गावाकडची पहाट
गावाकडची पहाट होते कोंबड्याच्या गजरात
फेकून चादर माय जाते शेणाला गोठ्यात
सळ्याची रिमझिम करते संपूर्ण अंगणात
बापाची पहाट जाते जनावरांना चारा-पाणी शेन-कोरात
आकाशवाणीचा आवाज येतो एखाद्या घरात
गाण्याचा ओरड होतो दारो दारात
खेळाला पोर जमतात गावाच्या मधात
लोकांच्या गोष्टी रंगतात चौका चौकात
भुयारा सारखा गाव दिसतो चुलीच्या धुरात
चहासाठी दूध काढते मातीच्या कपात
चटणी भाकरी शिजते गरम गरम ताव्यात
चुलीवर पाणी तपते अंघोळीच्या भांड्यात
वृद्धांची सकाळ जाते संताच्या आचरणात
राम राम ठोकतात चार चौघात
बंडीला माखत बैलाला कसत
जेवन खावन करुन निघते बाप वावरात
- सचिन टोंगे