Get it on Google Play
Download on the App Store

शोध एक ऐतिहासिक दरवाज्याचा

         आज शनिवार म्हणजे भटकंतीचा दिवस. गौरव हा मुलगा म्हणजे  त्याने स्वतःला किल्यांसाठीअर्पणच करून टाकला आहे. किल्ले फिरणे व लोकांना  दाखवणे, किल्ल्यावर गड संवर्धन करणे असे भरपूर काही  काम करत असतो. शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस त्याने..  किल्ल्याचा दिवस म्हणून आपल्या वेळापत्रकात छापूनच टाकलय. असच आज शनिवार होता म्हणून तो कुठे जायच विचार करत असताना त्याच्या मनात एक गोष्ट आली की सध्या एवढा किल्यांवर काहीना काही मिळत तर मग आपल्या जवळच्या माहुली किल्यांवर सुद्धा काही ना काही असेल आपण गणेश सरांना घेऊन जाऊ.गणेश सर म्हणजे त्याचे गुरुवर्य होते त्यांनी खूप किल्ले चढ केले आहेत व तसेच खुप किल्यांवर गडसंवर्धन असे उपक्रम राबवतात सध्या ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत म्हणून त्यांना घेतलं तर खूप काही मदत भेटेल त्यांना माहुलीची पण खूप काही माहीत आहे असं. तो विचार करत बसला.आणि मनातच त्याने आता ठाम विचार केला की आज माहुलीवर जाऊन काही तरी शोधायचं.आणि लगेच त्याने गणेश सर यांना फोन लावला.
गौरव : "हॅलो!! गणेश सर.."

गणेश सर : "बोला ना सर काय झालं.."

गौरव: "काय सर आम्हाला तुम्ही सर बोलता.."

गणेश सर: "चालते की तुम्ही पण मोठी माणसं आहे की. बोला का फोन लावला आहे??"

गौरव:"माझा आज विचार होता की आज संपूर्ण
माहुली फिरायची बघू काय भेट का तोफ वैगरे.."

गणेश सर : "ठीक आहे जाऊ ना मला पण आपण गुरू भाऊंना पण घेऊन जाऊ आणि अजून कोणी तरी बघ येतो का गुरू भाऊं ना सर्व माहुली माहीत आहे .."

गौरव: "ठीक आहे सर आज रात्री निघू मी येताना सुयोग ला घेऊन येतो.आणि गुरू भाऊ ना बोलो तर ते लगेच यायला राजी होतील .."

गणेश सर : "ओक! चला मग भेटु रात्री गुरू भाऊच्या                                           घरी बाय!"

फोन बंद झाला गौरव खूप खुश होता. त्याने लगेच सुयोग ला मेसेज केला आणि तिकडून पण लगेच हो म्हणून मेसेज आला.माहुली वर जायचं बोल तर कोणी नाय बोलतच नाही कारण माहुली आहेच अशी की सगळयांना त्याच्या निसर्गरम्य वातावरणाने वेड लावणारी. माहुली किल्ला हा  ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. आता तुम्ही म्हणाल दुर्गत्रिकूट म्हणजे काय .दुर्गत्रिकुट म्हणजे एकाच डोंगरावर असलेले  तीन गड, जे की डोंगराला असलेल्या घळी मुळे एकमेका पासून वेगळे अस्तित्व निर्माण करतात. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. हा किल्ला तिथे मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण. कोणाही निसर्गप्रेमीस माहुलीच्या निसर्गसौंदर्याने वेड लावून जाते. अनेक सुळके असलेला आणि अनेक ऐतिहासिक वास्तूनी भरलेलं हा किल्ला म्हणजेच माहुली  म्हणून ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.अशा हा माहुली किल्ला आहे.
            गौरवने माहुली ला जायला तयारी सुरवात केली . व रात्री घरातून गौरव निघाला रस्त्यातच सुयोग आणि गणेश सर भेटले आणि  ठरल्या प्रमाणे सगळे गुरू भाऊ च्या घरी गेले .गुरू भाऊ हे माहुली च्या पायथ्याशी राहतात त्यांना माहुलीचा बहुतांश भाग माहीत आहे . म्हणून गुरू भाऊंना सोबतीला घेऊन जाणार होते.
     तिघांना पण बघून गुरूभाऊ घरातून बाहेर आले आणि आनंदात सगळ्यांच स्वागत केलं.घरातून पाणी आणून सगळयांची विचारपूर करायला सुरुवात झाली.

