Get it on Google Play
Download on the App Store

अनोखे प्रेम

आजोबांच्या गावी पंधरा दिवस राहून गौरी मुंबई ला जान्या साठी आवरा आवर करून निघाली होती. निसर्ग रम्य गावात तिचे पंधरा  दिवस आनंदात  गेले होते . गावातील  अनेक मुलीच्या  ओळखी पडल्या अनेकांशी जिवलग मैत्री झाली होती मुंबई मधील व्ही.आय .पी जिवना पेक्षा गावातील जिवन अधिक आकर्षक तिला वाटू लागले होते .

कारण गावातील प्रेमळ मानसांचा सहवास लाभला होता . डोंगराच्या पायथ्याला वसलेले छोटेसे निसर्ग रम्य गावाचा तिला लळा लागला होता . गाव सोडून जाताना तिचे मन भरून आले होते सर्व मैत्रीनी निरोप दयायला एक तासा पासून बसुन होत्या .
मात्र गौरी ची नजर गणु ची वाट पाहत होती मला भेटायला गणु का आला नसेल असे तीला राहून , राहून वाटत होते . बराच वेळ झाला तरी गणु दिसला नाही म्हणुन गौरी आई सह मुंबई ला जान्या साठी  निघाली टेकडीवर गाव असल्याने एस .टी बस गावा पासुन काही अंतरावर थांबा घेत असल्याने गौरी आई सह पायी चालत निघाली होती .

गौरी आज  मुंबई ला जानार आहे म्हणुन गणु ने गौरीला दयायला शेतातून चिंचा घेऊन आला होता मात्र गौरी थोड्या वेळा पुर्वीच गेली असल्याचे कळाल्याने तो बस थांब्या कडे धावत सुटला.
काही अंतरा वर गेल्यावर त्याला  गौरी जाताना दिसताच त्याने गौरे , गौरे  जोरात आवाज  दिला  गौरी ने वळून पाहिले गणु धावत येत होता गौरी जागेवरच थांबली धापा देत गणू  गौरी जवळ पोचला व म्हणाला  तुझ्या साठी मी चिंचा आनायला गेलतो  हे घे म्हणुन एक फाटकी पिशवी गौरीच्या हतात ठेवली  .

गौरी कधी पिशवी कडे तर कधी गणू कडे बघत म्हणाली हे कश्याला आनले रे  , गौरी साठी या चिंचाची  काहीच किंमत न्हवती परंतू  गणू ची ही प्रेमाची भेट होती .आपल्या साठी गणू कीती धावत आला होता . चिंचा काढताना त्याच्या हताला कीती  खरचटले होते हे पाहून गौरी भराऊन गेली होती . गौरी जात असल्याने गणू च्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती .

गणु - गौरे कश्याला चालली ग राहकी अजुन
गौरी - अरे गणू  कीती दिवस राहणार तुमच्या सगळ्या सोबत गावात राहून खुप छान वाटले  मला पण जावेच लागणार आहे .
गणु - गौरे तु परत कधी येणार ?
गौरी - पुढच्या वर्षी येईन .

गणु  . अग लवकर येकी तु गेल्यावर आम्हाला करमनार नाही बघ लवकर ये  तुझ्या साठी मक्याचे कणसे पेरतो  .

गणु चा निरागस चेहरा बोलत होता गौरी ऐकत होती . गणू किती साध्या  मनाचा  आहे असे तिला वाटत होते .गणूचे मन ठेवण्या साठी गौरी म्हणाली ठीक आहे मी लवकरच गावी येईन .
हे ऐकुन गुणच्या चेहऱ्यावर आनंद  दिसत होता एसटी बस आली होती.  गौरी ने गणु कडे बघीतले गणु च्या डोळ्यात आश्रू दिसत होते.
  बस सुरू झाली गौरीने निरोप घेतला मात्र तिचे मन मात्र गावातच हरविले होते तिचा  कंठ  दाटून आला  होता   बस लांब जाई पर्यंत ती गावा कडेच बघत होती  .

