दुष्टांचे औदार्य
फार पूर्वी एक राजा होता. त्याला एकच एक मुलगा होता. राजकुमाराबरोबर एक बाण्याचा मुलगा व एक राजपुरोहिताचा मुलगा एकाच गुरुगृही विद्याभ्यास करीत होते. तिघांचे लक्ष विद्याभ्यासाकडे नव्हते. एकदा राजा युवराजाला बोलवून फार रागावला. ही गोष्ट त्याने आपल्या दोषां सवंगड्यांना सांगितली. 'काय करावे, कळत नाही, माझे वडील देखील आज रागावले मला." अशी दोघांनी आपापल्या वडिलां विषयी तक्रार सांगितली. 'आतां मला नाही राहायचं या गावी. बाबांच्या दररोज शिव्या खाण्या पेक्षा मोकळेपणाने परगावी कोठे रहावे असे मी ठरविले आहे." युवराज म्हणाला.
"तूं निघालास तर आम्ही सुद्धा येऊ तुझ्याबरोबर.” राजकुमाराचे दोघे मित्र म्हणाले. तिघांनी देशभर श्रमण करावयाचे ठरविले. "देशभर अमण करायचे म्हणजे पैसे पाहिजेत. नाहीतर उपाशी मरावे लागेल." बाण्याचा मुलगा म्हणाला. “पैसे किती न्यायचे बरोबर! हिरे माणके बरोबर घेऊन जाऊ या. मी तिघांसाठी एकेक हिरा घेऊन येतो." राजकुमार म्हणाला. त्याप्रमाणे तो तीन हिरे घेऊन ठरल्या जागी आपल्या मित्रांना मेटला. तिथे प्रवासाला निघाले. फिरत फिरत ते तिघे एका रानात आले. “येथे चोर डाकू असतील नाही.
ते आपल्या जवळचे हिरे घेऊन जातील." वाण्याचा मुलगा म्हणाला. " प्रत्येकाने एकेक हिरा गिळून टाकावा. मग हे जंगल पार होईपर्यंत आपल्याला कोणाचीच भीती वाटण्याचे कारण नाही." पुरोहिताचा मुलगा म्हणाला. त्याप्रमाणे तिषांनी तीन हिरे गिळून टाकले. एका चोराने तिघांचे बोलणे झाडाआडून ऐकले होते. त्यांच्या जवळचे हिरे काही तरी युक्ती काढून बळकावले पाहिजेत हे स्याने मनाशी ठरविले. ते तिघे पुढे निघाल्यावर चोर दुसऱ्या वाटेने पुढे गेला व त्यांच्यासमोर येऊन उभा राहून म्हणाला- "दादा! मी गरीब भिकारी आहे. तुम्ही श्रीमंत सावकार दिसता. तुमची होईल ती सेवा करीन. तुम्ही खाल ती मीठभाकर खाऊन पडून राहीन." तिषे वयाने लहान होते. जंगलाची वाट, अर्थातच त्यांना भीती वाटत होती. त्यांनी विचार केला एक धडधाकट मनुष्य दिसतो आहे. असा मनुष्य नोकर म्हणून बरोबर असला तर वेळ प्रसंगी उपयोग होईल. म्हणून त्यांनी त्या चोराला बरोबर चलायला सांगितले, स्या दिवशी संध्या काळी ते एका रानटी लोकांच्या वस्ती जवळ येऊन पोचले. बाट मिल्लांच्या सरदाराच्या झोपडीजवळून जात होती. त्या झोपडीबाहेर एका खांबाला बांधलेल्या पिंजण्यात एक राक्षसी पोपट होता. त्या चौघांना त्या वाटेने येत असलेले पाहून पोपट बोल लागला. तो बोलू लागला याचा अर्थ चौपाजवळ पैसे आहेत असे होते. त्या शिवाय तो कवी मोललाच नसता. म्हणून पोपटाचे बोलणे ऐकून मिलाचा सरदार झोपडी बाहेर आला व त्या चौघांना दरडावून म्हणाला-"उमे रहा, एक पाऊल देखील पुढे टाकलेत नर ण्डा. तुमच्याजवळ जे काही धन