Get it on Google Play
Download on the App Store

२२२ सुपर सुविचार

1.    जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते तसेच, मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज प्रेरणादायी सुविचारांची आवश्यकता असते.

2.    काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश, सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात.

3.    जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांना तुमच्यावर प्रेम करायला लावण्यात वेळ घालवण्याऐवजी जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्यावर आणखी प्रेम कसे करतील याकडे लक्ष देणे अधिक चांगले! -चेतन भगत

4.    ज्याने आयुष्यात काहीच साध्य केले नाही, त्याने तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला बिलकुल सांगू देऊ नका.

5.    तुमच्या आयुष्याचे नियंत्रण तुमच्या स्वत:च्याच हाती ठेवा, नाहीतर ते नियंत्रण दुसरे कुणीतरी घेईल.

6.    बदल कुणीही घडवून आणू शकतो. जे कराल ते मनापासून करा. मनापासून प्रयत्न केल्यास बदल घडतोच. - प्रियांका चोप्रा

7.    प्रत्येकजण जग बदलायचा विचार करतो. पण स्वत:ला बदलायचा विचार कुणीच करत नाही. - Leo Tolstoy

8.    जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सत्याच्या बाजूने उभे आहात, तर मग अशा वेळेस तुमच्या विरोधात कोण कोण उभे आहे याचा विचार लढतांना करू नका! - कृष्ण अर्जुनाला म्हणाले

9.    कणखरपणा हा आत्म्यामध्ये आणि मनामध्ये असतो; स्नायूंमध्ये नाही - अलेक्स करस

10.    कुठल्याही आजारावर उपचार करण्याआधी; मनावर करा. - चेन जेन

11.    कुलूपे फक्त प्रामाणिक माणसांनाच दूर ठेवतात. - ज्यू म्हण

12.    कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते; पण वृत्ती मात्र हलक्या दर्जाची असू शकते. - विल्यम बेनेट

13.    ज्या माणसाला स्वतःचे असे अंतस्थ आयुष्य नसते; तो आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम असतो. - हेनरी अमील

14.    माझ्या मालकीच्या किती गोष्टी आहेत यावरून माझी समृध्दी आणि श्रीमंती ठरत नाही; तर माझ्या गरजा किती कमी आहेत यावरून ते ठरते. - जे. ब्रदर्टन

15.    काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा; स्वतःलाच बदलण्याची गरज असते. - ऑर्थर बेन्सन

16.    आपल्या परिस्थितीमुळे नाही; तर आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्याला आनंद मिळत असतो. - अज्ञात

17.    असे वागा की तुम्ही जे काही करणार त्याने काही ना काही फरक नक्की पडणार आहे; आणि तो पडतोच! - विल्यम जेम्स

18.    ज्याचेकडे जगण्याचे सबळ कारण आहे असा माणूस; कसेही करून आयुष्यातील कशाही आणि कोणत्याही गोष्टीतून हमखास तरून जातो आणि सहन करतो. - फ्रेडरिक नित्से

19.    दररोज संध्याकाळी मी माझ्या काळज्या देवावर सोपवून देते; तसाही तो रात्रभर जागाच असतो. - मेरी क्राऊले

20.    स्वप्ने पाहिली पाहिजेत, ती पूर्ण होतात! नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?

21.    काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.

22.    तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपीत कधीही कुणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही! तो कधीतरी ते गुपीत इतरांजवळ उघडे करणारच! गुपीत त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही. आपण स्वत:च आपले गुपीत इतरांना सांगण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपीत लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? - चाणक्य

23.    नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हालाच स्वत:लाच चालायचा आहे! - गौतम बुद्ध

24.    दुसर्‍याच्या पराभवाची वाट बघणार्‍याला हे समजतच नाही की तो दुसर्‍याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वत:चा वेग आपोआपच कमी होत असतो. @milindmane1972

25.    सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत.

26.    आपल्या मागच्या पिढीतील लोकांना ज्या गोष्टीबद्दल आपण नावे ठेवली, त्यांच्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत त्याच नेमक्या जर आपण पुन्हा आपल्या पुढच्या पिढीसोबत करू लागलो तर आपल्यासारखे दांभिक, दुटप्पी, स्वार्थी आणि खोटारडे आपणच!

27.    तुम्ही कुणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवली नाही तर तुम्ही कधीही निराश होणार नाहीत.

