Android app on Google Play

 

साईबाबांची उपासना

 

साईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते.

साईबाबा हे एक फकीर होते तरीसुध्दा त्यांना सर्व धर्मातील लोक मोठ्या श्रद्धेने पुजतात. सर्व जाती, धर्मातील लोकांना त्यांच्याप्रती पूर्ण विश्वास आहे. कारण त्यांनी कोणालाही भेदभावनेने वागणूक दिली नाही. सबका मालिक एक है! अशी शिकवण सर्वांना त्यांनी दिली.

गुरु आपल्याला आदर्श जीवन जगण्याची दिशा दाखवतात. सतमार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत असतात. साईबाबांनी सगळ्यांना आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे.

जगभरातील असंख्य लोक त्यांना आपला गुरु मानतात. त्यांची मनापासून उपासना करतात. बाबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य इतरांचे दुख दूर करण्यात वाय्तीती केले. साईबाबा भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ज्या भक्तावर बाबा आपली कृपादृष्टी टाकतात त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. यामुळे आठवड्यातून एकदा तरी साईबाबांचे दर्शन अवश्य घ्यावे.

 

साईबाबांची उपासना

परम
Chapters
साईबाबांची उपासना
श्रद्धा, सबूरी, एकता