Get it on Google Play
Download on the App Store

शिक्षक

धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषया वरही उत्तम अभ्यास झालेला होता. स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी १९४८ ला भारत सरकारने पहिला शिक्षण-आयोग स्थापन केला. त्या आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाज्लेत. भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारेहि त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्व:त च्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.