रेणुका
रेणुका/ येल्लुआई/ येल्लम्मा ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.
यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते.
रेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु (प्रसेनजित) नावाच्या राजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते त्यांतला एक परशुराम होता.