किया मूल्यवान वस्तू असेल ती मुकाट्याने माझ्यासमोर ठेवून पुढे चालू लागा. नाही तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा." व्या विधांबरोबर जाणारा चोर म्हणाला- "बाबारे आमच्याजवळ काही एक नाही. पाहिजे तर आमनी झडती घेऊन पहा." स्था भिल्ल सरदाराने त्या निघांची लक्षपूर्वक झडती घेतली. त्या तिघांजवळ ग्याला काही मिळाले नाही. मग पोपट कां बोलला ज्याला कळेना. म्हणाला "बरे तर तुम्ही जा." ने चालू लागल्यावर पोपट आणग्वी जोरजोराने ओरडू लागला, जणुकाही न्याचा पिंजराच कोणी उचलल घेऊन चालला आहे. आता मात्र मिल सरदाराला वाहू लागले की खात्रीने या निधांकडे काही तरी असलेच पाहिजे. त्यांनी ते लपवून ठेवले आहे. असा विचार करून भिल्लाने आपल्या नोकरांना बोलावून त्या चौघांना झोपडीत कैद करून ठेवायला सांगितले व म्हणाला- "रात्री घरी परत आल्यावर मी येतो यांच्या समाचाराला."
" मिलांनी त्या चौघाना एका गोलाकार झोपडीत कोंडून ठेवले. त्या झोपडीला एकच दार होते. ते त्यांनी बाहेरून बंद केले. दखाज्या बाहेर मिल्ल भाले घेऊन पाहारा देत होते. मध्यरात्रीच्या सुमारास मिल्ल सरदार परत आला. त्याने झोपडीचे दार उघडवले व कैद्यांना म्हणाला-" तुम्ही पैसे किंवा काही मूल्यवान वस्तु लपवून ठेवली आहे, यात मला शंका नाही. तुमच्या अंगाखांद्यावर काही दिसत नाही. कोठे आहे ते सरे सरे सांगा नाही. तर एकेकाचे पोट चिरान काढायला सांगेन."
चोराला वाटले की भिल्लांचा सरदार जे म्हणतो आहे ते करायला मागे पुढे पाहणार नाही. आपल्या पोटात काही नाही. या तिघांच्या पोटात हिरे आहेत. सरदार ल्या तिघांपैकी प्रथम कोणाचे तरी पोट चिरून पाहणार. हिरा सापडला की एकेकाचे पोट चिरणार. आपण तरी कसे सुटणार ! तो सर्वांचा जीव जाणार हे निश्चित. पण समजा, त्याने सर्वात आधी आपलेच पोट चिरले तर त्याला आत काही मिळणार नाही आणि आपला जीव गेला तरी तिघांचा तरी जीव बांचेल. असा विचार करून तो साहस करून म्हणाला-" सरदार! आमच्याजवळ काही एक नाही हे आम्ही तुला सांगितले. तुझा आमच्यावर विधास नसेल तर पहा, मासे पोट चिरून.".
मिल्लांच्या सरदाराला जास्तच राग आला. त्याने कंबरेची कट्यार काढून चोगचे पोट चिरले, चोर जागच्या जागी ठार झाला. त्याच्या पोटांतून सरदाराला रत्तीभर सोने देखील मिळाले नाही. आपण विनाकारण एका गरिबाचे पोट चिरून त्याचा जीय घेतला असे सरदाराला वाटले, आपल्या हातून या पोपटामुळेच हा दुष्टपणा घडला असे वाटून सरदाराने मनातल्या मनात पोपटाला शिव्या दिल्या व त्या तिघांना सोडले. त्यानंतर त्या तिघांना प्रवासाची भीती वाटू लागली. ते परत त्याच वाटेने आपल्या गावी आले. त्यानंतर त्यांनी आपापल्या वडिलांच्या व मोठ्यांच्या आशे- प्रमाणे विद्याभ्यास करून पुढे नाव लौकिक मिळविला.