Get it on Google Play
Download on the App Store

लहानपणीचे प्रेम

लहानपणी

 

लहानपणीचे प्रेेम

 सांगतो माझ्या पहिल्या प्रेमाची ❤कथा,

नीट वाचा आता. 

 आमचं घर होतं शेजारी-शेजारी ??, 

एकत्र खेळायचो,पावसात पळायचो,

 एकत्रच पडायचो आजारी. 

 

 कधीकधी भांडणेही? करायचो ,

ती माझ्या गच्चीला धरायची,

मी तिच्या केसांना धरायचो. 

 

 नंतर एकमेकांवर रुसायचो??, 

थोडावेळ बोलत नसायचो. 

पण न बोलता मन जास्तवेळ थांबेना

 म्हणतात ना, तुझं माझं जमना अन् तुझ्याविना करमना.

 आम्ही शाळेतही मिळुनच ?जायचो, 

सुट्टीत एकमेकांचा डब्बाही?? खायचो.

 

 हळुहळु वय वाढत गेले, 

मैत्रीचे रुपांतर प्रेमात? झाले. 

 प्रेमाचा ईजहारही नाही केला, 

तरीही प्रेमाचा आनंद घेतला. 

प्रेम कविता

संकेत रणखांब
Chapters
लहानपणीचे प्रेम जशी तु तु येना परत प्रेयसी