28.    जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी 3 गोष्टी करा - वाचन, पर्यटन आणि श्रवण

29.    खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला.

30.    मुर्खाचे हृदय जिभेवर असते, शहाण्याची जीभ हृदयात असते.

31.    चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र

32.    इतरांबद्दल तोंडावर स्पष्ट बोलणारा व्यक्ती, इतरांनी त्याचेबद्दल स्पष्ट बोलल्यावर का दुखावतो?

33.    अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!

34.    लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!

35.    एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.

36.    समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या!

37.    समस्येशी सामना करायला सुरुवात करणे ही समस्या सुटण्याची सुरुवात असते! - कलर्स टीव्ही महाकाली सिरीयल डायलॉग

38.    भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.

39.    एखाद्या बद्दल आदर दाखवण्याचा सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे!

40.    प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पड़ू नका. कारण हा तुमचा आयुष्य प्रवास आहे, लोकांचा नाही. ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वत:च्या सोयीनुसार अर्थ लावतात.

41.    प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वत: परमेश्वर नाखुश असतो.

42.    "ताणतणाव, अस्वस्थता आणि खिन्नता हे सगळे आपल्याला तेव्हा घेरतात जेव्हा आपण फक्त इतरांना खुश करण्यासाठी जगतो" -पाउलो कोहेलो

43.    आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाही. तो आजच घेतला पाहिजे- जिम रॉन

44.    स्वतःवर प्रेम करायला विसरू नका - सोरेन कर्कगार्ड

45.    दिलेले वचन हे एखाद्या घेतलेल्या कर्जासारखेच असते.

46.    लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.

47.    प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका. जेवढी टीका कराल तेवढीच प्रशंसा सुद्धा करा. एखाद्याच्या प्रत्येक दोषावर तुम्ही टीका करता का? तर मग त्याच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे कौतुक सुद्धा करा. टीका करण्यात शब्दांची उधळपट्टी आणि कौतुक करण्यात शब्दांची काटकसर करू नका. जो प्रशंसा करू शकत नाही त्याला टिका करण्याचा सुद्धा अधिकार नसतो.

48.    सगळीच वादळे आपल्याला उध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात.

49.    अपयशाच्या कहाण्या वाचा, त्यातून तुम्हाला यशाच्या कल्पना सुचतील.

50.    माणसात देव असतो असे म्हणतात पण माणसात माणूस आहे की नाही हे आधी महत्वाचे आहे.

51.    महानतेच्या शिखरावर नेणारा रस्ता खूप ओबडधोबड आणि कठीण आहे - सेनेका

52.    एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.

53.    ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत. ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवारही येऊ नये. - प्राचार्य शिवाजीताव भोसले

54.    लहान सहान निर्णय ताबडतोब घेण्याची सवय लावा. म्हणजे महत्वाचे निर्णय घायला तुमचे मन मोकळे राहील.

55.    आपण इतरांच्या कशाविषयी तक्रार आणि टीका करतो? अशा गोष्टी विषयी ज्या आपल्याला आपल्याबद्दल आवडत नसतात. - विल्यम हारटन

56.    सर्व सुखी कुटुंबे एकसारखी असतात. पण प्रत्येक दु:खी कुटुंब आपापल्या पद्धतीने दु:खी असते - एना केरनीना

57.    होय म्हणणे ही एक सवय होऊन जाते. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहेमी ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका.

58.    इंदिरा गांधी: माझ्या आजोबांनी मला एकदा सांगितले होते - लोक दोन प्रकारचे असतात. एक - जे काम करतात; दुसरे - जे इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेतात. आजोबांनी पुढे मला सांगितले की तू पहिल्या प्रकारच्या लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न कर, कारण इथे स्पर्धा कमी असते.

59.    आपण केलेल्या चांगल्या कृत्याची कुणी दखल घेतली नाही तर हरकत नाही पण त्या विधात्याकडे आणि निसर्गाकडे ती दखल घेतली जाते आणि आपल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतेच याबद्दल खात्री बाळगा.

60.    घरात वादविवादाची आग लागली असेल तर कृपया ती विझविण्यासाठी तुम्ही बाहेरच्या कुणाही नातेवाईकांना बोलावणार असाल तर सावधान! कारण, फारच थोडे नातेवाईक सोबत पाणी घेऊन येतील. बाकीचे मात्र पेट्रोल, तेल, हवा असे सगळे पदार्थ घेऊन येतील.

