महिला दिवस लेख
शरीर ते शरीर.... स्त्रीचं.. किंवा पुरुषाचं....
उन्नतीचा मार्ग असा... जो घालतो सांगड दोघांच्या समाधानाचं...
त्याच्या उन्न्त्तीमागे... ती असतेच तत्पर हात पुढे करून....
प्रगतीच्या या वळणाच्या रेषेत... दोघही चालतात.. एकमेकांची साथ धरून...
आई, बहिण, पत्नी, मैत्रीण... आपलं मानते या सगळ्या जगाला...
बाबा, भाऊ, पती, मित्र... त्यांच्या जगात सामावून घेतो... तिच्या या जगाला...
महिला दिवस... असो.. वा पुरुष दिवस.. असो...
दोघांच्या साथीने... विचाराने तो प्रखर बनत राहतो...
श्रेष्ठ स्त्रीही आहे... आणि पुरुषही.. एकमेकांच्या श्रेष्ठत्वला सन्मान देणारी...
आज या प्रगतीच्या मार्गावर.. दोघांचे महत्त्व एकमेकांसाठी जपणारी...
आज जरी असला तिचा दिवस... तिच्या स्वाभिमानाचा... तिच्या प्रगतीच्या मार्गाचा...
मात्र, हा दिवस देखील आहे त्या पुरुषाचा जो सन्मान करतो... स्त्रीच्या अस्तित्वाचा...
आज बोलूया... या स्त्रीवर... तिच्या जीवनाच्या कामगिरीवर...
पण नक्कीच जोड आहे... पुरुषाची... सोबतीची... त्या स्त्रीच्या वळणावर...
माझा असं लिहिण्याचा हेतू हाच, कि आपण महिला दिनी स्त्रीचं महत्त्व सांगतो, आणि पुरुष दिनी पुरुषाचं. पण खरं तर, दोघांच्या समानतेने या समाजाची प्रगती होणार आहे. शरीर जरी वेगळे असले, लिंग वेगळे असले, मात्र... या प्रगतीच्या आणि जीवन जगणे अस्तित्वाच्या वळणात, शेवटी एक माणूसच आहे. मग ती स्त्री असो.. वा पुरुष... म्हणून, या महिला दिनी स्त्रीचं श्रेष्ठत्त्व तर अफाट आहेचच... जसे पुरुषाच्या प्रगतीमागे आपण स्त्री असते असं बोलतो, तस आता स्त्रीच्या प्रगतीमागे देखील, पुरुष असतात... त्यांचा आशीर्वाद, त्यांची साथ, आणि स्त्रीला स्वाभिमानी आणि प्रगतशील बनवण्याची एक वाटचाल...
म्हणून पुरुष दिन, आणि महिला दिन... असला, तरी तो एक दोघांचा दिवस... हा माणूस दिन बनून जातो... आणि त्यांच्या( स्त्रीच्या आणि पुरुषाच्या) प्रगतीच्या मार्गाच महत्त्व सांगून जातो...
आपण म्हणतो आधी पुरुषप्रधान संस्कृती होती, आजही आहे खूप ठिकाणी. त्या काळातील स्त्री आणि आजच्या काळातील, खूप तफावत आहे. पण यामागे कुठेतरी, पुरुषाच्या सहकार्याचा देखील हात आहे. हा थोडा विरोधही सही, पण.. स्त्री जागी झाली... आणि स्वत:च्या अस्तित्वाची ती प्रगती बनली. काळ बदलला, आताची संस्कृती, ना पुरुषप्रधान... न स्त्रीप्रधान... ती एक मनुष्याप्रधान बनवायची आहे, आणि एक समानतेची बनत आहे... हा विचार जर सगळीकडे रुजला... तर नक्कीच, कधी असमानता जाणवणार नाही...
It's Women's Day.... महिला दिन...
स्त्री आणि पुरुष मुळीच वेगळी नाहीत....दोघांची श्रेष्ठता दोघांमुळे आहे....
बरोबर ना ?
योगेश्वरी