गुरूभाऊ : "आज तिघेच निघाले माहुली चढायला.काय विशेष.."

गणेश सर :"आम्ही तिघे नाही चौघे आहोत..."

गुरू भाऊ : "अजून कोण येत आहे का???"

गणेश सर: "हा तुम्ही एक आहात ना..."

गुरूभाऊ : "कोण मी??आधी सांगायचं ना सर तुम्ही दरवेळी येतात आणि मला न सांगता घेऊन जाता...."

गणेश सर :" मला माहित असत ना तुम्ही येतीलच म्हणून आणि तुम्ही काधी नाही बोलत नाही म्हणून बोलो डायरेक्ट घेऊन जाऊ.चला येताना मग .."

गुरू भाऊ : "ठीक आहे चला मग मला पण खूप इच्छा झाली होती आणि तुम्ही पण आहेत तर भटकंती ला पण खूप मज्जा येईल..."

गणेश सर: " कुदळ फावडी पण घ्या काही थोडं साफ सफाईच काम असेल तर ते पण करून घेऊ..."

गुरू भाऊंनी पण डब्बा व समान घेऊन जायला निघाले सगळे जण माहुली च्या पायथ्याशी येऊन पोहचेल आणि शिवाजी महाराज आणि गणेशाची वंदना करून चढायला सुरुवात केली . दोन टेकड्या न थांबता त्यांनी चढ केला आणि गौरव आणि सुयोग खूप थकून गेले होते कारण लागोपाठ न थांबता दोन देवड्या चढणं म्हणजे खूप कठीण असत.तेवढ्यात गौरव बोला " सर जरा अराम करूना खूप थकलो आहेत आम्ही.पाणी तरी पिऊन द्या..."

गणेश सर: "काय सर तुम्ही लगेच थकले आत्ताच थकले तर पुढे कस होईल.."

गौरव: "नंतरच तर माहीत नाही पण आता थोडं अराम नाही केला तर पुढे जाऊ नाही शकणार..."

गणेश सर : "ठीक आहे , कर थोडं अराम करू आणि लगेच निघू किती दम खायचं आहे ते खा आणि किती पाणी प्यायचं आहे पी नंतर तुला सगळं वरती पोचल्यावर भेटेल..."

गौरवने मान खाली घालून थोडं थकलेल्या मनाने पटापट पाणी पिऊन आडवा पडला त्याच बरोबर सुयोग पण खूप थकला होता तो पण निवांत आडवा पडला होता.
सुयोग: "किती मस्त हवा सुटली आहे ना अस वाटे इथेच झोपून जावं.."

गुरू भाऊ : "हा ठीक आहे, तू एकटा झोप इथे आम्ही जातो पुढे उद्या सकाळी उठून ये..."

सुयोग: "हा हा हा......ठीक आहे,"
(सुयोग हसून त्याना बोलु लागला.)

गणेश सर : "चला आता खूप झाला अराम लवकर वरती पोहचायच आहे वरती किती झोपयच आहे झोपा..."

सगळे जण उठले आणि पुन्हा वरती चढायला सुरुवात केली. हळू हळू करून ते वरच्या टोकाला पोचले. आणि सुखाचा श्वास सोडला. गौरव आणि सुयोग मातीतच जाऊन झोपले.
गौरव: "आता किती मस्त वाटत थंड गार. आज पाहिल्यादा एवढा थकून गेलो आणि आज रेकॉर्ड पण केला एवढा लवकर वरती चढलो..."