61.    कमी बोला, नेमके बोला आणि हळू बोला म्हणजे लोक तुमचे बोलणे ऐकण्यास उत्सुक असतील.

62.    नशिबाला कुणाच्या नावे ठेऊ नये. नशीब कुणी विकत घेत नाही. ज्याला त्याला कमी जास्त, आपापल्या नशिबाने मिळते.

63.    कुणाचे चांगले झाले, तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले, तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही.

64.    बुद्धी कितीही तल्लख असली, तरी नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही, कारण बिरबल कितीही बुद्धीवान असला, तरीही तो राजा होऊ शकला नाही..!

65.    अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या महत्वाकांक्षेला कमी लेखतात. छोटे लोक असे करतात. महान लोक मात्र तुम्हालाही हिंमत देऊन तुम्हीही महान बनू शकता असे तुम्हाला सांगतात. - मार्क ट्वेन

66.    माणसाचे खरे रक्षण मित्र आणि ज्ञान करतात.

67.    स्वातंत्र्याचे सगळयात महत्वाचे रूप म्हणजे आपण जसे आहोत तसेच 'असण्याचे' आपल्याला असलेले स्वातंत्र्य!

68.    जीवन पुढच्या दिशेने जगायचे असते आणि मागच्या दिशेने समजून घ्यायचे असते.

69.    "अंजान लोग और अंजान जगहों से हमेशा डर लगता है!" - क्रिश ३ में विवेक ओबेराॅय ने प्रियांका चोप्रा से कहा.

70.    "टेक्नॉलॉजी अपनों से ज्यादा पुलिस को करीब लाती है!" - अनिल कपूर (as जयसिंग राठोड) in 24 on कलर्स

71.    काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. त्यामुळे त्या ‘जैसे थे’ ठेवणे एवढेच आपण करू शकतो.

72.    प्रचंड दडपण असतांनाच धैर्याची खरी कसोटी लागते- अर्नेस्ट हेमिंगवे

73.    जुनी जाणती आनि वयोवृद्ध मंडळी युद्धाची घोषणा करतात, पण लढावे आणि मरावे लागते ते तरुणांनाच! - हर्बर्ट हुवर

74.    लेखणी ही आपल्या मनाची जीभ असते - होरॅस

75.    वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वत:ची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो!" - जोहान वॉन गॉथे

76.    आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं.

77.    पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाहीत. त्यांना "वाचावं" लागतं! - सुलेखन शिरिष (फेसबुक)

78.    पुस्तकांसारखा दुसरा मित्र कुणीही नाही. पुस्तकांसारखे श्रेष्ठ आणि पवित्र दुसरे काहीही नाही.

79.    वाचण्यासाठी पुस्तके फार जास्त आहेत आणि जीवन आणि वेळ खूप थोडे आहेत. - फ्रॅन्क ज़प्पा

80.    "तुम्ही जेथेही जाल, तेथील हवामान  कसेही असो, तुम्ही तुमचा स्वत:चा सूर्यप्रकाश  सोबत नेत चला!" -अँथोनी अ‍ॅन्जेलो

81.    जेथे दान देण्याची शिकवण असते तेथे संपत्तीची कमी नसते. आणि जेथे माणुसकीची  शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते - नव वर्षा होले

82.    तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच यशस्वी होतो. तडजोड करायला ज्ञान नाही तर शहाणपण लागते. - मुंबई चौफेर पेपर

83.    माणूस तोपर्यंत जुना आणि पराभूत होत नसतो जोपर्यंत त्याचा पश्चाताप हा त्याच्या स्वप्नांची जागा बळकावत नाही - पुणे मिरर पेपर  

84.    आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते - ओशो

85.    एका चांगल्या व्यक्तीची ओळख दुसरी चांगली व्यक्तीच करून देऊ शकते.

86.    अहंकारविरहीत केलेली एखादी लहानशी सेवाही मोठीच असते.  

87.    आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आनि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत. - श्रीकृष्ण

88.    कुणाचेच अनुकरण करायला नको, मात्र सगळ्यांकडून थोडे थोडे आपण शिकू तर शकतो, नाही का?

89.    जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते.

