Get it on Google Play
Download on the App Store

बोजा

नेवरा रस्त्यानं चालू लागला म्हणजे डाव्या पायावर अधिक भार टाकतो. त्यामुळं या अंगाची काठी सारखी झोले घेत असते. मोहरमचे ' साहेब' असेच घेतात. या सारखेपणामुळं गांवांतले लोक नेवराला 'नाल्या नेवरा' म्हणून लिखतात. अंगांत एक मळका गंजिफरास, खाली आंखुड धोतर आणि र पांढरी टोपी घालून नेवरा गावांतून हिंडताना नजरेस पडतो. फारसा पिकाची उसाभर करीत तो रानातच असतो. पण त्याचं घर गांवांत हे. जातीचा कुणबी असूनहि नेवराच्या आईला लोक बजा वाणीण म्हणतात. म्हातारी भाल्यासारखी उंच आहे, पण म्हातारपणामुळं विळ्यासारखी वाकली ६. आपल्या घरांत एवढीशी खोली काढून तिनं त्यांत किराणा मालाचं दुकान लं आहे. धडा दोन धडे गूळ, मणपायली तेल, शेरमापटं शेंगदाणे असा आताचा माल तिच्या दुकानात असतो. कपाळाला बुक्का लावून आणि गळ्यात घालून ही म्हातारी गुळगुळीत पाटावर बसते आणि रुपयामागं आठ आणे दा हिकमतीनं उठवते. पैसा दोन पैसे उधारी राहिली तरी दुसऱ्याच्या दारात धरून बसते आणि वसुली होईतों तोड वाजवते. आपल्या मिळकतींतला साबडा छदामहि ती पोराला देत नाही. ओढायला तंबाखू पाहिजे असली नेकाला म्हातारीपाशी पैसे मोजावे लागतात. म्हातारी दुकानाचा माल ण्यासाठी मात्र पोराकडून पैसे घेते. महिन्याला मोटारीतून पंढरीची वारी उंची धडुती फाडते आणि जिवाला गोडधड करून खाते. विराची बायकोहि मोठी हारदमख्याली आहे. बजाची ही सून दांतवण । दांत काळेभोर करते. अफूची गोळी घालून पोराला पाळण्यात टाकते ' गटाळण्या घालीत गांवभर फिरते. लोक म्हणतात, नेवरानं एकवार ला चांगलं लाथलावं. पण नेवराच्या हातून ही गोष्ट होण्यासारखी नव्हती. .

