Android app on Google Play

 

'ती' च विलोभनीय रुप.

 

               सकाळच्या  १० ते ५.३० च्या  नेहमीच्या  गुंतागुंतीच्या  'prime time'  मधून  आज  मोकळीक  मिळाली होती.

       तसंही, सुट्टी ची दिनचर्या जमा केलेल्या न्यूजपेपरच्या पुरवनण्या वाचन्यातच बहुदा जायची.......

"किती रे घर_कोंबडा तु..!" असे मित्रांच्या टोमण्यांची बऱ्यापैकी सवय ही झालीय आता..

पण आज जरा मुड वेगळा होता.. पाय मोकळे करावे.... थोडी भटकंती ही होईल...म्हणून घरा बाहेर पडलो....

       सुट्टी चा  दिवस  असल्याने  तळ्याकाठी  खूप  गर्दी असते.. त्यात  ही  लैला-मजनूंची  भर..............
Privacy matters बाबा ...म्हणून म तिकडे न जाता बाजूला च असलेल्या गार्डन मध्ये गेलो...

      सूर्य ही आग ओकुन थकला असवा म्हणून त्यालाही अस्ताची ओढ लागली होती.. फॅमिली गार्डन असल्या मुळे आजुबाजुच्या  वस्तीतली  लोकं  फेरफटका  मारण्यासाठी येतच राहतात...मी ही मग त्यामध्ये सामिल झालो..... रंगबिरंगी सुंदर फुलपाखरे टिपावी...  क्रमन करत  करत  नजर  ही  भिरभिरत  होती..

           "आगाशे  काय प्रकरण बाबा...!"
           "कसली भारी आहे ना राव ही..!"
           "किती गोड आहे ना ही.......!"

नकळतच मग स्तुतीसुमने निघाली... कारण ही तसंच होतं...समोरून 'ती' येत होती....  सौंदर्याने परिपूर्ण...

      खरंच, स्त्री सौंदर्य  हि अशी  एक  गोष्ट  जीच्याकडे पहाताच एक वेगळीच अनुभूती येते....जीला फक्त बघतच रहावे .....जी मनाला मोहून जाते....जीचे वर्णन करायला शब्द  अपुरे  पडतात... जीच्यासाठी  कविता  रचल्या जातात .....खरचं  बोलावे  तितके  अपुरेच !!!

          'ती' ही अशीच काहीशी होती.... नाही.. नाही... या पेक्षा ही भारीच होती ती...सौंदर्याच्या सगळ्या उपमा कमी पडाव्यात..

         'ती'  ला बनवताना देवाने  सौंदर्याचा एक  परिपूर्ण साचा च  वापरला  असावा...गोरीपान........रेखीव चेहरा, असा तेजस्वी  की, जणू  स्वर्गीय  लावण्याची  झळाळती मुद्राच .....कमनीय  बांधा....मृगनयनी  डोळे .............
गुलाबाच्या  पाकळी  सारखे  नाजुक  ओठ......मोकळे सोडलेले लांब सडक जर्द काळे केस जणू कही उंचावरून फेसाळत पडणारा धबधबा...... 'ती' च्या 'लावण्या' त माझे शब्द ही कमी पडले..

खरंच...."निसर्गताच स्त्रीयांना सौंदर्याचा अमाप खजिना लाभला आहे.."

        काही  क्षणातच 'ती' च  विलोभनीय रूप डोळ्यात भरलं गेलं...स्तब्ध झालो ...पाय जागेवर खुंटले.. 'ती' च्या मोहक  रूपात  पुरता बुडालो...जशी जशी ती जवळ येत गेली.. ह्र्दयाचे  ठोके  नकळतच  वाढले...तसं  ही  हा नेहमीचाच प्राॅब्लेम माझा.. जेंव्हा कधी एखादी सुंदर मुलगी समोरून जाते तेंव्हा 'ह्र्दय' उसेन बोल्ट च्या स्पीड ने धडधडतं.........असो....

पण् ......'ती'  मात्र  मोबाईल मध्ये जरा जास्तच बिझी होती... तिला  कसलच  भान  नव्हतं...ना  या  गोष्टीची कल्पना  की  आपल्या  सौंदर्यावर  कोणी  एवढा भावला असावा...

          पूर्वी  रस्त्यावरची  'ती'  जिवंत असायची... तिच्या कडे  चोरून बघावं लागायचं.. ..तिनं उलट नजर दिली तर आपण दुसरंच काही तरी  वेगळं करतोय असं झटकन दाखवायची  तयारी  लागायची... ती एक  वेगळीच कला असायची.. सगळ्यांना ते जमतही नसे..!

    पण  हल्ली ते कौशल्य  लागत नाही..... कारण  तुम्ही तिच्याकडे बघा, अथवा  नका  बघू  तिला  काहीच  फरक पडत नाही.. कारण  'ती'  सतत  मोबाईल  वरच असते.... सतत कुणाशी तरी बोलत असते.. चॅट  करत  असते.....
कदाचित तुमचं 'अस्तित्व' ही तिला जाणवणार नाही...

 

ती

Mahendra Dalvi
Chapters
'ती' च विलोभनीय रुप.
'ती' च विलोभनीय रुप.