Get it on Google Play
Download on the App Store

प्रेम - प्रकरण कि जीवन ?

नमस्कार , मी मनोज रा. नारायणकर . प्रेम हा शब्द जेवढा छोटा तेवढाच त्याचा अर्थ मोठा. ह्या शब्दावर लिहण्या इतपत मी काही तेवढा मोठा नाही . पण मला आत्ता पर्यंत प्रेमात खूप अनुभव मिळाला आहे . प्रत्येक येणारी वेळ ही सारखी नसते. तसच काही प्रेमाच सुद्धा आहे . ह्यावर लिहण्याचा उद्देश फक्त एवढाच की आजकाल जे काही प्रेमाच्या नावावर खेळ चालला आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण माझा हेतू कोणाचं मन दुखवायचं नाही . ह्यातील सर्व घटना ह्या सत्य रुपात आजकाल आपल्या सोबत घडणाऱ्या आहेत .  

       प्रेम या शब्दामध्ये जेवढी आपुलकी आहे तेवढाच त्रास ही आहे. प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला जन्मतच मिळणार आईच जे प्रेम असतं ना ते तुम्ही किती ही रक्कम मोजा ते अशक्य आहे तसं प्रेम मिळणार नाही. कारण ती रक्त्ता स्वरूप जोडलेली असते आणि तिचा पोटचा गोळा असल्या कारणाने ती कधीच दुरावा निर्माण करणार नाही .पण तुम्हाला त्या मातृ प्रेमाचा फरक जाणवत नसतो. तुम्हाला फक्त तिची किरकिर वाटते हे खर ! 

        प्रेमाची परिभाषा प्रेमाचा अर्थ अजून कुणाला समजलेच नाही. अनाकलनीय भावना असमज  विचार म्हणजे प्रेम . विल्यम शेक्सपियर यांनी म्हटल्याप्रमाणे ,,खरे प्रेम म्हणजे काय आत्तापर्यंत कोणाला समजू शकले नाही. परंतु साधारणतः प्रेम म्हणलं की समोर एकंद जोडपं किंवा मग लग्नाचा प्रेम असंच चित्र डोळ्यासमोर तरंगत.

  प्रेमाचे काही प्रकार आहेत अस मगाशी मी म्हणालो , तर आपल्या वयाची वाढ होत असताना त्यातच हे प्रेमाचे प्रकार चालू होतात. लहान असल्यामुळे आपल्याला कुटुंब या शिवाय कोणी नाही हे वास्तव असते. पण आपण जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून पुढे जातो ,तेव्हा "समाज काय ?" ह्याची जणीव होते. जसे जसे आपण मोठे होतो , आपल्याला समजू लागते तेव्हा आपण पाठी मागे वळून पाहत नाही. 

       प्रेमाला वय नाही ही मात्र काळया दगडावरची रेघ आहे. प्रेम हे आई - मुलगा / मुलगी , बाबा - मुलगा / मुलगी , भाऊ - बहीण ,आजोबा - नातवंड , मित्र - मैत्रीण , तरुण - तरुणी यांच्यातील एक इतका खोल संबंध असतो की ज्याचा विचार करणे आवश्यक नाही कारण ते अशक्य आहे . ह्या सर्वातून आपले जीवन आनंदमय , सुखमय , दुःखमय अवस्थेत जात असते. प्रत्येक नात्यातले प्रेम ह्या सर्वाचा प्रेमाचा प्रकार वेगळा आहे.

आपल्या जीवनात फक्त दोन प्रकारचे प्रेम आहेत, ज्याला आपण जास्त महत्त्व देतो . ते म्हणजे एक तर आईच प्रेम जीवनाची सुरुवात ज्यातून होते, ज्याला तिन्ही लोकात स्थान आहे, दुसरे कोणी करू शकणार नाही आणि दुसरे तरुण पिढीतील प्रेम जे जीवनाच्या शेवटपर्यंत  आहे. 

