Get it on Google Play
Download on the App Store

मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर'; (सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात, या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.