गणेश सर: "हा माझ्या बरोबर येशील तर होईलच ना.."

सगळयांनी आपले डब्बे काढले आणि खायला सुरवात केली. आणि पटापट खाऊन झोपायची तयारी ला लागले.
गणेश सर: "उद्या लवकर उठायचं आहे उठून पुन्हा महादरवाजा गाठायचा आहे.तरी सगळयांनी सहा वाजता उठा जो उठणार नाही त्याला शिक्षा भेटेल आणि ते तुम्हाला माहीत आहे ती काय असते..."

गौरव: "नको बाबा तुमची शिक्षा खूप खतरनाक असते
मी झोपतो बाबा... "

अस बोलून गौरव पटकन अंथरुणात झोपायला गेला आणि सगळे हसत हसत ते पण  अंथरुणात झोपायला आले.मस्त हवा सुटली होती आणि सगळं वातावरण थंडामय झालं होतं.
सुयोग: "मस्त वाटतय ना या निसर्गरम्य ठिकाणी अस वाटतं स्वर्गातच आलोय..."

गुरू भाऊ: "हा ना माहुली वर येणं आणि अस थकून निवांत पडलो की झोप पण मस्त लागते.."

गौरव आणि गणेश सर कधीच झोपले होते .सुयोग आणि गुरू भाऊ पण थंड वातावरणच आनंद घेत झोपली.
      सकाळ झाली होती आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे मस्त आवाज येत होती त्या आवाजाने गौरव उठून बसला आणि एका दगडा वर जाऊन बसून शांत वातावरणच आनंद लुटत बसला तेवढ्यात गणेश सर उठून बसले आणि गौरव ला पाहिलं
गणेश सर : "अरे वा,लवकर उठला ते पण न उठवता चांगली गोष्ट आहे ही आणि गुरू भाऊ कुठे आहेत.."

गौरव: "गुरू भाऊ गेले महादरवाजाकडे लाकडं गोळा करायला आणि चहा ची तयारी करायला गेलेत.."

गणेश सर : "मस्त आहे उठल्या उठल्या चहा भेटेल चला मग आपण पण जाऊ तीथे या सुयोग या उठव.."

गौरव ने सुयोग ला उठवले आणि तो पण पटकन उठलं शिक्षाच्या भीतीने नंतर तिघे पण महादरवाजाच्या दिशेने निघाले. तेथे गुरू भाऊंनी चहा तयार ठेवलेला पाहून सगळे खुश झाले त्यानी पण पटकन तोंड धूऊन चहा प्यायला सुरवात केली .गणेश सरानी चहा पिता पिता संपूर्ण दिवसाचा अराखाडा बनवला.

गणेश सर : "आता वाजलेत ६.३० सगळ्यांनी चहा पिऊन नंतर नास्ता ची तयारी व नास्ता करून १० वाजता येथून भ्रमंती ला निघुया पुन्हा १ते २ वाजता तेथे कुठे तरी थोडं खाऊ अराम करू आणि पुन्हा इथे 3 वाजता येऊन जेवणाची तयारी करू.नंतर थोडं अराम करून ५ वाजता गड उतरायला सुरुवात करू..."

