रघुविराष्टक - जनस्थान गंगातटीं सव्याभाग...
जनस्थान गंगातटीं सव्याभागीं । वसे श्रीगुरूराज सर्वज्ञ योगी ॥
जगीं योग्य जो कीर्ति वाचेसि गाया । नमस्कार त्या श्रीरघुराज पाया ॥१॥
वैराग्य ज्याचें वदुं काय वाणी । स्वर्गदिकीं भोगहि तुच्छ मानी ।
नसे दूसरा त्यापरी आचराया । नमस्कार त्या श्रीरघूराजपायां ॥२॥
रक्षोनिया धर्म वर्णाश्रमातें । सदा आचरे वेद आज्ञा क्रमातें ।
लावीतसे लोकहि आचराया । नमस्कार त्या श्रीरघूराज पायां ॥३॥
क्षमादयाशांति उदारतेला । सेवोनिया पूर्णपणें निवाला ।
जयाचे घरीं बोध आला वसाया । नमस्कार त्या श्रीरघूराजपायां ॥४॥
विज्ञानिचा केवळ पूर्ण सिंधू । नसे चित्तवृत्ती तरंगादि वाधू ।
करी योजना साधकांतें तराया । नभस्कार त्या श्रीरघूराज पायां ॥५॥
वदे सर्वदा नम्रवाचेसि वाणी । वसे अर्थ तो वेदशास्त्रीं पुराणीं ॥
सदा झीजवी ऊपकारार्थ काया । नमस्कार त्या श्रीरघूराज पायां ॥६॥
मुमुक्षू जनांतें करी शक्तिपाता । करूं जे शकेना कदाही विधाता ॥
अनाथा जिवाची करी दूर माया । नमस्कार त्या श्रीरघूराज पायां ॥७॥
नव्हे सद्गुरू मानवी हा कदापी । परब्रह्मरूपें जगा मुक्ति मापी ।
वसे नित्य नीरंजनाचेचि ठाया । नमस्कार त्या श्री०॥८॥