मुंबईतील गणेशोत्सव
मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. मुंबईत दहा दिवस हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो.
इतिहास
मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून १२५ वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे.लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हा उत्सव मुंबईत सुरु झाला.
प्रसिद्ध गणेश मंडळे
चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश, लालबागचा राजा, परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हे मुंबईतील गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून या गणपतींच्या दर्शनाला भाविक मुंबईत येतात.