Android app on Google Play

 

भूपाळी बारा ज्योतिर्लिंगांची - उठोनीया प्रात:काळीं । शिव...

 

उठोनीया प्रात:काळीं । शिव शिव जपा नित्य काळीं ।
महा पापा होये होळी । सर्वैकाळीं सुखदाता ॥ध्रु.॥
मुख्य काशी विश्वेश्वर । श्र्वेतबंद रामेश्वर ।
लिंगाकार तो गिरिवर । मलकेश्वर नीळगंगा ॥१॥
ओंकार ममलेश्वर । घृष्णेश्वर भीमाशंकर ।
गंगाधर त्रिंबक शिखर । हिमकेदार हिमाचळीं ॥२॥
नागनाथ काळनाथ । सोमनाथ वैजनाथ ।
कल्याणस्वामी श्रीगुरुनाथ । दीनानाथ कृपाळू ॥३॥