Get it on Google Play
Download on the App Store

धागा

“धागा”


नमस्कार मित्र हो! पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन आलोय तुमच्यासाठी. "नातं" हा विषय घेऊन. तसा हा विषय अनेकदा तुमच्या वाचण्यातून, बोलण्यातून बरेच वेळा येऊन गेला असेल. अनेक कथा कादंबऱ्या हि लिहल्या गेल्या आहेत या विषयावर, पण माझा हा लेख  जरा वेगळाच आहे. नाती का तुटतात? नात्यात दुरावा का येतो? माणस एकमेकांपासून का दुरावली जातात? याला कारणीभूत कोण? हल्लीच एक सुंदर वाक्य माझ्या वाचनात येउन गेल "मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वाना एकत्र बांधून ठेवण्याची" कोणी लिहाल माहित नाही, पण अगदी चपखल लिहाल आहे आणि या ओळींनीच मला हा लेख लिहण्यास प्रवृत्त केल.




आजकालच्या जगात जिथे social media चा वात इतका फोफावला आहे कि सांगता सोय नाही. या virtual friends च्या जगात खरे मित्र हरवत चालले आहेत. फेसबुकवर हजारो FRIENDS असतील पण याना खरा मित्र कोण विचार? अगदी कमी जणांना उत्तर देता येईल. Nowadays people are like Bluetooth, if you stay close they stay connected. If you go far for some time, they will find a new connection. हल्ली हेच तर चालू आहे, जरा आपले नातेवाईक अथवा मित्र दूर गेले कि त्यांची जागा दुसऱ्या कोणी तरी भरून निघालेली असते. ती म्हणं आहे ना "तू नाही तर तुझा बाप दुसरा" अगदी तस. आजकाल इतकी सोपी झाली आहेत नाती, वारा येईल तशी पाठ फिरवणारी. कोणी मित्र/ नातेवाईक समोर आला कि इतक उतू घालवायचा आणि एकदा का त्यांची पाठ फिरली कि आपला आसा कोणी मित्र वा नातेवाईक आहे का? याची पण जाणीव नसते.




कित्येक नाते समारंभात पाहिलंय, लोक इतक्या गर्वाने सांगतात कि किती वर्षांनी भेटतोय आपण, झाली असतील ना १०/१५ वर्ष, किती बदलला आहेस तू, आजकाल वेळच मिळत नाही बघ भेटायला, life इतक busy झालय ना काय विचारता सोय नाही वैगरे… वैगरे. पण तीच नातलग मंडळी/ मित्र मंडळी weekend ला एखाद्या मॉल मध्ये काही खरेदी न करता तंगड्या तोडत फिरतील बिनकामाचे त्या निर्जीव वस्तू न्याहाळत, पण एखाद्या जुन्या नातेवाईकांकडे अथवा जुन्या शाळा कॉलेज मधील मित्र/ मैत्रिणीला भेटायला त्यांचाकडे वेळ नसतो. कधी एकत्र येऊन get-together  करावा, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा “चहा आणि भजी” च्या आस्वादात पण नाही.... कोण करेल नसती उठाठेव आणि त्यातूनच कोण एक "धागा" / "दुवा" बनत असेल तर त्याला/ तिला काही उद्योग नाहीत का? आम्हा नवरा-बायकोला एकच वीकएंड भेटतो (बाकीचे वीकएंड/वीकडेस हे नवरा किंव्हा बायको चंद्रावर असतात वाटत). कसली हि नसती उठाठेव, अशी दूषणं देत तोंड वाकड करुन येतात, काही तर चक्क “नाही जमणार” म्हणून मोकळे होतात. 




