वाट खुल्या आसमंताची
त्याच्या चाहुलेने उल्हास मन, झालंय आज उदास,
त्याच्या स्वागताच्या जल्लोषात, केला त्याने घात!
द्वेषाच्या पावसाने भरली ओंजळ, वाहून गेले प्रेम खळखळ!
माणुसकी झरली त्यातली, होती जी सुंदर रचना ईश्वराची,
आता वाट मी पाहतेय खुल्या आसमंताची, अन् गल्लीतल्या गोंगाटाची!
डावपेच आयुष्याचे सुरु असे झाले, हिरवे गाव पाषाण होताना पाहिले,
मृत्यूच्या चक्रविव्हात अंकगणित हतबल झाले,
जिवलगांच्या जाण्याने जीवनभऱ्याचे सोसवणे आले!
कधी दिली संक्रमनाने मात, तर कधी सीमेवरच्या शत्रूने,
अरे ! कमी होते का हे घाव? जो जन्म घेतला या नराधमाने,
लावले चिरडून इवल्याश्या त्या फुलांना,
नर नवे तो विदुषकच, राक्षसांच्या मायभूमीचा!
पैश्याची किंमत झाली मधाहून गोड, विकून हे हृदय,
न्यायाच्या रक्षकांनी घेतले डोंगर मोहाचे!
सांग ना देवा, थट्टा झाली का पुरे आता?
करना रे आमची मुक्तता!
लागलीय हुरहूर मनास माझ्या, येईल कधी ते वर्ष नवे!
वाट उरली आता ती खुल्या आसमंताची, अन् गल्लीतल्या गोंगाटाची!