Get it on Google Play
Download on the App Store

एकटेपण

आयुष्य कुठे नेईल हे सर्व आपण जे कर्म करतो त्यावर अवलंबुन असत. आज जे जिवन जगत आहात हा कधीचा तरी परतावा असतो. सुरवातीला एकदम कर्म आणि त्याचा परतावा या विषयाला हात घालणार नाही.
अनेक गोष्टी अश्या घडतात ज्या तुमच अख्ख जीवन घडवुन टाकतात. वाईट चांगल्या अशी त्याची विभागणी होऊ शकत नाही. पण जे घडत त्यातून घडवण्याचा मार्ग निवडणारा नेहमी एक पाउल पुढे असतो. वाईट घडल तर ते का आणि चांगल घडल तरी ते का या दोन्ही परिस्थिती मधे कारण मीमांसा ही व्हायला हवी. आपण चांगल होत तेव्हा त्याची मीमांसा करीत नाही, त्यामुळे हे चांगल जे होत असत ते सर्व मान्य आहे का किंवा नाही सर्व मान्य पण नैतिकतेला धरून आहे का, या विवेकी विचाराचा आपल्याला विसर पडतो आणि आपण सरधोपटपणे जे केलंय त्यावर खुश होतो.
आयुष्यातील काही घटनांमुळे जे एकटेपण येत ते खूप काही शिकवून जात. जितकं जास्त एकटेपण तितका माणूस कणखर होतो. एकटेपणा मधे ज्याने मार्ग काढला त्याला आयुष्यात कुठेही कधीही कुठलंच संकट मारू शकत नाही. रोज नवी निराशा पदरी येते पण निराशा या शब्दामधे उद्याची आशा लपलेली असते, ती आपल्याला शोधायची असते. एकटेपण आपली ती आशा कायम ठेवत कारण जे आपण आपल्या मनाशी बोलतो ते अगदी खरं असत आणि त्या आशेवर आपण मार्गक्रमण करत असतो. आज नाही आल हाती काही म्हणुन कधीच येणार नाही ही पराभूत मानसिकता एकटेपणा मधे कधीच बळावू द्यायची नाही. निपजणे आणि जोपासणे ह्या दोन गोष्टी एकटेपणा मधे नेहमी सोबत असाव्यात. एकटेपणा आपल्या मधे खंबीरपणा ची रग नीपजतो आणि त्या खंबीरपणा मूळे आपण रोज नवी आशा एका सकारात्मक रित्या जोपासतो.
मन आणि मेंदू यांच तारतम्य एकटेपणा शिकवतो. मन एक सांगत आणि मेंदू एक सांगत. पण अश्या परिस्थिती मुळे आपली जिद्द दुपटीने वाढते आणि आपण जे ठरवतो ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या आजूबाजूला अश्या घटना घडत जातात की आपल्या नकळत आपण आपल्याला जे हव असत ते मिळवलेले असत.
अशक्य गोष्टी एकटेपणा आपल्याला शिकवून जातो त्यातील शक्यता.
समाज, नाते, मित्र सर्वांनी टाकून दिल्यावरच एकटेपण मी अनुभवल आहे, अर्थात माझ्या चुकीं ने मी ते ओढवले पण त्यातही आपल्याला आपला माणूस दाखवून जाणारी हीच ती वेळ. कळत नाही आपल्याला काही त्यावेळेस, आपल्यातला हळवा माणूस अजून हळवा होऊन आधार मागतो पण लोकांना ते ढोंग वाटते, त्यात त्यांची चूक नसते पण अश्या वेळेस आपण आपल्या भोवती आपलाच एक कोष निर्माण करायचा जो फक्त आपल्याला तोडता येईल. मन घट्ट करून सहनशीलता वाढवायची आणि जे खरं प्रेम आहे ते जिवंत ठेवायचं. राग आणि चीड या गोष्टीचा आपला अधिकार नाही असे समजून चालायचे. जखमा सहन होतात पण शब्दाचे वर्मी लागलेले घाव सहन करायला शिकवत ते एकटेपण, आणि म्हणून एकटेपण हे केव्हाही श्रेष्ठ ठरत आणि एक सहनशील आणि विवेकी मानवी मन ते नक्किच घडवत.
एकटेपणाची व्याख्या जर निर्माण करायला घेतली तर ती शरीराची अशी अवस्था असते किंवा आहे की जिथे सभोवताल हे नसत आणि आपण सर्वार्थाने एकटे असतो. त्यामुळे मनाचे नाते आपल्या अंतर्मनाशी ज्याला आपण चित्त म्हणू, ते होणे खूप गरजेचे असते. आणि त्या प्रत्येक क्षणी आपण आपल्या चित्ताला सांगायचे असते की मी सकारात्मक आहे. कारण आपले मन आणि विचार खूप तरल आहेत त्यांचा परिणाम बाहेरील वातावरणाने बदलत जातो पण चित्ताचे तसे नाही. म्हणून एकटेपणा एकाग्र चित्त शिकवते.
असा हा एकटेपणा मला आयुष्यात भरभरून मूल्ये देऊन गेला ज्यामुळे मला कधी एकटे वाटले नाही.

विश्वास

shishir Kulkarni
Chapters
एकटेपण