        प्रेमाचा दोन बाजू असतात . जसे "एका हाताने टाळी वाजत नाही " तसे एकतर्फी प्रेम होत नाही . प्रेम हे दोन्ही बाजूने झालं तर ठीक नाहीतर ह्याचा परिणाम वेगळाच होतो. म्हणजेच एकतर्फी प्रेम , हा सर्वात भयंकर प्रकार आहे . जी व्यक्ती आपल्याला अगदी मनापासून आवडते , याच विरुद्ध त्याच व्यक्तीला आपण जरा सुद्धा आवडत नसतो. हा एकतर्फी प्रेमाचा प्रकार झाला. आणि हा खूप प्रचलित आहे. आपल्याला एखाद जोडपं दिसल तर आपल्या मनात एकाच म्हण येते ती म्हणजे " चांगल्या झाडावर नेहमी माकडच चडतात ".  

      प्रेम म्हणजे अनोखी ओढ़ ..त्याचाच द्यास ...प्रत्यक्ष भेंट जरी नाही झालीना ....तरीही स्वप्नात आणि विचारानच्या महेफलित होणारी साखर भेट .. आणि त्याच भेटीच्या  गोडीची चव चाखत प्रत्येक्श भेट होईल याची मनाला काढलेली समजूत .प्रेम म्हणजे प्रार्थना आणि प्रेम म्हणजे त्याग ...प्रेम म्हणजे पूजा ...प्रेम म्हणजे ह्रुदयाच्या गाभाऱ्यात आपण जपून ठेवलेला हीरा....

     प्रेम हे आंधळ असत अस म्हणतात. तरुण पिढीतील प्रेम होणे हे बहुतांश साहजिक आहे. कारण ह्या वयात मुलांमध्ये मुलींमध्ये एकमेकात आकर्षण वाटू लागले . आणि ह्यातूनच प्रेमाची सुरुवात होते. पण मित्रानो आजकाल प्रेम शब्द हा निव्वळ टाईमपास ह्या अर्थाने वापरला जातो. हा टाईमपास २ दिवस किंवा २ अठवड्यापुढे जात नाही. ह्या मध्ये लुटारू लोकांची सभसत्वता जास्त असते.  काही लोक याचा वापर खूप हळव्या पणाने करतात . ज्यात त्यांचे तनमन हरपले असते . म्हणजे प्रेम मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. 

      खरतर प्रेमाची आजचा युगात किंमत राहिली नाही . प्रेमात दोघांमध्ये तिसरा आला की प्रेमाच प्रकरण चालू होत . आपल्याला जवळच्या व्यक्तिशिवाय त्याची जास्त ओढ लागते .आत्ताचा वेळेला हेच खूप वाढल आहे .मी माझा मुख्य भागाकडे येतो आता. 

         जेव्हा तरुण तरुणी एकमेकांना पहिल्यांदा पाहतात तेव्हा पासून प्रेमाची खरी सुरुवात होते. आणि प्रेमाच जीवनात रूपांतर होते. कधी आम्ही एकत्र होऊ हा विचार मनात येत असतो. ह्या काळात ना भूक लागते ना तहान . एकमेकांना मिळवण्यासाठी खूप धडपड चालू असते . आणि ह्या मध्ये मुख्य उपस्थिती - सहकार आपल्या मित्रप्रेमाचा असतो . हे प्रेम एखदा मिळाले की संपल सगळ . आपल या जगात दुसर कोणीच नाही फक्त आपण दोघं हा भाव निर्माण होतो. सुरवातीला खूप छान चालत असत. दोघे एकमेकांसाठी खूप काही असतात. संपूर्ण जग जिंकल्या सारखं वाटतं. मी तिच्यासाठी काय करू काय नको असं सतत वाटत. फिरायला जाणं , खायचं प्यायच नुसता आनंद असतो . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही वाद निर्माण झाला तर एकमेकांना समजून घेणे . हे सर्व निरागस पणे चाललेलं असतं. त्यात रुसवा फुगवा हे तर साहजिक आहे. 