90.    गोड मध बनवणारी मधमाशी वेळ आली की चावायला विसरत नाही. माणसाने नेहमीच सावधगिरी बाळगायला हवी, कारण, जास्त गोड बोलणारे पण आपल्याला इजा पोहचवू शकतात. - मराठी सुंदर सुविचार फेसबुक पेज

91.    गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातूनन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात. म्हणून सावध रहा. - मराठी सुंदर सुविचार फेसबुक पेज

92.    सगळ्यांना रोज भेटणे आपल्याला शक्य नसते, पण आपण चाटिंग मात्र सहज आणि रोज करू शकतो. संपर्कात राहणे ही सुद्धा खुप मोठी गोष्ट आहे. जितका जास्त संपर्क तितकच तुमचे नाते टिकून राहते.

93.    लाईफ मध्ये सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, कारण सूत्र कमी पडतात. न येणारे प्रश्न सुद्धा सोडवायला गेले तर जे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत त्यांच्यासाठी वेळ मिळणार नाही आणि आयुष्य संपेल.

94.    आपल्या शरीरातील तोंड नावाच्या गुहेत जीभ नावाची वळवळणारी नागीण रहाते. ती स्वैर सुटली तर बोलून बोलून म्हणजेच निंदा नालस्ती करून अनेकांच्या कानांना विषारी दंश करत रहाते. त्यामुळे तिला स्वैर आणि सैल सोडणे महागात पडते.   

95.    तीन महत्वाच्या गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवा आणि पालन करा: खोटे बोलू नका, कुणाला फसवू नका आणि ध्येयाच्या दिशेने प्रयत्न सोडू नका.

96.    इतरांच्या चुकांतूनही शिका कारण स्वत:वर प्रयोग करत बसलात तर आयुष्य कमी पडेल.

97.    पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण, पैशांचे रक्षण तुम्हाला करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करते.

98.    एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट बदलता येत नसेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला! - मार्क ट्वेन

99.    जास्त अभिमानाचे रूपांतर नेहेमी अहंकारात होते.

100.    हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो ते "नाही" लवकर बोलल्यामुळे आणि "हो" उशिरा बोलल्यामुळे!

101.    तुमचे "दृष्टी" चांगली असेल तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल. आणि जर तुमची वाणी गोड असेल तर जग तुमच्या प्रेमात पडेल.

102.    ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

103.    आळशीपणा, चालढकलपणा आणि दिरंगाई हे यश मिळवण्याच्या मार्गातले तीन शत्रू आहेत.

104.    दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण.

105.    यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहीही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.

106.    वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे.

107.    मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही.

108.    आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.

109.    संशय म्हणजे स्वत:च्या अंगाभोवती लपेटलेला साप होय. तो कधी ना कधी आपल्याला दंश करतो त्याचबरोबर त्याच्या भीतीने इतर लोक आपल्यापासून दूर जातात.

110.    जो प्रशंसा करू शकत नाही त्याला टिका करण्याचा अधिकार नसतो.

111.    अति सावध होऊन धोका न पत्करणे हाच सगळ्यात मोठा धोका आहे.

112.    "बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे" - महाभारत

113.    कधीही कुणाची कुणाशी तुलना करु नये. स्वत:ची सुद्धा कुणाशी तुलना करू नये. कारण कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात. तुलनेमुळे तुम्ही स्वत:चा आणि ज्या परमेश्वराने तुम्हाला बनवले आहे त्याचा सुद्धा अपमान करत आहात.

114.    सुखाबद्दल एकच दुःख आहे की सुख निघून गेल्यावर कळतं की ते सुख होतं.

115.    तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा, कुणी दखल घेवो अथवा न घेवो, कुणी तारीफ करो अथवा न करो. अर्धे लोक झोपलेले असतात जेव्हा सूर्य उगवतो. आपण प्रकाश देतोय हे कुणी बघतंय की नाही याची पर्वा तो उगवतांना करत नाही.

116.    सगळ्यांच्या समस्या टेबलावर मांडून ठेवायला सांगितल्या आणि कुणी कोणतीही समस्या निवडा असे सांगितले तर नक्की प्रत्येकजण आपापलीच समस्या उचलेल.

117.    नशिबाची एक वाईट खोड असते. ते नेहेमी अशा व्यक्तींवर प्रसन्न होते जे  त्याचेवर अवलंबून रहात नाहीत.

118.    काही नाती जपली जातात तर काही जपावी लागतात. तसेच काही नाती जोडावी लागतात तर काही जोडली जातात.