एकतर तो स्वतः स्वभावानं मवाळ होता. वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारा होता. आणि दुसरं असं की बायकोवर हात टाकला तर ती तो निमूटपणे सोसेल असा भरंवसा नव्हता. उलट तिनच चार तडाखे दिले तर केवढी नामुष्कीली ! याचा दाखला त्याला स्वतःला नाही तरी म्हातारीला अनेकवार आला होता. सुनेवर तोंड टाकायला गेल्यावर तिनं सासूचे दोन्ही हात धरून तिच्या खोल गालफडावर चार ठेवून दिल्या होत्या. बजावलं होतं की, " याद धर थेरडे, पुन्हा माज नाव काढशील तर पाय मोडून टाकीन !" बजा अशी गप बसणारी बाई नव्हती. तिने तोडावर हात घेऊन सार गाव जमा केलं. तक्रार घातली. पण लोकांना दोघी जणीहि कोणत्या गुणाच्या तें ठाऊक होतं. 'कुत्ता जाने और चमडा जाने' म्हणून सगळ्यानीं काही मनावरच घेतलं नाही. मग चिडलेल्या म्हातारीनं सुनेला इख घातल. देव घातले. 'करणी' केली. पण सून सगळ्यातून सुटली. ती म्हातारीचा बाप होऊन राहिली होती! आणि या सगळ्या महारगोधळात बिचारा नेवरा मुटीत जीव धरून दिवस ढकलीत होता. दिवसेंदिवस खंगत चालला होता. नेवरा बाइ- लीच्या आरी पडलाय म्हणून लोक हिणवीत, म्हणून फारसा गावातहि येत नव्हता. कर्जाचा बोजा फार झाल्यामुळं तो अगदीं मेटाकुटीला आला होता, डबघाईला आला होता. शेतीभाती, गुरढोरं असतांना नेवराला बोजा झाला ? आई आणि बायको याच्या काईलीमुळ. म्हातारी माल आणून उधारी नेवराच्या नावावर माडायला शहरांतल्या वाण्याला सागायची. पंढरीला निघाली म्हणजे वाटखर्चीसाठी पाचपंचवीस रुपये दुसऱ्याचे काढून तिला द्यावे लागा- यचे. बायको गावच्या सोनाराकडून कडीतोडे ठोकून घ्यायची. त्या दोघी सामवा- सुना बामणाच्या माणसावाणी झ्याकींत रहायच्या. तीस तीस रुपयाची लुगडी फाडायच्या. दिवसात्न दहा वेळा कडक चहा प्यायच्या. या खर्चाच्या वागण्याला नेवरा कसा पुरा पडणार ? बोजा फार झाला. नेवराला अन्न गोड लागेना ! एकदा त्याची गणा चलपत्याशी मुलाखत झाली. नव्या बाधलेल्या घराच्या पायरीवर शिग्रेट ओढत गणा बसला होता. माणूस मोठा हुशार होता. जिंदगी- तले बरेच दिवस मुशाफिरी करीत तो शहरगांव हिंडला होता. त्याच्यापाशी बक्कळ पैसा आहे अशी बोलवा गांवात होती. त्याचे केस इंग्रजी पद्धतीनं कापलेले असत. एक दिवस आडे तो गुळगुळीत दाढी करी. आणि साबण लावून धुतलेला कफकॉलरचा शर्ट घाली. रेडिओ, ग्रामोफोन, पारशी आणि युरोपियन् लोकाच्या चालीरीती, रेल्वे आणि मुंबई याविषयींची त्याची माहिती आश्चर्यकारक होती. वाऱ्यानं न विझणारा दिवा, कळीची चकमक आणि साय- कल असल्या अपूर्वाईच्या वस्तू त्याच्या मालकीच्या होत्या. खरोखर गणा मोठा माणूस होता. त्याची बायकोसुद्धा कागद वाचूं शकत होती.

अंगाच्या काठीला झोले देत नेवरा चालला असतांना गणानं त्याला बघितला आणि त्याला हांक देऊन बोलावलं. म्हटलं, "ये की. शिग्रेट ओढ." गणासारख्या किंमतवान माणसानं बोलावून पांढरी विडी ओढायला देणं ही गोष्ट खचित अभिमानाची होती. नेवरा बसला आणि आरामात धूर गिळू लागला. मग गणानं गोष्ट काढली, " नावोनाव वाळू लागलास नेवरा. शीक हायेस काय ? " चालायचच ! परपंच्याच्या काळजीनं माणूस खाली येतो !" तुला परपंच्याची काळजी का ? बक्कळ कुणबावा हाय, म्हातारी शापवर पैसा कमवतीय-" " दिसायला दिसतंय हे गणा, पर मी चौ अंगानं खाली आलोय !" यावर गणा शहरगावातल्या माणसासारखा हसला. बोलला, मला नको बनवूस !" " " अन्नाच्यान् खोटं न्हाई गणा ! हातांत अग्नी हाय. लई वडावड चाल- लीया माजी! "कंच्या गोष्टीची ?" " पैक्याची-आन् दुसरी कंची !" लबाड बोलतोस !" आत्ता ! तुज्या गळ्याच्यान् रं. सुटली बोल-" " सुटली. पर अस का ? तुज्यासारख्याला ही काळजी का ? " खरं तर असू ने. पर घरची मानसं चागली न्हाईत गणा. म्हातारी अन् बायकू माज रगत खात्यात !" "" " "ते कस ? " " " " म्हातारी मालासाठी पैका घेती. बायकूची रहाणी बामणीणीवाणी खर्चाची. लोकाचं देणं लई झालय बग मला !" आ? व्हय. त्येनंच खाल्ल्यालं आन्न माज्या अंगी लागना !" बोलता बोलतां स्वतःची स्वतःला कणव येऊन नेवराचा आवाज कापरा झाला.