    प्रेमाच जीवनात रूपांतर होण्याची सर्वात सुरू होते ही " विश्वास " ह्या शब्दाने . हा शब्द नसून खूप काही शिकवून जाणारा वेळ असतो. रोज सकाळी उठतच तिला sms करण किंवा तिचा आलेला sms. पाहणे हे खूप आकर्षक असत. ह्यातूनच दिवसाची सुंदर सुरुवात केली जाते. किती वाजता उठलीस पासून आता तरी झोप इथर्यंतचा सर्व मायना ह्यात असतो . आज किती वाजता भेटायचं कुठे भेटायचं ह्यावर चर्चा चाललेली असते. आणि एकदा समोर भेटल की संपलं समोर कोण असो वा नसो आपल्याला काय फरक जाणवत नसतो. 

         दोघं पैकी एखादा आजारी पडला की दुसऱ्याचा जीव टांगणीला लागतो . कधी बरा होईल कधी सर्व ठीक होईल अशी काळजी लागते . दोघांपैकी एकाची मौल्यवान वस्तू हरवली  ती शोधताना जी हकीकत घडते ह्याची मज्जा काही वेगळीच असते. वस्तू भेटली नाही की काहीही करून त्याला ती परत नवीन घेऊन देणे त्याला नेहमी आनंदी बघायचं ही प्रेमळ भावना वेगळीच  असते. कोणता नवीन चित्रपट लागला की कधी जायचं ह्यावरून सुद्धा वाद होतात हो ! 

     आपल हक्क दाखवण्याचं हे एक ठिकाण असतं . पण ज्या वेळी पैसे नसतात तेव्हा  पोट रिकाम असला तरी भरल्या सारखं वाटतं. दोघांनी एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे असते.आज काय झालं ? काय केलं ? काय खाल्ल ? अशा शुल्लक गोष्टी सांगत बसायचं .सारखं कॉल , एकमेकांपासून काही लपवा नाही . सर्व मोकळ्या मनाने . सुरवात ह्या सर्व गोष्टीतून होतेच . वाट पाहणं हे तर एक ठरलेलं असतं. दोघांपैकी एकाला तरी उशीर होतोच . आणि वाट पाहणाऱ्याच्या  जवळ आल की पाठी मागून जाऊन बोलायचं कधी पासून मी इथंच उभा आहे किती उशीर. घरात काही केलं असेल तर गपचुप घेऊन यायचं . बाहेर फिरायला गेल्यावर काही आवडल तर घ्यायचं आणि भेटल्यावर द्यायचं . यातील आनंद वेगळाच असतो .  ह्या सर्व गमतीदार गोष्टी घडतच असतात.

    प्रेम खूप सुंदर आहे फक्त ते समजून घेता आलं पाहिजे , पारखता आलं पाहिजे, सगळ आयुष्य सुंदर बनून जाईल जर प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले तर ,,,,

         जसे जसे दिवस सरतात तसे तसे ह्यातील आपुलकी कमी होऊन दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते . आणि ही सूर्वात कोणा एका कडून होते . कारण त्याला किंवा तिला ह्याचा कंटाळा येत असतो . काय बोलायचं रोज ह्याचा सोबत . काय सगळ सांगत बसायचं . घरच्यांचा त्रास घरतली काम करायची का बोलत बसायचं . सारखं येणारा कॉल , sms  कंटाळा यायलागतो.हे दुर्लक्ष करणारा करत असतो . पण ह्या विरुद्ध जो एकदाही कंटाळा न करता sms . करत असतो . तो काळजी करू लागतो . काय झालं असेल ! मला उत्तर का नाही येत आहे समोरून . माझं काही चुकला का ! मी काही चुकून बोललो का ? हे प्रश्न सारखं मनात येतात . आणि वारंवार पण बोलण्याचा प्रयत्न करतो तर समोरून उत्तरच येत नाही. आता तरी उत्तर येईल ह्याची वाट पाहत बसायचं . 

