सूर्याच्या आरत्या - जगदात्मा जगचक्षू उदयाचलिं...
जगदात्मा जगचक्षू उदयाचलिं मूर्ती ।
पाहुनी वृंदे अरुणोदयि युद्धा येती ॥
प्रात:काळी अर्ध्ये द्विजवर वर देतो ।
तेणें राक्षस मूर्च्छित द्वीपाप्रति जाती ॥ १ ॥
जय भानू श्रीभानू कांचन मणिहारा ।
मधवादिक पद वंदित निगमागम सारा ॥ धृ. ॥
म्हणवुनि रवि नारायण विप्रां वर देसी ।
प्रतप्त स्वर्णाऎसी द्विजकाया करिसी ॥
कलियुग किल्मिषदैन्यें विप्रांची हरिसी ।
तव पदभजने नमतें रविलोका नेसी ॥ जय. ॥ २ ॥
भवभयभ्रांती तिमिरें तव तेजें गेली ।
ज्ञानोदय प्राप्तीनें दुरिते मावळली ॥
स्तुति करितां शेषाची जिव्हा ही चिरली ।
सहजचि अल्पज्ञाची कुंठींत मति झाली ॥ जय. ॥ ३ ॥