" कुणाला सांगावं तरी रं ? कुणापाशी बोलत न्हाई बग. मनालाच खातू अन् गप बसतू. आज तूं काळजाला हात घातलास म्हणून बोललो. गणा, गड्या ह्या गुंत्यातनं कसं सुटावं हे साग. तू शाणा माणूस शारगांवांत वागल्याला. आमा अडाण्याला वाट दाव ! " अरं दावणीचं एखादं जनावर मोड. भागव बोजा !" जनावर मोडून कस भागंल ? मिळतय ते आन्नबी तुटंल !" मग दोघेहि घटकाभर गप बसले. काळोख झाला होता. समोरच्या घरांतून दिवे लागले होते. गणाच्या घरापुढच्या लिबावर बसलेले पादरे बगळे आतां दिसेनासे झाले होते. गार वाग सुटला होता. मग गणानं दुसरी शिग्रेट काढली. एक नेवराला देऊ केली. तसा तो म्हणाला, C6 66 नग मला !" "कां रं? " " > " नग. आपल्याला सवय न्हाई हे वडायची. सपक लागती. बरसान ईल. तंबाकू ह्यापरीस बेस. तूं वड !" गणानं धूर काढला. " नेवरा, गड्या मी बोलतो, पर तुला अवघड वाटणार न्हाई न्हवं ? 'न्हाई. तूं बोल. अरं तू काय वाईट सागशील का ? तू माजा का वाद्या हायेस का " असं कर. जिमिनीचा एखादा तुकडा वेच. त्याशिवाय दुसरी वाट न्हाई !" नेवरा नाही म्हणाला खरा, पण गणाच्या या सल्ल्यानं त्याला अवघडच वाटलं. चैनीखातर झालेला बोजा फेडण्यापायीं बापजाद्यानीं कमावलेली जमीन विकणं म्हणजे केवढी हरामी ! जनलोक काय म्हणेल ? नेवराला आपल्या म्हातारीचा आणि बायकोचा राग राग आला. त्या दोघींनीच त्याच्या गळ्याला फांस लावला होता. "गणा, असं कसं रं करावं ? जनलोक काय बोलल ?" "अरं, जनलोक तुझा बोजा फेडायला येतात का ? तुझ्या घरांत चूल पेटना तर कोण जेऊ घालणार हाय का ?"

यावर नेवरा काही बोलला नाही. उगीच बसून राहिला. ही गोष्ट गणानं नवीनच सांगितली अशातला भाग नव्हता. एकाती बसला असता हा विचार नेवराच्याहि मनीं आला होता. पण जमीन विकायला त्याच काळीज घट्ट होत नव्हत. असा विचार मनात येणं ही गोष्टसुद्धा शरमेची अशीच त्याची भावना होती. पण आतां गणासारख्या शहाण्या माणसानंदेखील हाच उपाय सुचवला तेव्हा त्याचं मन डळमळू लागल. वाढू लागल की, जमीन विकावी. पण तस तो गणापाशी बोलला नाही. म्हणाला, वखुत झाला गणा. जातो. जनावरास्नी वैरण टाकायची हाय !" आणि उठून रानाकडे गेला! मग चार रोज हीच गोष्ट त्याच्या मनीं घोळत राहिली. आणि अखेर त्यानं ठरवलं की जमीन विकायची. दोन एकर विकायचे. हा कारभार एकट्यानच करावा की चार माणसाचा सल्ला घ्यावा ? म्हातारीचा विचार घ्यावा ? पण कुणाचा विचार घेऊन काय करायचं ? देण्याच्या काळजीनं मी मरायला लागलोय्. कुणी मला तारणार आहे का ? फुकट हाय सगळा पसाग ! आपला जीव सुखात असला तर ह्या जमिनीचा, गुराढोराचा उपयोग ! काळ- जीन काळजीन खगून मेलों तर जमिन संगं येणार आहे का ? आणि म्हातारी तरी ? बायकोसुद्धा दारापर्यतच पोचवायला येईल. मग कुणाचा विचार का म्हणून घ्यावा ? चोख एक तुकडं बेचावं आणि बिनघोरी व्हावं. मग नात्या नेवग आवर्जुन गणाला भेटला. रात्री काळोखात लिंबाखाली बसल्या बसल्या त्या दोघाची भाषा झाली. गणा, तूं सागितलेली वाट मी धरली ! तुकडं इकतोस का ? " " 'व्हय इकतो !" " " म्हातारीचा इचार घेतलास का ? गि-हाईक बघितलंस का ?' 'इचार कुनाचा आन् कशाचा घ्याचा ? जिमिन माजी हाय. मी तिच वाटेल ते करीन. आता गि-हाईक मातूर कुनी भेटल न्हाई. भेटलं न्हाई म्हजे काय, मी कुनाकडं गेलोच न्हाई !"