  आशा संपुर्ण आराखडा गणेश सरानी बनवला. सगळयांचा चहा पिऊन झाला होता आणि सगळे आता नास्ता बनवण्याचा तयारीला लागले. नेहमी प्रमाणे कंदापोहे बनवायला सुरवात झाली प्रत्यकाने आपली काम वाटून घेतली.गौरव आणि सुयोग लाकडं गोळा करायला गेले आणि गणेश सर भाजी कापत बसले व गुरू भाऊ चूल बनवू लागले. गौरव आणि सुयोग लाकडं गोळा करून आले आणि पटंकन गुरु भाऊंनी चूल पेटवून पोहे बनवायला सुरवात केली.अशा ठिकाणी खूप थकून आणि खूप भूक लागली की खायला काही भेटलं तरी खाऊन टाकतात.सगळयांना खूप भूक लागली होती सगळे नास्ता कधी तयार होईल ह्याचीच वाट बघत होते तेवढ्यात गुरू भाऊ बोले नास्ता तयार झाला आहे या सगळे.अस बोलतच सगळयांनी पटकन ताट काढून नास्ता वाढून घेतला आणि खायला सुरवात केली.सगळ्यांनी नास्ता केला व उरलेला नास्ता आपल्या आपल्या डब्यात टाकला आणि सगळं साफ करून घेतलं तिथे काही घाण राहणार नाही याची दक्षता घेतलीव सगळं सामान एका झाडीत लपवुन ठेवले.
गणेश सर: "सगळी काम इथली आवरून झाली आहेत आता आपण पुढे निघुयात.सगळयांनी पाण्याचं खूप साठा घ्या कारण आपण आता पळस गडा कडे प्रस्थान करत आहोत तेथे तुम्हाला ही माहीत आहे की पाणी कुठे उपलब्ध नाही..."

गौरव : "ठीक आहे!!"

सगळयांनी पाण्याचे मोठे बाटले आणले होते ते भरून घेतले.आणि पुढे चालत निघाले.पळस गडाकडे जाता जाता १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला किल्लेदाराचा वाडा होता तेथे गेले.

गणेश सर: "हा किल्लेदाराचा किल्ला तुम्हाला माहीतच आहे.येथे १५ ते २० मिनिटे थांबू आणि आजू बाजूला काय मिळत का नजरा टाका..."

सगळयांनी होकारार्थी मान हलवून शोधयला सुरवात केली तेथे दगड ना दगड सगळं पारखून पाहिलं आहे तेच होत पण काय सापडलच नाही.नंतर सगळे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊ लागले.किल्लेदाराचा वाडा सोडून पुन्हा पळस गडाच्या मार्गावर आले. पुढे जाता जाता त्यांना एक खिंड भेटली ती खिंड म्हणजे माहुली गड आणि पळस गड यातील सीमा.

गुरू भाऊ : " ही तटबंदी आहे ही माहुली गडाची आहे इथून माहुली गड संपून पळस गडाची सुरवात होते. .."

सगळे एका रांगेत जात होते कारण रस्ता पण जंगलाचा होता खिंड चढुन थोड्या अंतरावर जाताच गुरू भाऊ तिथेच थांबले. "थांबा इथे आपण तो जात्या सारखा दगड आहे ते बघू या आणि बाजूला काही तरी सापडेल त्याचा काही तरी अंश.."

गणेश सर : " हा ठीक आहे बघूयात .."

सगळे त्या दगडकडे जाऊन शोध कार्य चालु केलं खूप काही शोधत बसले आणि तिथे एका झाडाच्या इथे जाऊन अराम करायला बसले.तेवढ्यात गौरव ची नजर दगडाच्या इथल्या रस्त्यावर गेली ती छोटी पायवाट होती आणि पूर्ण जंगलाने भरली होती.

गौरव : "गुरू भाऊ हा रस्ता आहे वाटे आणि कुठून येतो..."

गुरू भाऊ : " हा रस्ता आहे आणि हा खोर गावातून येतो खूप कठीण रस्ता आहे.."

गौरव : " ह्या रस्त्याला आम्ही कधी आलो नाही जाऊन यायचं का तेवढं फिरायला पण भेटेल नवीन काही तरी काही आल्या सारख तरी वाटेल..."

गणेश सर : " काही हरकत नाही चला जाऊन येऊ..."

