आपल्या घरीच रहावे
स्मशान होतील शहरे
ओसाड पडतील गावे
संकट ओळखून ज्याने त्याने
आपल्या घरीच रहावे
महानगरातून गावाकडे
सुटले आहेत लोंढे
आपल्याच हाताने डोक्यात आपल्या
घालत आहेत धोंडे
बेरजेत आहेत रुग्ण
त्यांचा गुणाकार नका करु
लागणार नाही वेळ आपला
भागाकार होईल सुरू
प्रशासनाला साथ देऊन
पाळू जरा शिस्त
अनमोल आहे जीवन
त्याचा करु नका अस्त
विदेशातील संकट पाहून
होऊ जरा गंभीर
सरकारच्या पाठीमागे
उभे राहू खंबीर