मग?" नाना " " माझं म्हणणं अस हाय गणा, आता कुट कुणाला गळ घालू ? जिमिन घिऊन टाक !” व्य ज्य, अर मला काय करायचं हाय तुझ्या जिमिनीनं ? येडा काय तूं नेवरा ! मर्दा, तुला असं वाटलं काय, मला जिमिन पायजे म्हणून तुला हुलीवर घातला ?" " तसं न्हव हा, अन्नाच्यान् तस न्हवं. पर मीच म्हणतो तू घिऊन टाक !" अशी ' हो ना ' 'हो ना' झाली. खरं तर ' गणाला मनातून जमीन घ्यायची होती. किंबहुना, त्याच हिशोबानं त्यानं नेवराला ही वाट धरायला सागितल होतं. पण तसं दाखवावं कसं म्हणून त्यान आढेवेढे घेतले. सबबी सागितल्या. " नेवरा, माज्यापशी पैका न्हाई. मी जिमिन घेऊ कशी ?" नग आता लई वडून धरुस, गणा. काय दोनपा रुपय कमी दे. पर तूच जिमिन घे !" अखेर गणानं जिमिन घ्यायचं कबूल केलं. आणि पुढच्या दोन दिवसांत 'इसार पावति' झाली. अंगटा उटवून देऊन शभर रुपये कनवटीला लावून नेवरा घरी आला. त्या दिवशी नेवरा पोटभर जेवला. दुसरा दिवस संपला. रात्री भाकरी खायला नेवग घरी आला आणि तिथला प्रकार बघून त्याला दरदरून घाम सुटला. म्हातारीन आढ्याला दोर टागून फास तयार केला होता. बायको वरवटा पुढ्यात घेऊन बसली होती. जणू जय्यत तयारी करून नेवऱ्याच्या येण्याचीच वाट बघत होत्या. तो येताच दोघीनींहि गहिंवर घातला. "अरं असा कसा र कसाई जन्माला आलास ? अर बापजाद्यानी मिळवलेली जिमिन कशी रं इकलीस?" "अवं आमी तुमचं कुनी न्हवतोच का ! आमाला न विचारता जिमिन कशापायीं इकली ? आता आमी पोटाला का बिबं घालावं का? बायको वरवट्यावर ताडताड डोकं आपटून घेऊ लागली आणि म्हातारीनं "

पायाखाली घडवंची घेऊन फासांत मान अडकवली ! घाबराघुबरा होऊन नेवरा म्हातारीला आडवा गेला तेव्हां लाथ झाडून तिनं त्याला बाजूला केला. नेवरा तोडावर हात घेऊन ओरडला, " असं कशापायी ग आये, फास घिऊन मला काळं पानी दावतीस का ? "अरं काळ्या पान्यानं न्हाई भागायच. तूं फासावर चढशील. तुझी करणी बघण्यापरीस मी फासावर मरतें. मला आडवा नग होऊस!" इकडे बायकोनं कपाळ रक्तबंबाळ करून घेतलं. तिच्या अंगावर जाऊन नेवरा ओरडला, तू बी कपाळ फोडून मरतीस का ? अग, मग मी कुटं जाऊं?" आणि त्याला रडंच आलं. पण बायकोला नवऱ्याची कणव आली नाही. वरवंट्यावर डोकं आपटीत ती बोलली, नवरा न्हवंस तूं, वैरी हायेस माजा वैरी! असल्या नवऱ्याची बायकू म्हणून घेण्यापरीस मी मसणवाटत बसते !" घटकाभर घरात एकच कालवा झाला. नाल्या नेवऱ्याच्या घरांत कुणीतरी मेलं म्हणून सगळं गाव जमा झाल. सगळ्यानी हा तमाशा बघितला. अखेर चार जाणती माणस पुढं झाली आणि त्यानी म्हातारीची समजूत घातली. खुळ्या काय तुमी ? फास लावून घेऊन सगळ्या गावाला कोर्टाच्या वाऱ्या करायला लावनार काय?" म्हातारी अंगात आल्यासारखी घुमू लागली, " जिमिन इकली भाड्यानं. माजं वाटुळ झालं. माजं घर उठलं गावातनं. अता मी कशाला वं जगू!" मग नेवरा रडत रडत गावाला सागू लागला, इकू न्हाई तर ? बोजा झालाय अंगावर ! पैका आनू कुटला ? मीच मरतो ईख खाऊन म्हणजे ह्या दोघींची मनं शांत हुत्याल !" तशी म्हातारी हात पळून म्हणाली, "अरं मर की रं मर. आंघुळी करून मोकळी हुईन !" आणि संतापानं तिनं दांतखिळीच बसवून घेतली. दातावर दांत घट्ट मिटून का करूं