अगदी हल्ली म्हणजे १०/ १५ वर्षापूर्वी आपल्या आई-बाबा च्या जमान्यात (कारण आता आपला जमाना आहे ना मॉल संस्कृतीचा/ मोबाईलचा/ सोसिअल मीडियाचा... म्हणून म्हंटल हो) किती छान मज्जा असायची, अगदी प्रत्येक वीकएंडला कोणी नातेवाईक घरी यायचा. येताना parle -g चा पूड आवर्जून घेऊन यायचा, त्या बिस्किटाची चव आज हि जिभेवर रेंगाळते. मोठ्याच्या त्या गप्पा ऐकायची मजा हि काही औरच असायची. कधी आम्ही कोणा जुन्या नातेवाईकांकडे जायचो कधी ते आमच्याकडे येत. त्या निमित्ताने कौटुंबिक संमेलनचं घडायची आणि ते हि एकमेकांना न कळवता, आजकाल कोणाकडे जायच तर पहिले फोन करून जाव लागत नाही तर टाळ बघून परत याव लागेल अशी सूचना वजा ताकीदच असते. मला आज हि आठवतंय माझ्या दूरच्या (पण मानाने अगदी जवळच्या आत्याकडे आम्ही जायचो “मुलुंड”ला. आ..हा.. काय ती मज्जा असायची. आत्या जेवल्या शिवाय सोडायची नाही. ते ताई-दादा आम्हाला घेऊन त्यांच्या मित्र मैत्रिणीकडे खेळायला घेऊन जायचे. रात्री जेवणाच्या टेबला वर गप्पांच्या / आमचं  बालिश जोक्सच्या फैरी झडायच्या. हसून हसून सर्वांची मुरकुटी वळायची. जेवण कधी संपायचे कळायचं पण नाही तरी आई-बाबांच्या गप्पा संपायच्या नाहीत. मग तीच आमची पेंगुळलेली ओझीं घेऊन आई बाबा घरचा रस्ता धरायचे. किती छान होती ती नाती. आज आत्या या जगात नाही पण तिच्या आठवणी अगदी काळजात घर करून आहेत. या नात्याला कारण होता तो आत्या आणि बाबांच्या नात्यातला तो मायेचा "धागा" त्याने ते नातं घट्ट पकडून ठेवल होत. प्रत्येक जण एकमेकांना सुखदुःखात धरून असायचे.




आजून एक गमतीदार किस्सा आठवला. आमचे काका (जुन्या धाटणीचे) आहेत, ते तर प्रत्येक समारंभात, अगदी सुखाच्या असो किंव्हा दुःखाच्या, ते आवर्जून हजेरी लावत आणि त्यावर आमची काकू त्यांना टोमणे लगावत असे…. हा माणूस "उंदराची पाचवी पण नाही सोडत" हा… हा… हा...




मला माहित आहे बऱ्याच वाचकांना हा डोक्यावरून (bouncer) गेला असेल. पूर्वीची माणस बोलण्यात म्हणीचा/वाक्प्रचारांचा जास्त वापर करत असत, त्यातलीच हि एक म्हण. याचा अर्थ, कोणाकडे म्हणजे अगदी दूरदूरच्या नातेवाईकाकडे पण काही कार्यक्रम असल्यास ते हजर असत. आज त्याच काकांच्या वागण्या मुळे त्याच कुटुंब सगळ्या नातेवाईकांशी जोडून आहे. हा असतो "धागा" नात्यातला. पण खरंच आजकाल राहिली आहेत का अशी नाती, अशी मैत्री? नाती/मैत्री जपणारी माणस राहिली आहेत का या हिशेबी दुनियेत. जिथे पावला-पावला ला हिशेब ठेवला जातो. हिशेब नुसता पै/पैशाचा नाही तर भावनांचा/ प्रेमाचा, कोणी काय केलाय आपल्यासाठी आणि काय नाही केलाय याचा, वस्तूंचा. अरेरे किती गालीच्छ झाली आहेत नाती. किती दांभिक झाली आहेत लोक. तू नाही तर तुझा बाप दुसरा, या म्हणी प्रमाणे दिवसागणिक नाती बदलणारी. फार दिवस कोणी contact मध्ये नाही म्हणून सहज विसरून जाणारी. WHATSAPP च्या दुनियेत जुने मित्रांचे/ नातेवाईकांचे ग्रुप करून कोरडी CHAT करणारी नाती. त्या messages मधूनच भावनाशून्य अभिनंदन किंव्हा सांत्वन करणारी, नुसता HBD / HWRU किंव्हा RIP लिहणारी नातीच उरली आहेत आता.  




