Get it on Google Play
Download on the App Store

तू माझी मी तुझा


सखे पाहीले जेव्हा तुला 

मी गालातल्या गालात हसलो होतो 

आणि असलो जरी साधा सरळ 

तेव्हापासून बिघडलो होतो 

रात्रंदिवस तुझाच विचार 

चेहरा तुझा आठवत होता 

आणि मित्रही मला आता 

तुझ्या नावाने चिडवत होता 

चाफेकळी ओठ तुझे 

डोळे ही करी अदा 

डौलदार चालीवर तुझ्या मी

झालो होतो फिदा 

वाटले सांगावे सगळ मनातल 

तुला एकांतात भेटून

लग्नाच तुझ्या कळताच 

कंठ आला माझा दाटून 

इतकं प्रेम करूनही 

नशीब अस कस घडल 

तू कधीच नव्हती माझी म्हणून 

मन माझं रात्रभर रडलं 

- मुकेश कुलथे 

प्रेम कविता

Mukund Kulthe
Chapters
तू माझी मी तुझा