Android app on Google Play

 

दी

 

भारतातील पंजाब, राजस्थान, गुजरात मधून वाहणारी प्राचीन नदी. पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. वेदांमध्ये ह्या नदीचा उल्लेख वारंवार केला गेला आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.सपूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली.

प्राचीन सरस्वती'आदि बद्री' पासून निघून हरियाणा, राजस्थान, व गुजरात या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत प्रवाह प्राप्त होत होता. त्या काळी गंगा नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी यमुना नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशब्दती नदी होते. शतद्रु म्हणजे सतलज नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.

महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टानिक मूव्हमेंटस) यमुनेने पात्र बदलले. ती एकमद पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलज पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंदू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पुरवठा करणा ग्लोशियर्स व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले.