: निर्भया :
नाव ठेवले निर्भया,काय अर्थ हो त्याचा,
कोणी केले निर्भय त्याना,
मुके कले, मती कुंठली,
दाबली तयांची वाचा.
आई वडिलांची लाडली,
गेली बाहेर चौफेर जग जिंकण्या,
वेडी आशा, सावित्रीच्या या लेकींना,
ठायी ठायी उभे राक्षस, जीव तयांचा घेण्या.