दारूपासून सुटका
दारूपासून सुटका
दारुमुळे मृत्युच्या दारी भरत आली घटिका
कैफाच्या कैदखान्यातून करुन घे तू सुटका llधृll
संसारातील दु:खविसरण्या देऊ नका दारुस थारा
दारुच्या नशेत बुडलास जनता करील शिव्यांचा मारा
पैसे जमविण्या खेळू नकोस जूगार मटका
कैफाच्या कैदखान्यातून करुन घे तू सुटकाll१ll
दारुमुळे कर्जांचा महाभयंकर डोंगर उभा राहील
आप्त स्वकीय मित्र कोण तुझ्याकडे पाहील?
शरीरसंपदा होता नष्ट,बसेल त्याचा तुला फटका
कैफाच्या कैदखान्यातून करुन घेतू सुटकाll२ll
करील दारु सार्या कुटूंबाचा सर्वनाश
सार्यातून सूटका करण्या लावून घेशील गळफास
प्रिय सखी तुझी झाली दारु,
बायकापोर तूझ्या बंधनातून करुन घेतील सुटका
कैफाच्या कैदखान्यातून करुन घेतू सुटकाll३ll
बायका पोर तुझी उघड्यावर पडतील
मनोमन तुला शिव्यांची लाखोली वाहतील
बायका पोरांची शपथ तुला,
नकोस घेऊ विषारी दारुचा घुटका
म्हणूनी सुभाष शांताराम जैन सांगतो
कैफाच्या कैदखान्यातून करुन घेतू सुटकाll४ll
स्वरचित कविता :सुभाष शांताराम जैन, 'कस्तुरीराम',
पत्रकार, कवि, लेखक, पत्र लेखक ,छायाचित्रकार, समाज सेवक , दुनिया मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष.
Jainsubhash069@gmail.com
w. a. 8779348256 Mo 9821821885,
साईनाथ सोसायटी, वर्तक नगर, ठाणे 400606.