Get it on Google Play
Download on the App Store

राजकीय महत्त्व

दुर्गापूजेच्या काळातच बंकिमचन्द्र चॅटर्जी यांना "वंदे मातरम" हे गीत स्फुरले आणि नंतर ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले असे मानले जाते.

सार्वजनिक पातळीवर दुर्गापुजेची सुरुवात बंगालमधील कोलकत्ता शहरामध्ये इ.स. १७५७ साली सावोबाजारच्या राजा नबदेव याने केली. प्लासीच्या लढाईत लाॅर्ड क्लाईव्ह याने सिराज-उद-दौला याच्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे साजरीकरण केले गेले होते. या पूजेसाठी राजाने लाॅर्ड क्लाईव्हला आमंत्रित केले. लाॅर्ड क्लाईव्ह देवीच्या पूजेसाठी एक बकरे, एकशे एक रुपये रोख आणि फळांनी भरलेली टोपली घेऊन आला होता. ह्या पहिल्या सार्वजनिक साजरीकरणामध्ये फक्त तत्कालीन अमीर उमरावांना बोलावणे धाडले गेले होते, परंतु पुढे जाऊन दुर्गापूजेचे सार्वजनिक साजरीकरण सुरू झाले. आणि दुर्गापूजेचा मंडप, त्याची सजावट आणि त्या सजावटीचे स्वरूप या सर्वांना राजकीय रंगात रंगवण्यात आले. अगदी इंग्रजांपासून, साम्यवाद्यांसारख्या राजकीय पक्षापासून ते अलीकडच्या एड्सवर काम करणाऱ्या संस्थां, संघटनांपर्यंत अनेकांनी तसेच विविध चळवळींनी ह्या साजरीकरणाचा उपयोग करून घेतला आहे.