119.    "आज देवाने तुम्हाला सकाळी झोपेतून उठवलं आणि आजचा दिवस दाखवला याबद्दल सर्वप्रथम देवाचे आभार माना. आज तुमच्याकडे जे काही आहे, त्याबद्दल सुद्धा आभार माना आणि दिवसाची सुरुवात अशा प्रकारे कृतज्ञतेने करा" -ओस्वाल्ड चेंबर्स

120.    स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःबद्दलच्याच्या सकारत्मक बाबींचे रोज सकाळी चिंतन करा म्हणजे आत्मविश्वास कायम राहील. कारण तुमचे दोष, चुका आणि नकारात्मक बाजू दाखवायला इतर लोक बसले आहेतच. कुणीही परिपूर्ण नसतो हे लक्षात ठेवा आणि तुमचे गुण वाढवा आणि दोष कमी करण्याचा प्रयत्न करत राहा.

121.    आजकाल कोण काय करतंय, कसं करतंय आणि का करतंय ह्या सगळ्यात लक्ष घालत बसण्यापेक्षा आपल्याला आज काय करायचंय, कसं करायचंय आणि का करायचंय याकडे जास्त लक्ष देणं केव्हाही चांगलं!

122.    सतत इतरांशी तुलना करत राहिल्याने आपलं सत्व आणि स्वत्व दोन्ही नष्ट होऊन जाते.

123.    जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जगा. सगळ्यांत मिसळा, एकरूप व्हा पण स्वतःचे महत्व कमी होऊ देऊ नका.

124.    जीवनाच्या गाडीत प्रबळ इच्छाशक्तीचे इंधन टाका. या इंधनाची टाकी कधीही रिकामी होवू देवू नका.

125.    कुणाचेही कौतुक करायला, जिगर आणि दिलदारपणा आवश्यक असतो. कुणाची निंदा करणे तर फारच सोपे असते.

126.    वाजवीपेक्षा जास्त चांगले वागाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल!

127.    जे जीवनाचा आंनद घेत आहेत त्यांच्यासाठी जीवन उत्तम असते. जे जीवनाची चिकित्सा करत आहेत त्यांच्यासाठी जीवन कठीण असते. जे जीवनाबद्दल टीका करत बसतात त्यांच्यासाठी जीवन हे सर्वात मुश्किल बनते. शेवटी आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या जीवनाची व्याख्या ठरवतो.

128.    "आनंदी होण्याचा थोडा जरी अवसर आणि संधी मिळाली तर ती सोडू नका. कारण जीवन क्षणभंगुर, छोटे आहे आणि आनंद आजकाल दुर्मिळ होत चालला आहे!" -ए. आर. ल्युकस

129.    जेव्हा कुणी तुमचे हृदय दुखावेल तेव्हा शांत रहा. त्याला उत्तर देऊ नका. त्याला ईश्वर उत्तर देईलच.

130.    "पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टीनी निराश आणि नाराज होणे सोडा. अशा प्रकारे जगण्यासाठी आयुष्य खूप छोटे पडेल!" - जोएल ओस्टीन

131.    "तुमच्या आत्मविश्वासावर आणि स्वाभिमानवर सतत हल्ला करणारे तेच लोक असतात ज्यांना तुमच्या क्षमता आणि सामर्थ्यावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास असतो आणि त्याची भीती सुद्धा वाटत असते!" -वेन गेरार्ड ट्रॉटमन

132.    ज्याला समजण्यात माणूस अयशस्वी होतो, त्याचा द्वेष करायला लागतो.

133.    रोजच्या जीवनात संगीत, योग आणि हास्य यांचा अंतर्भाव ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

134.    कर्तव्य अधिकाराशी आणि अधिकार कर्तव्याशी अतूट साखळीने बांधलेला असतो.

135.    माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाती बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात? कारण ते स्वत: बदलत नाहीत.

136.    खोटं सहज खपून जातं कारण सत्य खरेदी करायची सगळ्यांचीच लायकी नसते.

137.    तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता नाही, फक्त विचारांना तुमच्यावर नियंत्रण मिळवू देऊ नका.

