Get it on Google Play
Download on the App Store

वास्तुशास्त्र एक विज्ञान

आज काळ बांधकामाच्या शास्त्राला सिविल अभियांत्रीकी आणि आर्किटेक्चर असे म्हटले जाते पण आमच्या संस्कृतीत आधी ह्याला वास्तू आणि स्थापत्यशास्त्र असे म्हटले जाते. आमच्या देशांत जी डोळ्याचे पारडे फेडले जाणारी बांधकामे आमच्या पूर्वजांनी बांधली होती ती ह्याच  विषयाच्या आधाराने. मीनाक्षी मंदिर ते रायगड पर्यंत वास्तुशास्त्राचे नमुने देशांत सर्वत्र आहेत. उत्तर भारतांत जी हिंदू बांधेकामे होती ती इस्लामिक आक्रमकांनी नष्ट केली असली तरी दक्षिण भारतात मंदिरे अस्तित्वांत आहेत. 

वास्तू म्हणजे काय ? 

"वस्तू" ह्या शब्दाचा अर्थ सर्वानाच ठाऊक आहे. वस्तू ज्या अवकाशांत असते त्याला "वास्तू" असे म्हणतात. आपल्या आत्म्याची वास्तू म्हणजे आपले शरीर. आपल्या शरीराची वास्तू म्हणजे आपला रूम, आपल्या खोलीची वास्तू म्हणजे घर, घराची वास्तू म्हणजे आपला परिसर. आपल्या संपुन पृथ्वीची वास्तू म्हणजे आपले सौरमंडळ. वस्तू संरक्षित राहावी म्हणून वास्तू चांगली असावी अश्या दृष्टिकोनाने वास्तू शास्त्र ह्या विषयाची निर्मिती झाली. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी वेदांच्या सुद्धा पूर्वी अस्तित्वांत होत्या त्यामुळे वास्तू शास्त्र हे किमान वेदांच्या इतके जुने आहे.  

मागील हजारो वर्षांत लक्षावधी लोकांनी वास्तुशात्र ह्या विषयावर विपुल लेखन केले आणि हजारो पुस्तकांचे निर्माण केले. त्यातील फक्त सुमारे २०० पुस्तके आज उपलब्ध आहेत. दक्षिण भारतांत आज सुद्धा "स्थपती" हे पंडित ह्या पुस्तकांचे अध्ययन आणि शिक्षण देतात आणि त्याप्रमाणे बांधकाम सुद्धा केले जाते. 

वास्तू शास्त्रांत नक्की कोणते विषय येतात 

१. बांधकाम करणारे लोक 

वास्तुशास्त्र प्रमाणे वास्तू बांधण्याचे काम अनेक तञ् लोक करतात. सुतार, लोहार, सुवर्णकार, गवंडी, शिल्पी, चित्रकार, ज्योतिषी, कारकून इत्यादी लोक आपापल्या टीम मध्ये काम करतात. ह्या संपूर्ण कामाची देखरेख "स्थपती" करतो. स्थपती म्हणजे चीफ आर्किटेक्त्त. 

सुतार, लोहारमी गवंडी इत्यादी लोकांत सुद्धा आपापल्या विषयांत प्राविण्य मिळवलेले लोक असतात आणि त्यांच्या विषयावर पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत. उदाहरण म्हणजे गार्गीय संहिता ह्या पुस्तकांत विशेष करून खांबे कसे बांधावेत ह्याचे विस्तृत वर्णन आहे तर वास्तू सारिणी ह्या पुस्तकांत वजन आणि मापे ह्यांची विस्तृत माहिती आहे. 

२. जमीन आणि त्याचे महत्व 

ज्या ठिकाणी मंदिर किंवा घर  बांधले जाते त्या जागेला समजून घेण्यासाठी वास्तू शास्त्राची अनेक पुस्तके आहेत. एखादी वास्तू बांधण्याच्या आधी त्याच्या स्थानाला समजून घ्यावे लागते. त्याची जबाबदारी स्थपती वर असते. मत्स्य पुराणात सांगितले आहे कि स्थपतीने आधी त्या जमिनीवर संपूर्ण दिवस आणि रात्र घालविली पाहिजे. त्या जमिनीची अध्यात्मिक जाणीव करून घेतली पाहिजे. तिथे कसली झाडे उगवतात, पानांचा रंग काय आहे, कसले कीटक आणि प्राणी आहेत ह्याचे निरीक्षण करून जमिनीची माहिती गोळा केली पाहिजे . मातीची चव घेतली पाहिजे, पाण्याची चव घेतली पाहिजे तसेच पूर्ण वर्षभर तिथे हवामान कसे असते ह्याचे निरीक्षण केले पाहिजे. हि सर्व माहिती असल्याशिवाय कुठलाही मोठा प्रकल्प कधीही सुरु केला जात नाही. 

