्या महाराष्ट्र बळकटी करणात वाढून चित्र बदलेल.

एक राजभाषा म्हणून मान्यता नसली तरी ती ऐश्वर्य संपन्न आपली माऊली आहे. हे कधीही न बदलणारे सत्य भाषेला पर्याय असले तरी मातृभाषेचे स्थान मराठी चे आढळपद कधीच काढून घेणार नाही कारण कितीही शब्दांच्या फेकी आपण  पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना केल्या तरी मनाचा संस्कार चिरंतनच टिकणारा आपली मूल्ये कधीही विसरायला न लावणाराच असतो.

मराठी मातृभाषा नव्हे मुग्धभाषा  ठरेल, सर्वतोपरी रसाळ भाषा मराठी भाषा, थोडपण चांगलं अस याआपल्या मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे.तिला पुस्तकांच्या कोंदणात सजवून तिचा प्रसार करायला हवा त्यासाठी आपण मराठी बांधवांनी पाऊल उचलायला हवे का?

"मराठी असे आमुचि मायबोली
तिचे पुत्र आम्ही तिचे पांगफेडू"

©- मधुरा धायगुडे