Get it on Google Play
Download on the App Store

दुर्गेची रूपे

दुर्गेची नऊ रूपे आहेत. यांना शक्तिरूपे म्हणतात:

शैलपुत्री - हिमालयाच्या तपश्चर्येने प्रसन्‍न होऊन देवीने कन्यारूपाने पृथ्वीवर जन्म घेतला, म्हणून ती हिमालयपुत्री. म्हणून पुराणात तिचा उल्लेख शैलपुत्री असा होतो. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे तिने विष्णूशी लग्न करता शंकराला वरले. म्हणून शैलपुत्री दुर्गा ही दृढनिश्चयाची आणि कठोर तपाची शिकवण देते.. नवरात्राच्या पहिल्या दिवशी हिचे पूजन करतात.

ब्रम्हचारिणी - म्हणजे ब्रह्मपद प्रदान करणारी. उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू असे तेजोमय स्वरूप. पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात असा समज आहे. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या रूपाची पूजा करतात.

चंद्रघंटा - कल्याण करणारे व शांतिदायक दशभुजा स्वरूप. शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. सर्व हातांत अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टांर्‍ना मुक्ती मिळते असे म्हणतात. नवरात्राच्या तिसर्‍या दिवशी हिचे पूजन करतात.

कुष्मांडा - अष्टभुजा स्वरूपातले रूप. पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. हिला कोहळ्याचा बळी दिला जातो. वाहन सिंह आहे. नवरात्राच्या चवथ्या दिवशी हिची पूजा होते.

स्कंदमाता - स्कंदाची माता म्हणून असलेले चार भुजांचे स्वरूप. कमळासनावर विराजमान आहे. या देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्राच्या पाचव्या दिवशी हिचे पूजन करतात.

कात्यायनी - 'कत' नावाच्या ऋषीच्या कुलात, 'कात्यक' गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी. नवरात्राच्या सहाव्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा करतात.

कालरात्री - काळे शरीर असलेली व तीन डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, वाहन गर्दभ. खड्ग धारण केलेली, भयानक असे रूप. नवरात्राच्या सातव्या दिवशी हिचे पूजन करतात.

महागौरी - गोरा वर्ण, आभूषणे व वस्त्र पांढर्‍या रंगाची. चार हात असलेली व वृषभ हे वाहन असलेली. नवरात्राच्या आठव्या दिवशी हिचे पूजन करतात.

सिद्धिदात्री - सर्व सिद्धी देणारी.हिच्या उपासनेने आठ सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात, अशी समजूत आहे..नवरात्राच्या नवव्या दिवशी हिचे पूजन करतात.

देवीच्या या नऊ रूपांचे वर्णन 'देवीकवच' नावाच्या स्तोत्रात आले आहे.

दुर्गा देवी

सुहास
Chapters
दुर्गा देवी दुर्गेची रूपे