कोणी याचा विचार केलाय का आजवर, का तुटतायत हि नाती? का दूर जातायत मित्र so called self-respect कि ego मुळे? तर तस नाही, पूर्वीच्या नात्यात पण ego होते, पण नव्हती ती निष्ठुरता, नव्हता तो अहंपणा, नव्हता तो दुजाभाव, नव्हता तो भावनाशून्य कोरडे पणा. थोडक्यात काय सुरवातीला म्हंटल्या प्रमाणे सर्वजण आजकाल स्वतःला "मोती" समजू लागले आहेत (थोडक्यात सर्वजण स्वतःला श्रेष्ठ समजू लागले आहेत आणि अहंपणाने त्यांना ग्रासले आहे). सर्वाना मोती बनून मिरवण्यात परमानंद मिळत आहे. कोणाला "धागा" बनण्यात रसच राहिलेला नाही. विखुरलो (दुरावलो) तरी चालेल पण अहम सोडणार नाही. त्यामुळेच हे मोतीरुपी नातलग मित्र/मैत्रिणी दुरावत चालली आहेत. कोणी धागा बनून सर्वाना एका घट्ट नात्यात बांधूनच ठेवत नाही. धाग्याला ती किंमत काय? कवडीच पण मोल नाही त्या धाग्याला मग बनून "फायदा" तो काय? कशाला उगाच नस्ता पुढाकार, नसती उठाठेव. जरी कोणी पुढाकार घेतलाच “धागा” बनण्याचा तरी त्याचा टिकाव मात्र लागत नाही जास्त दिवस. कधी कधी एवढा पराकोटीचा कमीपणा एक नातं/ मैत्री टिकवण्यासाठी घेणार तरी कोण? कारण जो धागा या मोतीरूपी माणसांना जोडायला जातो तो कायमच वाईट ठरवला जातो. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि काय. जरी सगळ्या लढाया लढून “धागा” सगळ्यांना जोडण्यात यशस्वी झालाच तर मागून कुजबुज चालू असतेच “ह्याला उगाच मोठेपणा मिरवायचाय”. जर एखादा “धागा” कमीपणा घेऊन नाती जुळवायचा प्रयत्न करत असेल तरी "याच्या अंगात मस्ती", "याला सांगितल नव्हता आमची चाट" या आणि अश्या वल्गनाच ऐकायला मिळतात.  हजारदा सगळ्याचे ego जपून सगळ्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात कधी तो धागा जीर्ण होत जातो ते त्या धाग्याला पण काळात नाही. जाऊ दे रे.... तो/ ती आहे थोडी रागीट.... सोडून दे.... जाऊ दे.... कसा हि असला तरी तो/ती आपलाच/आपलीच आहे.... या आणि अश्या अनेक प्रकारे तो धागा नात्यात फूट पडूनये म्हणून गाठी बांधतच राहत असतो. पण या नादात तो धागा स्वतःच सर्वस्व कधी विसरून जातो…. कधी वीरू लागतो याची कोणा एका मोत्याला कल्पना पण नसते आणि काही पडलेली पण नसते. आणि हो या सर्व प्रयत्नातून जर सर्वजण एकत्र आलेच तरी कितपत आणि कुठवर एकत्र राहतील याची शाश्वती नसतेच. कारण तिथे जमलेला प्रत्येकजण एकत्र जमला असतो तो केवळ त्या धाग्यामुळे आणि त्याची कारण पण अजब असतात, ऐका हा… हे बघ तू बोलतोयस म्हणून मी येतोय, तू आहेस म्हणून मी येणार नाहीतर मला काही विशेष interest  नाही कोणाला भेटण्यात.... इत्यादी... इत्यादी.... आणि बरच काही.