बोजा ती निपचित पडली. मग लोकांनी उलथनं घेतलं आणि ते दातांत घालून दांतखिळी उघडली. जवळ बसलेला नेवरा रडरडून आईला म्हणूं लागला, " आई, तूं मरूं नगंस. अग मी जिमिन अजून इकली न्हाई. नुसती इसार पावती केलीया. ती माघारी घिऊं, रद्द करू. तूं सावध हो !" म्हातारी सावध झाली. फास सोडून टाकून मंडळींनी दोघा तिघांचा समेट केला. आणि सगळे घरोघर गेले. बायकोच कपाळ धुऊन नेवरानं त्यांत दग- डीचा पाला भरला. दोघींनाहि अंथरुणावर निजवून जेवण स्वतः रांधलं. आपण खालं आणि बायकोला, आईला घातलं. विसार पावती रद्द करायला म्हणून नेवरा गणाकडे गेला, तेव्हा तो पंढर- पूरला गेलाय आणि आठपंधरा दिवस येणार नाही असं कळलं ! गणा येईपर्यत म्हातारीनं आणि बायकोन नेवराला तापल्या तव्यावर धरलं. कुठून बुद्धि झाली आणि हे पाप करून बसलों असं नेवराला झालं. आठ- पधरा दिवस यमयातना भोगल्यावर तो गणाकडे आला. म्हणाला. "गणा, माजी जिमिन द्याची न्हाई !" "का र ?" "न्हाई द्याची हे खर. का र आन् कसं रं इचारुन काय उपेग ?" पर तुला हे पयलं कळत न्हवतं का ? नेवराचा आवाज गगनाला भिडला, "अरं कळत हुतं मस्त ! पर माज्या घरी दोन खून पडत्याल, मी काळ्या- पान्यावर जातोय जिमिन इकली तर ! का करतोस कळण्या न कळण्याला ? तू आपला इसार माघारी घे आन पावति दे!" आन् याज कशानं देऊं ? घर इकू माजं ? ?" याज कशाचं?" " मी काय पैका पुरून ठिवला हुता व्हय रं तुजी जिमिन इकत घेण्यापायी ? पंधरा घरं फिरून रुपयं गोळा करून आनलं जिमिन घेन्यापायीं. शंभरामागं छत्तीस याज अगुदरच काढून घेतलं सावकारानं, आन् आतां तू जिमिन द्याची न्हाई म्हणतूस म्हंजे मी गळ्याइतका बुडालों !

  " गणा, तुज्या पाया पडतो. माजा जीव नगं घेऊस आतां. अरं, मी माज्या मरणानं मरतोया, तू का आनी धोपाट्या घालतोस ? " काय करतोस असल्या मऊ बोलण्याला ? तू आपला विसार धरून पांचशे रुपये दे आन पावती ने. मला काय करायची हाय तुजी जिमिन ?" नेवरा बहुत हातापाया पडला, पण गणा बधला नाही. मग नेवरान स्वतःच्या दहा थोबाडीत हाणून घेतल्या. रागारागान तो खोताकडे गेला आणि प्रॉमिसरी लिहून देऊन त्यान पाचशे रुपये काढले. गणाच्या मढ्यावर घातले आणि इसार पावती चुलीत घालण्यासाठी म्हातारीच्या स्वाधीन केली ! नेवरा आता गावात फिरकत नाही. रानातच असतो. त्याच्या डोक्यावरला बोजा तसाच आहे. -आणि बजा वाणीण आणि तिची सून याना या गोष्टीच काहीहि वाटत नाही !