मराठवाडयातील एका डोंगराच्या पायथ्याला वसलेले छोटेसे सांगवी  गाव उंच , उंच डोंगर , हिरवीगार झाडे मनाला भुरळ घालणारे पाण्याचे वाहणारे धबधबे . गणेश अश्या निसर्ग रम्य गावच्या गंगाराम आणी आशाबाई या शेतकऱ्याचा  मुलगा  त्याला गावातील  सगळे जन गणु म्हणुनच हाक मारत असे .

गणू ने  खुप शिकावे अशी गंगाराम ची ईच्छा होती पण गणु ला शिक्षणात मुळीच रस न्हवता  दहावी पर्यंत शाळा शिकुन वडिलांना शेतातील कामाला मदत करू लागला होता. शेतीला जोड धंदा म्हणुन गंगाराम ने शेळी पालण सुरू केले होते गणू मोठया आनंदाने शेतीचे व शेळ्या चारण्याचे काम करत होता .
सुंदर अश्या डोंगरावर बसुन शेळ्या चारणे बासरी वाजवीने त्याला छंद लागला होता निसर्गाच्या सौंदर्यात तो  दिवसभर हरवुन जात असे .

गौरी ची  साप्टेवेर इंजिनीयर ची परिक्षा संपल्याने ती आजोबांच्या गावाकडे आई सह आली होती . गावाचे निसर्ग रम्य ठिकाणने तिच्या मनाला भुरळ घातली होती   कीलबील करीत सकाळ संध्याकाळी घिरटे मारणारे पक्षी हिरवीगार झाडे पाहुन ति हारवुन जायची .

गावातील काही मुली सह ती  डोंगरावर जाऊन निसर्गाचा आनंद घेत होती . गणू ही त्यांच्यात दररोज असायचा  गणु च्या बासरी च्या मधुर सुराने  गौरी  हारऊन जायची.  निसर्गाने बहरलेल्या गावचा व मैत्रीनी चा तिला लळा लागला होता.

खेळकर वृत्तीची गौरी मुंबई ला गेल्या पासुन सर्वाना करमत नव्हते  गणू   तर सारखी आठवण काढत असे . गौरीची ओढ एवढी का लागली त्याला ही कळत नव्हते .

तिकडे गौरीला देखील गणूचा त्या भोळ्या साधापणा खुपच आवडत होता .आपल्या साठी चिंचा घेऊन धावत आलेला गाणूचा चेहरा तीला सारखा आठवत होता . एका गुराख्या विषयी एवढी ओढ तिच्या मनात कशी बसली तीला देखील कळाले नाही  ती सतत उदास  दिसत होती .

बरेच महिने झाले तरी गौरी गावी आली नाही म्हणुन गणु गौरीच्या आजी कडे गेला व विचारू लागला . आज्ये ए आज्ये , कायरे गणू काय झाले ओरडायला ? अग आज्जे गौरी कधी येणार हाय . यावर आज्जी म्हणाली अरे अता कसली येतीय ती अता त्याची आई नाही पाठवत तीला , म्या बळच बोलाऊन घेतल होत .

हे ऐकुन गणू ला दुःख झाले , अग पण गौरेच म्हणली होती मला येणार म्हणुन , अर ती नसती येत  उगच म्हणल असल बग तुला , आज्जी अशी म्हणताच
आज्जे तिचा नंबर दे फोन करू म्हणुन गणू ने गौरी चा मोबाईल नंबर घेतला व  गौरीला फोन केला.

  हॅलो गौरे मी गणु बोलतोय  गणू चा फोन आल्यावर गौरीला आनंद झाला गावातील सुंदर निसर्ग डोळ्या समोर दिसु लागले . गौरी -बोल गणु कसा आहेस ?
गणू - अग मी बरा हाय पण तु का आली नाही गावाकड  येते म्हणाली होतीस की अग मी तुझी कीती वाट बघतो रोज ,

गौरी - अरे माझे येने  नाही होणार
 
गणु - अग तुच म्हणली होती की येते म्हणुन , अग येकी ग  लवकर  करमत नाही बघ तु गेल्या पासुन ,

हे ऐकताच गैरीच्या डोळ्यात आश्रृ वाहू लागले तिला सुध्दा गणू  ची आठवण येत होती कीती निरागस चेहरा मनातील भाव  व्यक्त सुध्दा  करता येत नाही कीती साधा भोळा सहज बोलुन जात होता. मात्र त्याच्या शब्दाने   गौरीचे मन भरून आले होते . माझी ओढ का बरी लागली असेल त्याला एवढी  असे विचार तीच्या मनात येत होते .

