श्री..ची.. कविता - ६
श्री..ची..कविता..६
------------------------------
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..
मनात बैचेनता चे घर मांडले जातात..
तुला बोलायचे म्हणुन शब्द ही पळुन जातात..
डोळ्यात तुझ्या पाहात निशब्द होते मन माझे..
मनाची काहिलताही नकळतच जाणवते..
असंख्य शब्दात एक शब्द साथ न देती...
तुझ्या पुढे ते पण अबोला धरून बसती...
हावभाव चेहऱ्याचे तुझेच रूप सांगती..
तुझे प्रेम मिळावे म्हणुन ते धडपडती...
चलबिचल शब्दांची कसे स्थिर ठेऊ ...
प्रेमाचे शब्द पुढे कसे तरी मांडु......
वाटेवरच अडखळती माझे चे शब्द..
केव्हा पोहचेल तुझ्यापुढे हाच माझा ध्यास.
त्या तीन शब्दांच्या किमयेसाठी किती मी आतुर..
प्रेम करतो तुझ्यावर हेच माझे सांगणे गं ...
तुझा श्री ची तुच भावना समजुन घे सखी..
कारण तुच आहेस श्री..ची..कवीची राणी....
============================
अधिकृत लेखन : श्रीधर कुलकर्णी