           थोडंस अराम करून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. रस्ता खूप खडतर होता आणि खूप काटेरी वनांनी भरला होता . तिथे पुन्हा त्यांना खिंड लागली होती."सर आपण तिथे न जाता दुसरा मार्ग घेऊन पुढे कुठे रस्ता जातो बघायचा का??" गौरव बोलू लागला..

गुरू भाऊ : " मी पण कधी गेलो नाही आहे अजून पण रस्ता खूप खडतर दिसत आहे .."

गणेश सर : " गौरव ठीक बोलत आहे चला जाऊन बघू तरी काय आहे तोफ वैगरे भेटली तर. तसं पण अत्ताशी १२.३० झालेत.अभी नहीं तो कभी नहीं..."

गुरू भाऊ : " ठीक आहे, मग चला.."

        रस्ता सगळा काट्यांचा होता गुरु भाऊंनी बेगेतून कोयता काढला आणि पूढे जाऊन रस्ता बनवत पुढे जात होते .जंगल संपला आणि मोकळा पठार आला तेव्हा सगळयांनी मोकळा स्वास सोडला. ऊन खूप वाढला होता त्यांना ऊन पण खुप लागत होतं म्हणून गौरव सुयोग आणि गणेश सर एक झाडा खाली निवांत बसले पण गुरू  भाऊंना तिथे खूप वेगळं वाटलं तेजर  पठाराच्या पुढे आले आणि त्यांना एक घळ दिसली आणि दोन तीन वेगळे दगड दिसले ते घळ मध्ये उतरले आणि त्यांना दोन्ही बाजुला १ फुटाचा दगड सारखे दिसले. "गणेश सर..गणेश सर..!! या लवकर बघा काय भेटलं..." गुरू भाऊ ओरडत  बोले. तिघे पण पळत आले त्यांना वाटले तोफ भेटली काय खरंखर.

गणेश सर : " काय झालं गुरू भाऊ एवढं काय भेटलं तुम्हाला..."

गुरू भाऊ : " हा बघा दगडं जस काही दरवाजाची कमान दिसते कारण इथे पण सारखीच आहे.."

गणेश सर : " हा मला सुद्धा तेच वाटते समोरच खोर गाव दिसतो आणि हा दरवाजा मला महादरवाज सारखाच दिसतोय. चला एक एक जण चारी बाजूला बघा काय भेटत का..."

आता सगळे जण खुप खुश झाले होते सगळा थकवा पण गेला होता.गुरू भाऊ खालच्या बाजूला गेले आणि गौरव वरच्या बाजुला गेला, सुयोग मागच्या बाजूला गेला आणि गणेश सर त्या दगडाचं निरक्षण करत होते सगळ्यांना काही न काही भेटला गौरव गेला तिथे एक गणेशाच्या मूर्तीचे शिल्प कोरले होते. सुयोगला तिथे पायऱ्या भेटल्या पण बाकी सगळे पायऱ्या काटेरी  झाडा खाली होत्या आणि गुरू भाऊंना दरवाजाच्या कमानीचे अजून काही अवशेष सापडले .

गणेश सर : " आपण इथे थोडं खोद काम करू थोडं दरवाजा मोकळं करू म्हणजे आपल्याना पूर्णपणे खात्री पडेल की हा दरवाजा आहे. गुरू भाऊंनी कुदळ घेउन दगड लगताच भाग खोदयला घेतला आणि सुयोग ने माती काढायला घेतली अस एक तास काम चालू राहिला २ ते ३ फूट त्यांनी खोद काम केलं आता एकूण वरची कमानी नीट दिसायला लागली. त्यांना पण आता नक्की झालं की हा दरवाजा आहे म्हणून सगळे जण खूप खुश झाले .

गणेश सर: " ह्या दरवाजाच्या इथे गणेशच्या मुर्ती चे शिल्प आहे.अनेक गडावर हनुमंतांची मूर्ती तिथे हनुमान दरवाजा असे बोलले जाते त्या प्रमाणे गणपती शिल्प आहे म्हणून हा गणेश दरवाजा असावा..."

