Get it on Google Play
Download on the App Store

#meeto म्हणजे काय ?

हि चळवळ काही एका माणसाने सुरु नाही केली. २००६ साली बुर्के नावाच्या एका अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्याने हा शब्द वापरला होता पण तो लोकप्रिय हल्लीच झाला. उमा थरमॅन , अलिसा मिलानो, ग्वेनेथ पल्ट्रो इत्यादी अनेक विख्यात महिलांनी आपले लैगिक शोषण झाले होते हे मान्य केले आणि #meetoo हि टॅग वापरली. ह्यांच्या अनुभवांनी अनेक साधारण महिलांना प्रेरणा मिळाली आणि समाजाच्या उदरात लपलेले एक काळे सत्य बाहेर आले. आमच्या माता भगिनी जगांत फिरताना त्यांना किती अत्याचाराचा सामना करावा लागतो आणि ह्या अत्याचारांच्या इतर महिला सुद्धा काही मदत करतात हे आम्हाला समजले. 

meetoo म्हणजे "मी सुद्धा". आम्ही दररोज अनेक महिलांना भेटतो पण त्या महिलांना सुद्धा लैगिक शोषणाला सामोरे जावे लागले असेल ह्याची आम्हाला कल्पना सुद्धा नसते. समाजात उजळ माथ्याने फिरणारे राजकारणी, अभिनेते, पत्रकार इत्यादी अनेक मंडळी प्रत्यक्षांत शोषण करणारे गिधाडे आहेत हे आम्हाला ह्यामुळे समजते. 

अर्थांत लैगिक शोषणाचे बळी फक्त महिला असतात असे नाही. सोनू निगम ह्या अभिनेत्याने टाइम्स ऑफ इंडिया मध्ये भले मोठे पात्र लिहून एक प्रख्यात माणूस त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न करत होता असा गौप्य्स्फोट केला. केविन स्पेसी ह्या ऑस्कर प्राप्त अभिनेत्याने सुद्धा आपल्या पुरुष सहकारण्यांचे शोषण केले होते हे पुढे येताच नेटफ्लिक्स ने तात्काळ त्याचा करार रद्द केला. 

महिला अभिनेत्रींनी सुद्धा पुरुष सहकाऱ्यांचे लैगिक शोषण केले आहे असे आरोप सुद्धा झाले आहेत. हल्लीच कंगना राणावत हिच्या बॉयफ्रेंडने सुद्धा तिच्यावर असाच आरोप केला होता. नाना पाटेकर ह्या प्रख्यात अभिनेत्यावर तनुश्री दत्ता ह्या अभिनेत्रीने विनयभंगाचा आरोप केला. तरुण तेजपाल ह्या डाव्या विचारसरणीच्या तेहलका मासिक संपादकांवर सुद्धा एका महिला कर्मचार्यांशी लिफ्ट मध्ये गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. 

मोदी सरकार मधील मंत्री अकबर ह्यांच्यावर तब्बल २० महिलांनी असेच आरोप केले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. विनोद दुवा ह्या पत्रकारावर सुद्धा निष्ठा जैन ह्या महिलेने असेच आरोप केले. 

पण #metoo चालवर फक्त विख्यात लोकांसाठी नाही. हि चळवळ सर्व लोकांसाठी आहे. प्रत्येकाने किमान आपले अनुभव तरी कथन केले तर समाजातील हि कीड नष्ट व्हायला तितकीच मदत होईल अशी आशा आम्ही बाळगू शकतो.