  दुसऱ्या दिवशी उत्तर येत तेव्हा काही नको तेच उत्तर असत . तरीही मान्य करण्यास तयार असतो आपण. काय करायचं प्रेमात आपण सर्व त्यागून बसलेलो असतो . पण आपण कधीच समोरच्याला दुखवेल असे बोल कधी काढत नाही . कारण आपल्याला दुरावा निर्माण होणार तर नाही ना ! याची भीती वाटत असते. सर्व सहन करत दिवस काढत असतो . पण जेव्हा आपल्या मनात हा विचार येतो की आपण पण असाच वागायचं पूर्ण ठरवतो आणि नंतर आपणच विचार करतो असा नको करायला असेल काही कारण . पण हे कारण खरच आहे का नाही . अद्याप कोणाला माहीत नाही. ( कदाचित तुमचा सोबत पण झालं असावं . मला कोणाचं मन नाही दुखवायचं पण सत्य आहे )

         तुमचा प्रेमात सर्व सुरळीत चालू असत. रोज भेटायचं बोलायचं मस्ती करायची सर्व ठीक असत. पण सर्व दिवस सारखे राहत नाहीत . रोज भेटणं नाही बोलणं मस्ती काही प्रमाणात कमी होते. कारण आपण ज्या ठिकाणी कामाला किंवा शिकायला जात असतो तिथे कोणी तरी आपल्याला आवडायला लागलेला असतो . आकर्षक वाटू लागतो . ह्यामुळे प्रेमाला वळण मिळते. पण तुम्ही हे सर्व तुमचा प्रियकराला (तिला किंवा त्याला ) सांगत नाही . तुमचं त्याचाशी होणार बोलण कमी होत . काळजी करणार मन कुठे तरी दुसरीकडेच असत. पण समोरचा सतत विचारात असतो काय झालं असेल . काही शंका तर नाही ना .पण त्या व्यक्तीस हे सत्य माहीत नसतं. आणि ह्या सर्वातून त्या नवीन व्यक्ती कडून आपल्याला आपली किँमत कळते किंवा धोका मिळतो . तेव्हा आपण परत आपल्या व्यक्ती कडे येतो.  पण हे सर्व घडे पर्यंत समोरचा निशब्द असतो . कारण त्याला ह्यातील कणभर सुद्धा माहीत नसत . पण जेव्हा ह्या व्यक्तीस काही काम असत किंवा कोणासोबत तो जातो तर त्याचा मनात हाच विचार निर्माण होतो की ह्याच कुठे तरी चालल आहे बाहेर. ( हे त्या व्यक्तीच्या मनात येतं ज्याला पाहिलं प्रेम असून दुसर हवं होत.  पण तेतून तर आपली किँमत समजली .) पण मित्रानो खर तर अस काही नसतं. " चोराच्या मनात चांदण ". ही म्हण कितपत खरी तितपत. कारण तो अस काही करू इच्छित नसतो . त्याला आपल्या व्यक्ती शिवाय दुसरा कोणी नकोच असत .पण जेव्हा विश्वास आपल्याला असतो तेव्हा कोणालाच नसतो . आणि आपण जेव्हढे स्वतःला ओळखू शकतो त्यापेक्षा दुसर कोणीच नाही ओळखू शकत. मित्रानो खरतर ह्यातून ज्याच खर प्रेम असत ना त्याचा जीवनात असे प्रकार घडणे शक्य असतातच .

        आता वेळ येते प्रेमातील सर्वात घाणेरडा प्रकार " संशय " . आणि इतूनच जीवनात वेगळी वाट निर्माण होते. जेव्हा आपल्याला फोन येतो किंवा आपण करतो आणि त्याच वेळात बिझी कॉल आला तर १००% पैकी ३०% प्रियकर / प्रेयसी एकमेकांना समजून घेत असतील. ( पण ह्यात बिझी कॉल हा किती प्रमाणात खरात हे अजून कळलेलं नाही . ) प्रसंगी आपले सिम कंपनी वले सुद्धा सामील असतात . आपण त्याच व्यक्तीला कॉल लावत असतो आणि तो सुद्धा आपल्याला फोन करत असतो तेव्हा येणारा बिझी कॉल . ह्या सर्वातून आपण समजून घेणे हे महत्त्वाचं . पण समजायचं नसेलच तर अशक्य . समोरचा समजाऊन थकतो पण ऐकणारा त्या भावनेत नसतो. आणि वाद होतात. विश्वासात घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पण समोरचा हेच करतो . असे ठाम मत असेल तर अशक्य आहे . ह्यातून प्रेमातून विश्वासाची जाणीव होते.  सतत येणारा कॉल हा येणं ही बंद होत. खर तर मित्रानो समोरचा आपल्याला समजावत असेल ना तर तुम्ही ती गोष्ट ऐकून घ्यायला हवी . असं ही असू शकत जो आपण विचार करतो ते कारण तेच नसेल. हा झाला कॉल चा मुद्दा . मित्रानो प्रेमात ना आपुलकी असायला हवी तरच ह्या गोष्टी आपल्या जीवनात येणार नाहीत. 

