Get it on Google Play
Download on the App Store

आरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार

पाककृती वाचतांनाच तुम्हाला लागणारे साहित्य समजेल त्यामुळे वेगळे सांगत नाही.

आधी भात कच्चा शिजवून घ्या. प्लेन राईस. चार जणांसाठी दोन वाट्या. नंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून तो थोड्या तेलात ब्राऊन होइपर्यंत परतवून घ्यावा. कांदा बाजूला काढून मूठभर काजू परतवून घ्यावे.

फ्लॉवर, गाजर, मक्याच्या कणीसाचे दाणे (कॉर्न), बीन्स, कांदा, शिमला मिरची (कॅप्सीकम), वाटाणे, टमाटे, बटाटे (आवडत असल्यास पत्ता कोबी - कॅबेज), पनीर या सगळ्यांचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावे व सगळ्या भाज्या एकत्र धुवून घ्याव्या.

एका कढईमध्ये (पॅन मध्ये) तेल गरम करून त्यात जीरे टाकावे. मग अद्रक लसूण पेस्ट, हळद, धने पुड (कोरीअंडर पावडर) टाकावी. मग सगळ्या भाज्या कढईत टाकाव्या, परतवून घ्याव्या.

एका बाऊल मध्ये दोन चमचे दही घेऊन दोन चमचे एव्हरेस्ट बिर्याणी मसाला त्यात टाकावा. ते मिश्रण चांगले फेटून घ्यावे.

आता कढई (पॅन) मधील भाज्यांत हे मिश्रण टाकावे व नंतर मीठ टाकावे. भाज्या शिजण्यापूरते पाणी टाकून झाकण ठेवावे. या भाज्या थोड्याश्याच (कचवट) वाफवून घ्या.

आता एका पॅन मध्ये बटाट्याचे पातळ गोल काप करून पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्याच्यावर अर्ध कच्चा शिजलेला भात टाकावा. त्यावर एक थर (लेयर) भाजीचा टाकावा मग पुन्हा एक लेयर भाताचा.

त्यावर सर्वात शेवटी तळलेले काजू आणि परतवलेले कांदे टाकावे. गरजेनुसार कोथिंबीर टाकावी. त्यावर वाटल्यास दुधात केसर टाकून ते यावर थोडे टाकू शकतो.



बार्बेक्यू कसे करायचे?

गॅसवर कोळसा गरम करून तो वाटीत टाका. त्यावर तूप टाका. मग ती वाटी तयार झालेल्या बिर्याणीवर ठेवा आणि पॅनचे झाकण पाच मिनिटे बंद करा.

झाकण उघडा आणि गरमागरम बिर्याणी कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा.

आरंभ : फेब्रुवारी २०१९

संपादक
Chapters
संपादकीय टीम आरंभ - फेब्रुवारी २०१९ पासून तामिळनाडू आणि अंदमान - अनुष्का मेहेर रहिमतपूर (कवीचे गाव) - सविता कारंजकर प्रवासापूर्वीचा प्रवास! - आशिष अरुण कर्ले आणि सातारा दर्शन झालं! - प्रिया गौरव भांबुरे (निकूम) असाही एक "प्रवास" - निलेश लासुरकार शालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर आरंभ पाककृती: व्हेज बार्बेक्यू बिर्याणी - मंजुषा सोनार फार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले कविता: आयुष्याची भटकंती - संजय उपासनी कविता: रोज चालती पाऊले! - निशिगंधा उपासनी व्यंगचित्रे - सिद्धेश देवधर छायाचित्रे १: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर छायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर छायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर छायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं! - प्रिया गौरव भांबुरे (निकूम)