३ परीघ 

वस्तू शास्त्रांत सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे परीघ. कुंपण ! एकदा जागेची सीमा निश्चित झाली कि वास्तू कुठे बांधावी हे ठरवले जाते. सीमा कायदेशीर पद्धतीने वेगळी असेल तरी चालेल पण एक प्रकारचे कुंपण टाकून आपण वास्तूची सीमा निश्चित केली पाहिजे. एकदा सीमा निश्चित केली कि वास्तू कुठे बांधावी ह्यावर विवेचन अनेक आचार्यांनी केले आहे. आपण घर बांधत असाल तर ते कधीही मधोमध असू नये से म्हटले जाते तर मंदिर हे नेहमी मधोमध बांधले जाते. 

ह्या वास्तूत लोक कुठे राहतील, कुठे फिरतील ह्या विषयावर चिंतन करून मार्गदर्शन केले जाते. 

कधी कधी परिघाचे दगड हलवून वास्तू ची ऊर्जा बदलली जाऊ शकते 

4. शिल्प 

बांधकाम करण्याआधी शिल्पकार त्याचे शिल्प बनवतो आणि चित्रकार एखाद्या मोठ्या भिंतीवर त्याचे चित्र. आज काळ सुद्धा आपण अश्याच प्रकारे बांधकाम करतो. सुतार, लोहार आणि सुवर्णकार सुद्धा ह्यांत भाग घेऊन आपले मत देतात. 

एकदा शिल्प बनले कि दगड वगैरे आणून त्यावर काम सुरु होते. आज सुद्धा अनेक गुंफांत आणि मंदिरात भिंतीवर केलेली चित्रे आणि शिल्प पाहायला मिळतात. 

5. ज्योतिष आणि अध्यात्म

वास्तुशास्त्र हे आधुनिक बांधकाम शास्त्र प्रमाणेच एक शास्त्र आहे. पण सर्व भारतीय विषयांत एक अध्यात्मिक अँगल असतो तसा इथे सुद्धा आहे. काही लोकांनी ह्याचा विपर्यास करून लोकांना भीती घातली आहे कि घर ठीक नाही बांधल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्यावर होतील. ह्यांत काहीही तथ्य नाही. 

बांधकाम करताना देश, प्रदेश, हवामान, समाज, पाणी इत्यादी विषयांवर भर दिल्यास वास्तू सुखद होते. हे विषय काळा प्रमाणे बदलत जातात. त्या शिवाय वास्तू जिथे आहे तिथे कुठले प्राणी, पक्षी झाडे तसेच इतर शक्ती आहेत त्यांना ध्यानात ठेवल्यास घरात तुम्हालाच जास्त सुख प्राप्त होते. पण इथे अंधविश्वासाने वागून काहीही फायदा होत नाही. 

ज्याप्रमाणे आत्म्याच्या सुखासाठी चांगले शरीर आवश्यक आहेच त्याच प्रमाणे आपण ज्या "वास्तूत" राहतो ती वास्तू आपल्या प्रकृतीला चांगली असेल तर त्यांत समाधान मिळते. आजकाल आम्ही १० तास घराबाहेर ऑफिस मध्ये घालवतो त्यामुळे ऑफिस ची वास्तू एका अर्थी आम्हाला जास्त महत्वाची आहे. त्याशिवार घरी आपण बहुतेक वेळा फक्त झोपतो त्यामुळे आपल्या बेडरूम ची वास्तू जास्त महत्वाची ठरते. ऑफिस मध्ये आपण ज्या टेबल वर ८ तास काम करतो ते टेबल सुद्धा एक वास्तूच आहे. 

त्यामुळे आपले घर जरी वास्तुशास्त्र प्रमाणे नसले तरी आपले ऑफिस, टेबल, बेड इत्यादी आपण बदलून तिथे सुद्धा समाधान आणि शांती मिळवू शकतो. 

वास्तूशास्त्र

Contributor
Chapters
वास्तुशास्त्र एक विज्ञान वास्तू शास्त्राची पुस्तकें