डॉ.अशोक यांच्या जिवनातील एक प्रसंग
डॉ.अशोक यांचा आमच्या गावापासुन 3 कीमी अंतरावर एक दवाखाना आहे.ते हपत्यातुन तीन चार दिवस दवाखान्यात थांबतात,आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा सर्व परिसर आदिवासी आहे. डॉ मुळचे नाशिक चे रहिवासी आहेत ते नाशिकहुन ये जा करत असतात. आमच गाव ते नाशिक अंतर 75 कीमी आहे ते त्यांच्या मोटारसाईकल वरुन प्रवास करत असायचे.
त्यांना रस्त्यात तीन घाटातून त्यांचा प्रवास होता.रात्री बेरात्री ते गाडीवर जगंल झाडझुडपांच्या रस्त्यातुन नेहमी प्रवास करत असत. एकदा नाशिकहुन ते निघाले 6 वाजेच्या दरम्यान त्यांना घाटाच्या पायथ्याशी येता येता 11:30 झाले घाटाच्या पहील्या वळणावरती चिंचेच झाड आहे,त्या झाडाजवळ लहान मुल एका सफेद कपड्यावर रडतांना डॉक्टरांना दिसले,हे डॉक्टर असल्यामुळे भुता खेतांवर यांचा विश्वास नव्हता.त्यामुळे गाडी थांबवुन यांनी मुलाला उचल, मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि आपल्या पाठीवर त्यांनी मुलाला बांधले आणि आपल्या वाटेनी निघाले पुढे दुसरं वळन सोडल्यावर त्यांना जाणवले की आपला गळा कुणीतरी दाबत आहे. पण गाडीच्या आरशात त्यांनी बघितल्यावर त्या मुलाचे भयंकर रुप झाले होते त्याते डोळे लाल झाले होते नखं मोठी झाली होती,डॉक्टरांनी मुलाला फेकले आणि तिथुन पळाले..
मित्रांनो तो घाट भुतांसाठी प्रसिद्ध आहे त्या घाटात खुप माणसांना अनुभव आलेले आहेत.तिथुन पुढे डॉक्टरांनी चारचाकी गाडी घेतली व प्रवास दिवसा करु लागले..