          बहुतांश वेळा बाहेर फिरायला गेल्या ठिकाणी मुलाने एका मुली कडे पाहिले  किंवा मदत केली तर झालच ! ह्यातून निघणारे विचार हे खूप टोका पर्यंत जातात. आपण बाहेर कशासाठी आलो हे राहील बाजूला . तू तिच्याकडे बागितलास  का किंवा तू मदत का केलीस ! माझामध्ये काही कमी आहे का ? का तीचात काय जास्त आहे ? ह्यावरून वाद चालू. खर तर ना मी मुलांवरून बोललो कारण त्याच ठिकाणी मुलीने एखाद्या मुलाची मदत केली असती किंवा बागितल असत तर , त्या मुलाने संशय घेतलाच नसता . असे प्रकार खूप वेळा आपल्या सोबत घडत असतात. ह्या वरून चाललेला वाद हा प्रचंड ही होतो ,  हो ! मी अस म्हणत नाही की फक्त मुलीचं संशय घेतात . मुले सुद्धा संशय घेतात . पण फरक फक्त तेवढाच असतो मुलींचा वागण्यातून आणि बोलण्यातून संशयपणा  लगेच उघड होतो आणि मुले बोलायला थोडी घाबरतात कारण त्यांना समोरच्याला दुखवयला आवडत नसत.हा भाग झाला संशयाचा .

        प्रेमाच प्रकरण होण्यात ही काही भाग सामील असतात.   प्रेमात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या एक म्हणजे विश्वास आणि  निःसंशयपण . जर ह्या दोन प्रेमाचा बाजू कोलमडला तर प्रेमाच वजन असमतोल होत.  तुम्ही ना एकदा आपल्या प्रियकरा सोबत ना त्या न आवडणारी गोष्ट करून बघा. जर तो हसून दुर्लक्ष करून परत आहे तसाच वागला तर ठीक नाहीतर त्याची तुमचा विषयी मनातील भावना व्यक्त होईल . म्हणजेच राग येईल. तुम्ही त्यासाठी सुरवातीला पासून काय करता हे फक्त तुम्हाला माहीत असत. आणि जर समोरचा खरा असेल तर त्याला सुद्धा . आणि हीच आठवण पुढे पर्यंत घेऊन जाऊ शकतो. नाही तर तुम्ही त्या साठी काही केलं याची जर किंमतच राहत नसेल तर समजून जवा की तुम्ही एकट पडण्याची सुरवात झाली आहे. कारण आपल जर एक वागणं हे सर्व विसरू पाडत असेल आपण काय केलं नाही त्या व्यक्ती साठी तर जीवनात काय किंमत राहणार. आपण फक्त त्या व्यक्ती च हातातील बाहुले बनून राहू . म्हणजे समोरचा बोलेल तेव्हाच ठीक नाहीतर नाही. आणि ह्या गोष्टी मधून जर खरच कंटाळा येतं असेल तर काही प्रेम कथा इथ्यच संपत. कारण " खऱ्या प्रेमाला ह्या जगात किंमत नाही ."

    

   पण ह्यातून खरच जे जोडपं मार्ग काढत किंवा एकमेकांना समजून घेतात तेच प्रेमाच जीवनात रूपांतर करतात. कधी एकाकडून आवाज वाढला तर दुसऱ्याला शांत होन गरजेचं असतं . कारण, " भांड्याला भांडं लागलं तर आवाज वाढतो ". जीवनात अश्या काही घटना आपल्या सोबत घडत असतात . त्यातून आपण सावरून एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचे असते . आणि हेच खर जीवन आहे .

प्रेम - प्रकरण की जीवन ?

मनोज रा. नारायणकर
Chapters
प्रेम - प्रकरण कि जीवन ?