गणु - ए गौरे गप्प का बोल की ग  कधी येणार सांगना , ?

गणुचे  केवील वाने शब्द गौरीच्या ह्रदयला घयाळ करीत होते. गौरीला देखील कळत नव्हते काय होत आहे .
तिला देखील गावाकडे जान्याची ओढ लागली होती अखेर तिने गावाला येण्याचा गणुला शब्द दिला .

गौरी =  गणु मी नक्कीच येईल बघ  आई ला विचारते आईने परवानगी दिली की येते मला पण आवडेल तुमच्या सर्वांच्या सोबत पुन्हा सुंदर डोंगरावर फिरायला गौरी  असे म्हणाल्याने  गणु ला खुप आनंद झाला होता .

गौरी येणार असल्याच्या आनंदात होता तो पुन्हा हिरव्यागार  उंच डोंगरावर निघुन गेला  होता  मन भरून निसर्गरम्य वाता वारणात बासरी वाजविण्यात बेधुंद झाला होता .

तिकडे गौरीचे मन आज पासुन जास्तच अस्वस्थ झाले होते तीला मुंबईत शहरात कोंडल्या सारखे वाटू लागले ती सतत गावातील गणु च्या विचारत मग्न झाली होती  .

काही दिवस दोघांचे कसे बसे गेले पण गौरी ने अत्ताच यावे असे गणू ला वाटत होते  एक , एक दिवस त्याला वर्षा सारखा मोठा वाटू लागला होता .  दर दिवस त्याची  नजर गावाकडे येणाऱ्या बस कडे जात होती पण गौरी काही दिसत नव्हती  त्याला खुप उदास वाटू लागले होते गौरी शिवाय गणु ला सगळे सुंदर डोंगर ,दरी , हिरवी झाडे भकास वाटू लागली होती .

गौरीच्या आठवणीने गणु व्याकुळ झाला होता   गणू ने  डोंगरावर बसुन  गौरीला फोन लावला गौरी ची मोबाईल रिंग वाजली आणी  गौरी चे  मन भरून आले .

गणू - डाटलेल्या कंठाने गौरे गणु बोलतोय येणार होती ना तु का नाही आली ग  रोज कीती वाट बघातो मी तुझी काय झालय मलाच कळाना ग भाकर पण गोड लाग ना जगु सुधा वाटेना बघ , तुझी शप्पथ गौरे  लवकर येना ग .

गणूचे शब्द कानावर पडताच गौरीला हुंदके आवरता आले नाही  .

गौरे - गणू मी आता नक्कीच येईन बघ तु आता काळजी करू नको आणी कधीही परत न जान्या साठी ,

गणु - गौरे तु खरच येणार का ?  माग पण बोलली होती पण आली नाही  गौरे आजच येकी ग असे म्हणत हुंदके देऊ लागला गणु चे अव्यक्त प्रेमाने गौरीचे मन घयाळ झाले होते  .
आणी गौरी साठी बासरीतुन  गाण्याचे  मधुर सुर निघाले .
आजारे 〰आजारे  वो मेरे दिलभर आजा दिलकी प्यास बुझा जा रे  ,

मोबाईल मधून बासरीचे मधूर सुर गौरीच्या काणावर पडत होते गौरी अस्वस्थ झाली होती   एका गुराखी गणुच्या प्रेमाने ती घयाळ झाली होती तीने सर्व काही त्याग करून  गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला तिच्या मनाला गावाची ओढ लागली  होती .

गौरीने गावाकडे जान्या साठी थेट रेल्वे स्टेशन गाठले  रेल्वे ची वाट पहात होती एवढयात  प्लॉट फार्म वर रेल्वे आल्याची  अलाऊंस होताच धावतच  गौरी रेल्वे मध्ये जाऊन बसली थोडयाच वेळात रेल्वे सुटली व भरधाव वेगाने सोलापूर च्या दिशेने धावत होती दिवस भरचा प्रवास करून रेल्वे संध्याकाळच्या सुमारास सोलापूर स्टेशन वर येऊन थांबली होती . गौरीने  धावतच खाली उतरून सांगवी ला जानाऱ्या एस .टी . बस कडे गेली संध्याकाळची एकच शेवटची बस सांगवी कडे जान्या साठी उभी आसल्याने गौरीला खुप बरे वाटले . बस मध्ये बसुन बस सुटण्याची वाट पहात होती तिची नजर मोबाईल वर गेली गणुचे कॉल येऊन गेल्याचे अनेक मेसेज पडले होते .

ती मनाने खुप घाबरली होती गणु ला परत फोन केला परंतू रेंज नसल्याने फोन लागत न्हवता . गणु दिवसभर गौरीची अतुरतेने वाट बघत होता . एवढयात एसटी बस सांगवी गावाच्या दिशेने धाऊ लागली काही वेळा नंतर बस सांगवी थांब्यावर येऊन थांबताच गौरी गडबडीने उतरून गावाच्या दिशेने  वेगने चालू लागली ,

संध्याकाळची वेळ झाली होती सुर्य मावळत होता सर्व जनावरे डोंगर दऱ्यातुन गावाच्या दिशेने निघाली होती पक्षांचे थवे उंच डोंगरावर घरटे शोधत होते .

गणु डोंगराच्या उंच डेकडी वरून एस .टी बस कडे नजर लाऊन बघत  होता एस .टी तुन अनेक जन उतरले होते गणु ची नजर गौरी ला शोधत होती .अंतर लांब असल्याने स्पष्ट दिसत नव्हते .

गौरी ला ओढ लागली होती गावात पोचायची आपल्या गणु ला भेटायची ती झपा , झप पावले टाकीत चालत होती. गौरी डोंगराच्या पायथ्याला पोचल्यावर  गणु च्या नजरेस पडताच बेभान झालेल्या गणु ने  जोरात अवाज दिला गौरे , गौरे , डोंगर , दरीतुन , गौरे, गौरे च्या प्रतिध्वणी ने आवाज घुमताच , गौरी ने डोंगराच्या उंच टेकडीवर  बघीतले  , गणू बेभान  होऊन डोंगरावरून  गौरी कडे धावत होता. धावता , धावता गणु चा पाय दगडावर अडकल्या ने गणू चा तोल गेला व गणु गडगडीत खाली आला त्याला खुप मार लागला  होता. डोक्यातुन  रक्त निघाले होते  रक्त बंबाळ गणु ला बघताच गौरीने जारोत कींचाळी मारली , गणु तसेच जखमी अवस्थेत उठून गौरीच्या दिशेने पुन्हा धाऊ लागला , गौरी देखील  गणुच्या दिशेने धावत होती दोघे  समोरा  समोर येताच , दोघांनी मिठी मारली .

गणु च्या डोळ्यात आश्रृ आले  गौरे मला सोडून जाऊ नको ग मी जगणार नाही तुझ्या शिवाय असे म्हणत हुंदके देत गौरी ला म्हणत होता गौरी देखील गणुच्या प्रेमात घयाळ झाली होती , नाही रे गणु मी नाही जानार तुला सोडून गौरी असे  म्हणताच गुणच्या चेहऱ्यावर  आनंद पसरला दोघांनी हातात हात धरून  कायमचे एक दुसऱ्याचे झाले  या अनोख्या  प्रेमात दोघे बुडून गेले .

॥  समाप्त ॥

लेखक , निसार मुजावर
मो नं 9423343108
email - Pujyanagri@gmail.com

लघु कथा

निसार मुजावर
Chapters
अनोखे प्रेम निरोप प्रेमाला