मुलगी होणं सोपं नाही
सतत कुढत राहवे लागते,
अपेक्षांना मारावे लागते ,
मुलगी होणं सोपे नसते .
माहेरी सुख लाभता,
सासरी राबावे लागते,
पोपटासारखे जगावे लागते ,
बंद पिंजऱ्यात रहावे लागते ,
मुलगी होणे सोपे नसते .
स्वप्न पाहणे सजा असते ,
आवड सांगणे गुंन्हाच असतो ,
स्वप्न हे विसरावे लागतात ,
आवड ही बदलावी लागते .
मुलगी होणं सोपे नसते ...
मुलगी होणं सोपे नसते...