Android app on Google Play

 

वेंकटेशाची आरती - जय देव व्यंकटेशा । महाव...

 

जय देव व्यंकटेशा ।

महाविष्णू हे परेशा ॥

आरती ओवळीतो ।

तुज चिन्मय अविनाशा ॥ धृ. ॥

भावार्थ कानगिसी भक्तांपासी तूं मागसी ।

अज्ञान छेदुनियां ॥

भवसंकट वारीसी ।

देवोनी स्वात्मबोधा ।

परमानंदी तूं ठेवीसी ॥ जय. ॥ १ ॥

तत्वंपदभेदबुद्धी ।

निरसुन शबलांशउपाधी ॥

लक्ष्यार्थि जीवेशांचे ।

करिसी ऐक्य असिपदीं ॥

जीवन्मुक्ती सुख थोर ।

देसी परमकृपानिधी ॥ जय. ॥ २ ॥

विवर्त हे नायरुप ।

जगद्‌भासचि असार ॥

अधिष्ठान पूर्ण याचे ॥

देव सन्मय साचार ॥

मौनी म्हणे तुंचि सर्व ।

भूमानंद हे अपार ॥ जय. ॥ ३ ॥

 

वेंकटेश आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
वेंकटेशाची आरती - जय देव व्यंकटेशा । महाव...
वेंकटेशाची आरती - शेषाचल अवतार तारक तूं देव...