कधीकधी हीच सर्वजण त्या एका “धाग्या” मुळे एकत्र जमले आहेत याच भान विसरून त्या धाग्याची कशी "मारायची" याचीच चढाओढ चालू करतात आणि मग येते ती त्या धाग्याची खरी सत्व परीक्षा. सगळे मिळून अस काही मिरवतात "याला" काय वाटतं याच्या मुळे काय आपण एकत्र आलोय होय. माग अगदी एकमेकांची थोबाड पण कधी न बघणारे अगदी गळ्यातगळे घालून हि "मुक्ताफळे" उधळतात. पण कधी मागे जाऊन आठवत नाहीत कि त्याच धाग्याने तुमच्यातली मैत्री/नातं गुंफून ठेवलेल आहे. कित्येकदा स्वत:ला विसरून काही कारण नसताना तुमची बोलणी ऐकली आहेत. कोणाचा कुठला हि कार्यक्रम, मग तो वाढदिवस असो वा दुसरकसलहि सेलिब्रशन असो. ते कसा करायचा पासून ते गिफ्ट काय घ्यायच, या पर्यंत सर्व गोष्टी बेमालूम पणे पार पडल्या असतात. एवढ सगळं करूनही कधी त्या धाग्याला प्रशंसेची एक थाप सोडा पण दोन प्रेमाचे शब्द पण ऐकावयास मिळत नाही. त्या ऐवजी कित्येकदा टोमणे मिळतात "उथळ पाण्याला खळखळाट फार" पण तोच खळखळाट सर्वाना गुंफून ठेवतो. त्याच खळखळाटाच मन शुद्ध असत म्हणून सर्वजण गुंफून राहिले असतात. जरी तो धागा बेफिकिरीने आपले विचार मांडत असला तरी त्यात स्वार्थीपणाचा/ कुजकेपणाचा दर्प नसतो. किमान एखाद्या शांत माणसा प्रमाणे तरी नाही ज्याच्या मनात खोलवर एकमेका बद्दल घमेंड, कुजकेपणा आणि घाण भरलेली असते. अगदी एखाद्या शांत डोहा प्रमाणे कि ज्याचा तळ गाठता येत नाही आणि कधी त्या शांत डोहात बुडून जाऊ याची भीती.


हल्लीच एक वाचनात आलेला उदाहरण मांडतो तुमच्या समोर.


जेव्हा पासून कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री असते तेव्हा पासून ते अगदी कृष्ण पांडवांच्या वाट्याला येतो आणि त्याची सेना कौरव मागून घेतात तो पर्यंत, अर्जुनाला कृष्ण हा फक्त आपला मित्रच आहे असेच वाटत असते. प्रत्येक वेळी अर्जुन हा कृष्णाला किरकोळ मित्र प्रमाणे वागवू लागतो, एक वेळ अशी येते कि अर्जुन कृष्णाला स्वतःपेक्षा कमी लेखू लागतो. पण जेव्हा युद्धा मध्ये श्री कृष्णाला आपला खरा अवतार दाखवण्याची वेळ येते तेव्हा अर्जुनाची जी बोबडी वळते आणि तो स्वतःला भगवान श्री कृष्णाच्या पायी समर्पित करतो तो पर्यंत अर्जुन भगवान श्री कृष्णाला गृहीतच धरत आलेला असतो. तेव्हा या वरून एक कळत कि कोणाला स्वतःच खर रूप दाखवायला भाग पाडू नका किव्हा दुसऱ्याला गृहीत (granted) पण धरू नका. 




आज त्या धाग्या मुळे तुम्ही जी "आपली म्हण्या जोगी" चार माणसा जमवून आहात ती टिकवून ठेवा. नाहीतर तिरडीला चार "आपले" खांदे देणारी माणस पण गमावून बसाल. कारण प्रत्येकाला ego नसला तरी self-respect नक्कीच असतो. जेव्हा एखाद्याचा self-respect पणाला लागतो तेव्हा मात्र ती व्यक्ती कोणाच काही ऐकून घायला तयार नसते आणि बहुदा वेळ हि निघून गेलेली असते. “I think people forget that sometimes the person (“धागा”) who tries to fix everyone needs fixing too”. कारण तो “धागा” "या सर्व" खटाटोपात कधी स्वतःच स्वतःच्या कोशात गुरफटू लागतो हे त्याच त्यालाच कळत नाही, मग ती जपलेली नाती कधी उध्वस्त होतात ते हि कोणाला कळत नाही आणि मग उरतो तो सगळ्या गर्दीत असूनहि असलेला "एकटेपणा".




म्हणूनच म्हणतो प्रयेकाने आवर्जून जपावा आपल्या नात्यातील "धागा". 




रोहन पालकर


Rohan's Blogs

Rohan Palkar
Chapters
धागा BLUE (ब्लू )