नेपाळ.
बर्याच काळापूर्वी, नेपाळातील एका छोट्याशा गावात राहणारी चार कुटुंबे राहत होती. प्रथम कुटुंबात सर्वजण सहसा त्यांचा अमूल्य वेळ युक्तिवाद करण्यात घालवत असतं, मग तो युक्तिवाद गावातील राजकारण असो वा इतर कोणत्याही समस्यांशी निगडीत असो. मुळात दुसरे कुटुंब खूपच लोभी होते. जिथे फायदा तिथेच आपली हजेरी असं काहीशी त्यांची वृत्ती होती. तिसरे कुटुंब नेहमीच काहीतरी नव्याच्या शोधात असायचे, कारण त्यांच्याकडे जे काही असेल किंवा जे काही होते, त्यात ते कधीच समाधानी नसायचे. चोथ्या कुटुंबाची बात मात्र वेगळी होती, त्यांच्या नजरेत आपल्याला मिळेल ती गोष्ट अमुल्य आहे; असं म्हणून संयम ठेवून निवांत जगण्यात त्यांना आनंद वाटायचा. एका रात्री, दुसऱ्या लोभी कुटुंबातील एका मुलीला नेपाळमधील शेजारच्या गावात एका घरात एका जादुई स्वयंपाकघराचा शोध लागला. तिथून एका ठराविक लिमिटपर्यंत आपल्या भुकेसाठी जेवण बनवून मिळत होतं. या शोधानंतर ती आपल्या घरी परतली व कुटुंबात तिने ही बाब सांगितली. साहजिकच अख्ख्या कुटूंबात लोभाची भावना नसानसात सळसळत असल्याने त्यांनी या स्वयंपाक घराबद्दल कुठेही वाच्यता केली नाही आणि आपलं काम वाचतं व आराम मिळतो, आयत खायला मिळू लागल्याने ह्या कुटुंबाने तिथूनचं जेवणाची व्यवस्था सुरू केली. परंतु लपूनछपून चालू ठेवलेली कोणतीही गोष्ट अधिक काळ झाल्या जात नाही, हळूवारपणे गावातील इतर उरलेल्या तीन कुटुंबातही ही बातमी पसरली व त्यांनीही या स्वयंपाक घराचा फायदा घेण्यास सुरूवात केली.
हळूहळू संपूर्ण गावात ही खबर पसरली. एकेक दिवस असाच जात राहिला आणि संपूर्ण गाव एकेक करत त्याच आयत्या मिळणाऱ्या स्वयंपाकावर अवलंबून राहू लागले. एके दिवशी त्या स्वयंपाक घरात एक मोठा राक्षस येऊन जेवणावर ताव मारू लागला. त्या राक्षसाच्या तिथे असण्याने दोन - तीन दिवस संपूर्ण गाववाल्यांची जेवण आणण्यासाठी तिथे जाण्याची हिम्मतचं झाली नाही. परिणामी आता तब्बल दोन वर्षे आयत्या खाण्याची सवय पडल्याने सर्वजण स्वयंपाक बनवायला विसरले होते आणि त्या नादात गावातील मुले, तरूण व इतर मंडळी ते दोन - तीन दिवस उपाशीच राहिले. त्यानंतर राक्षस तिथून निघून गेल्याने समस्त गावकरी खुश होऊन त्या स्वयंपाक घरात गेले परंतु त्या जादूई जेवण तयार करणाऱ्या स्वयंपाक घराची आता कॅपॅसिटी संपली होती. मुळात नेपाळमधील त्या व शेजारच्या अशा दोन गावांना आता गेल्या दोन वर्षांपासून अन्नाची आयती गरज आपोआप भागत आल्याने इतर कुठल्याच कामाची कधी गरज पडली नव्हती. आणि अंगात आळस इतका प्रचंड भरला होता की, स्वत:ची शेती असलेले अनेक कुटुंबे शेतीत अन्न पिकवायची गोष्टही विसरून गेले होते. गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टीत काही ना काही युक्तीवाद करून स्वत:ची वाट निवडणाऱ्या कुटूंबाचीही विचारसरणी कुंठीत झाली होती, अतिशय लोभ बाळगणारे कुटुंब आता जेवणाशिवाय इतर कोणत्याही दिशेचा विचार करू शकत नव्हते, तिसऱ्या व असंतोशी कुटुंबाला तर अगदी केवळ जेवणाचीच तलप झाल्याचं दिसतं होतं, मिळेल त्यात समाधानी असणारे कुटूंब आता प्रत्येक ठिकाणी जेवण जेवण हवं अशाच स्थितीत वावरू लागलं होतं. या सगळ्यात ज्या दुसऱ्या कुटुंबातील मुलीला ती जागा सापडली होती ती मुलगी नेपाळच्या शहरात शिफ्ट झाल्याने तिला गावाची सद्य परिस्थितीबाबत काहीच जाणिव नव्हती. परंतु एक दिवस तिने जेव्हा गावात पाऊल ठेवलं तेव्हा तिला लोकांची हतबलता दिसली, प्रत्येकात काहीतरी करायची इच्छा होती परंतु त्या इच्छेला गंज लागला होता, आळसाने पुर्णतः त्यांच्या शरीराला जकडून ठेवलं होतं. तिला लक्षात आलं की, प्रत्येक सजीवाला मुळ जगण्याचा घटक हा भुक, अन्न हे आहे. आणि तेच जर अगदी मेहनत न करता मिळू लालगं तर प्रत्येक सजीवाची विचारशक्ती, कल्पनाविचार आणि नव्या शोधाची वाटचाल बंद पडते. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे तसचं काहीसं. गरज संपल्याची चाहूल व्यक्तीला त्याच्या अधोगतीकडे घेऊन जात असते, हेच खरयं.