रहस्य
शंकर ह्या पेशंटच्या विचाराने डॉक्टर हिरेमठचे डोके भणभण करत होते. ७ वर्षे आधी एका लहानग्यावर केलेली सर्जरी अचानक दुसर्या पेशंट च्या तोंडून कशी काई ऐकू आली ? डॉक्टर हिरेमठनी किंग्न्स हॉस्पिटल मधून राजीनामा दिला असला तरी त्यांची मैत्री मात्र कायम होती. हॉस्पिटल मध्ये मरण पावलेला पेशंट बॅंकेत काम करणारा साधारण क्लर्क होता. डॉक्टर हिरेमठनी त्याच्या फॅमिलीला शोधून त्यांच्याशी सुद्धा चौकशी केली पण त्यांना सुद्धा विशेष काहीही ठाऊक नव्हते. पेशंट काही दिवस आधी नागपूर मध्ये कामासाठी गेला होता ह्या व्यतिरिक्त काहीही माहिती त्यांना हाती आली नाही.
लोखंडवालातील आपल्या प्रशस्त अपार्टमेंट मध्ये हिरेमठ सिंगल माल्ट पीत बसले होते आणि त्यांचे विचार चक्र चालू होते. पुढे काही तरी अघटित असे घडेल हे त्यांचे मन त्यांना सांगत होते. आणि इतक्यांत त्याची डोरबेल वाजली. त्यांचा नोकर सदा ने दरवाजा उघडला. 'डॉक्टर साहेब, कोणी मॅडम आल्या आहेत" त्यांने सूचना दिली.
डॉक्टर हिरेमठनी महिलेचे स्वागत केले. ट्रेंडी जीन्स आणि टॉप मधील ती युवती तरुण होती. "हॅलो डॉक्टर, मी डॉक्टर रशिदा" तिने आपला हाथ पुढे केला. "आपण सुद्धा डॉक्टर आहात ?" डॉक्टर हिरेमठनी विचारले. "ओह, मी तुमच्यासारखी डॉक्टर नाही. मी phd इन क्रिमिनॉलॉजि, मी सध्या IB मध्ये आहे" तिने हसून उत्तर दिले. "सिक्रेट एजन्ट" ? डॉक्टर हिरेमठचे डोळे विस्फारले.
"तसेच काही तरी. तुमच्याशी काही तरी बोलायला आले आहे" तिच्या आवाजांत थोडा नाही तरी संकोच जाणवत होता.
"आमचा एक एजेंट प्रवीण कुमार काही दिवस आधी अपघातांत वारला. त्याच्या शेवटच्या क्षणी डॉक्टर म्हणून आपण त्याच्या बरोबर होता. त्याशिवाय आपण म्हणे त्याच्या फॅमिलीला सुद्धा जाऊन भेटला आणि त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही लगेच राजीनामा सुद्धा दिला ? प्रवीण कडे खूप गुप्त माहिती होती जी त्याने अजून आम्हाला दिली नाही. पण प्रवीणच्या मृत्यूचा तुम्हाला इतका धसका का ? "
डॉक्टर नरेश हिरेमठ तिचे प्रश्न शांत पणे ऐकत होते. म्हणजे प्रवीण एक साधारण बँक क्लार्क नव्हता. तो सुद्धा IB मध्ये होता. मंत्री गायकवाड ह्यांचा मृत्यू आणि ह्या सर्वांचा तर काही संबंध नसेल ? डॉक्टर विचार करत होते.
"रशिदा, माझ्या राजीनाम्याचा संबंध प्रवीणच्या मृत्यूपेक्षा त्याच्या शेवटच्या शब्दांशी आहे. ७ वर्षे आधी मी एका लहान मुलाचा जीव वाचवला होता. शंकर गोंदिया हे त्या लहान मुलाचे नाव. त्याच वेळी मंत्री गायकवाड सुद्धा आमच्या हॉस्पिटल मध्ये होते. मी त्यांच्या ऐवजी शंकरावर सर्जरी केली आणि त्याचा प्रतिकूल परिणाम माझ्या करियर वर झाला. माझ्याच हॉस्पिटल मध्ये मी अस्पृश्य झालो. पण तरी सुद्धा माझ्या हृदयांत त्या मुलाबद्दल करुणा होती. पण प्रवीण ज्या वेळी हॉस्पिटल मध्ये मरत होता तेंव्हा त्याने माझ्या कानात मी शंकर ला वाचवायला नको होते असे सांगितले. शंकर विषयी माहिती त्याला कशी होती ? IB आणि माझा संबंध काय ? मी त्यामुळे थोडा डिस्टरब झालो होतो आणि शंकर ला शोधून काढेन अश्या हेतूने मी राजीनामा दिला. तेंव्हापासून ह्या मुलाच्या शोधांत मी आहे. "
रशिदा अतिशय ध्यान देऊन हे सर्व ऐकत होती. डॉक्टर हिरेमठ तिचे हावभाव न्याहाळीत होते पण तिच्या चेहेर्यातून काहीही एक्सप्रेसशन्स येत नव्हते.
"शंकर गोंदिया ? सॉरी सर पण हा अँगल विचित्र वाटतोय. हा मुलगा गडचिरोलीतील होता काय ? गोंदिया लोक त्याच भागातले ना ? " तिने विचारले.
"वेल... काहीच ठाऊक नाही हा १० वर्षांचा मुलगा एकमेव सरवाईवर होता, त्याचे वडील आणि रिक्षावाला दोघेही अपघातांत ठार झाले होते. त्याला डिस्चार्ज नक्की कधी मिळाला आणि तो कसा हॉस्पिटल बाहेर गेला हे सुद्धा आम्हाला ठाऊक नाही"
राशिदच्या चेहेऱ्यावर खूप वेळाने भाव अवतरित झाले.
"सर, प्रवीण गडचिरोलीत एक मिशन वर गेला होता. तुम्ही डॉक्टर असल्याने तुमच्यापासून लपवत नाही. गडचिरोलीतील काही गाव अतिशय दुर्गम आहेत. नक्सलवादी अश्या ठिकाणी सक्रिय आहेत आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आमचे लोक सुद्धा. पण काही महिन्यात आमचे अनेक अजेंट्स ह्या भागांतून गायब झाले आहेत. राजकीय दबाव असल्याने आम्ही जास्त लोक पाठवू शकत नाही पण प्रवीण आमचा अत्यंत चांगला एजन्ट होता. तो ह्या लोकांच्या शोधांत गडचिरोलीत गेला होता. त्याने प्राथमिक रिपोर्ट मध्ये ह्या भागांत एक महामारी पसरली आहे असे लिहिले होते आणि जास्त माहिती घेऊन तो परत मुंबईत आला होता. माझ्या मते शन्कर गोंदिया आणि प्रवीण चे कनेक्शन गडचिरोली मध्येच जमले असावे." तिने माहिती दिली.
हिरेमठनी आपल्या डेस्क वरून शंकर ची फाईल तिच्या हातांत दिली.
"रशिदा, मी साधारण डॉक्टर आहे पण जर खरोखरच महामारी पसरली असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. शंकर गोंदियाचे काय झाले हा प्रश्न मला जीवनभर सतावेल. मी गडचिरोलीत गेलो तर कुणी IB वाले मला मदत करू शकतील ?"
"राशीदा ने आपला हात पुढे केला. Anytime डॉक्टर. IB मध्ये मी जुनिअर आहे. ह्या पुरुषांच्या दुनियेत माझ्या सारख्या महिलेला स्थान मिळवणे अवघड आहे. पण मी गडचिरोलीत जाणार आहेच, तुम्ही सुद्धा येऊ शकता. अर्थांत कागदोपत्री आम्ही तुम्हाला काहीही हमी देऊ शकत नाही पण तुमचा संबंध ह्या केसशी आहे हे मला सुद्धा जाणवत आहे. लेट्स गो tomorrow ? "
हिरेमठनी हसून तिच्याशी हस्तांदोलन केले आणि तिला सोडायला खाली सुद्धा गेले.
काही तरी रहस्य त्यांना दिसत होते पण त्याचा उलगडा अजून होणे बाकी होते.