      गौरव आणि गणेश सरांनी फोटो काढायला सुरवात केली.आणि एक विडिओ काढली त्यात सगळी दरवाजाची माहिती व कसा आहे आणि कोणत्या अवस्थतेत सापडले. जेणे करून लोकांना माहिती होईल काय भेटलं . सगळं एवढे खुश होते की त्यांना काय करू ना काय असं होतं होत.साहजिकच आहे कोणीही एवढं खुश होणारच इतिहासात ज्या दरवाजाचा नाव नव्हतं पुन्हा आता इतिहासात ह्या दरवाजाची नोंद होणार.
      "चला आता जाऊ आपण पण पुन्हा आपल्याना जेवायचं आहे.." गणेश सर बोलू लागले..

गौरव: "सर आता मी काय जेवत नाही.मला एवढा आनंद झाला आहे की माझी सगळी भूक उडाली आहे..."

सुयोग आणि गुरू भाऊ पण तेच बोलू लागले
गणेश सर: " ठीक आहे इथे आपण जरा थांबू आणि लगेच महादरवाजा कडे जाऊन खाली उतरायला सुरुवात करू..."
आता सगळयांचा थकवा नाहीसा झाला होता सगळे तो दरवाजा बघतच बसले होते .नवीन दरवाजा पुढे अजून कशा मोकळा करायचा ह्याचा आराखडा करत बसले. आणि आता माहुली वर तीन दरवाजे नसून चार आहेत इतिहासात पुन्हा एक पांन जोडलं जाईल.
         चार वाजून गेले होते सगळ्यांना आता वेळेचं पण भान नव्हतं राहील. सगळे जण पटापट अवरायला लागले आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली.जाता जाता त्यांनी पांढरा रंग काढला आणि प्रत्येक वाटेवर खुणा करत आले जेणे करून पुढच्या वेळेस दुसरं कोणी आलं किंव्हा कोणती मोहीम ठेवली तर त्यांना रस्ता लगेच सापडेल. आता ते महादरवाजा मध्ये येऊन पोचले.
गणेश सर : काय खायच असेल खाऊन घ्या माझ्याकडे थोडं फरसाण आहे पाहिजे असेल घ्या
सगळ्यांनी आपला जो खाऊ आणला होता तो खाल्ला व थोडा आराम करायला बसले पुन्हा अराम करून किल्ला उतरायला सुरवात केली.सहावाजे पर्यंत सगळे खाली गेले व गुरू भाऊच्या घरी गेले.गुरू भाऊंनी सगळ्यांना नास्ता चा आग्रह केला पण सगळ्यांनी नकार दिला.
गुरुभाऊ: नास्ता करत नाही तर चहा तरी प्या.
गणेश सर : ठीक आहे , चहा बनवा काही तरी गोड होऊन जाऊदे आज आनंदाचा दिवस आहे
गौरव: हा ना मला तर अजून पण हे स्वप्नच वाटत आहे
गणेश सर: मारू का जोरात म्हणजे कळेल तुला
गौरव : हा हा हा..... नको..."
  सगळयांनचा चहा पिऊन झाला आणि सगळे आपल्या आपल्या घरी जायला निघाले.गौरव घरी पोचला आणि अंघोळ करून झोपलयला गेला.पण त्याला काही झोप लागतच नव्हती.त्याला डोळ्या समोर गणेश दरवाजाचा नजरा दिसत होता .शेवटी त्याला माहुली किल्लावर काही न काही ऐतिहासिक शोधूनच काढलं.आणि पुन्हां एकदा गणेश दरवाजाच माहुली किल्ल्याच्या इतिहासात एक इतिहास नोंदवलं...

                                               - सुनील शेट्टी


ता. शहापूर , जि. ठाणे


शोध एक ऐतिहासिक दरवाज्याचा

sunil shetty
Chapters
शोध एक ऐतिहासिक दरवाज्याचा