138.    जीवनात कधी स्वतःला कुणाच्या खूप अधीन होऊ देऊ नका. कारण, माणूस फार स्वार्थी असतो. जेव्हा तुम्हाला पसंत करतो तेव्हा तुमचे वाईटपण आणि दोष विसरून जातो आणि जेव्हा तुमचा तिरस्कार करतो तेव्हा तुमच्यातील चांगुलपणा विसरतो.

139.    तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण तुमची मुलं त्यांच्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं आणि त्यांच्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव असणारं जे व्यक्तीचरित्र अभ्यासतील ते तुम्हीच स्वतःच असणार -मार्क टीम

140.    पाप नक्कीच वाईट आहे पण त्याहूनही वाईट पुंण्याचा अहंकार आहे.

141.    हुशार व्यक्तीचा खरा दागिना म्हणजे ज्ञान होय.

142.    सगळ्यांत योग्य धोरण कोणतं? प्रामाणिकपणा! फक्त त्याला व्यवहार ज्ञानाची जोड द्या.

143.    तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

144.    विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदलेल!

145.    ज्याच्या डोळ्यावर अहंकाराचा पडदा पडलेला आहे त्याला ना स्वतःचे अवगुण दिसत असतात, ना दुसऱ्याचे गुण दिसत असतात.

146.    गुन्हेगार हा जमिनीत वाढणाऱ्या अनावश्यक गवतासारखा असतो. एक उपटून फेकले की त्याच्या जागी दुसरा कधी न कधी उगवतोच.

147.    तुम्ही एखाद्या व्यक्तीला सर्वकाही देत असाल, तरी देखील ते त्याला अपूर्ण पडत असेल तर समजावे की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला देत आहात.

148.    एखाद्या गोष्टीवर किंवा मुद्द्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याचा अर्थ, मला हे सगळं समजलंच नाही आणि मान्य नाही किंवा सगळंच समजलं आणि मान्य आहे असा होत नाही.

149.    एखाद्या गोष्टीवर मी काही बोललोच नाही याचा अर्थ मला काही बोलायचेच नव्हते असेही नाही.

150.    लोक मला म्हणायला लागले की, "तू खूप बदललास रे!" मी त्याना म्हटले, "हो रे! तुटून गेलेल्या फुलांचा रंग बदलतोच ना!"

151.    लोक मला म्हणायला लागले की, "तू खूप बदललास रे!" मी त्याना म्हटले, "नाही रे! मी लोकांच्या आवडीनुसार जगणे फक्त सोडले आहे!"

152.    ज्या दिवशी तुम्ही तुमचे आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच तुमचा दिवस आहे. बाकी तर काय फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत.

153.    एखादेवेळेस खोटे बोलणे सत्य बोलण्यापेक्षा योग्य असते. फक्त ते कुणाला हानिकारक नसावे आणि ते कुणाचा घात आणि अवमान करण्यासाठी वापरलेले नसावे. कारण सत्य सुद्धा सापेक्ष असते. एकाला एक गोष्ट सत्य तर दुसऱ्याला अर्धसत्य किंवा असत्य वाटू शकते. कारण सत्याच्या अनेक बाजू असतात.  मला तर वाटतं की सत्य असत्याचा घोळ नसावा म्हणून मौन रहाण्याचा शोध लागला असावा -वजू कोटक (चित्रलेखा)

154.    जेव्हा आपली वेळ वाईट असते, तेव्हा लोकही वाईट वागतात. आणि चांगली वेळ आली की, सगळेच चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे  नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल.

155.    कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. कारण नाती जपण्यासाठी  संवाद आवश्यक आहे.

156.    कितीही केलं तरी तेथे कमीच असते, जेथे नावडतीचं मीठ अळणीच असते. म्हणजेच एखाद्याने आपले दोषच काढायचे ठरवले तर आपण कितीही चांगले वागले तर त्याला आपले गुण दिसणारच नाहीत. तो आपल्यावर टीका आणि निंदाच करेल. अश्या टिकेकडे एका मर्यादेपर्यंत दुर्लक्ष करावे. डोक्याच्या पार गेले की मग मात्र धडा शिकवावा.

157.    विचारी माणसाने दिवसा अशी कर्म करावी की त्याला रात्री सुखाने झोप येईल. तरुणपणात अशी कर्म करावी की त्याला म्हातारपणात सुख मिळेल. आणि जन्मभर अशी कर्म करावी की त्याला परलोकात आणि पुढील जन्मात देखील सुख मिळेल.

158.    भुते आणि राक्षस  दुसरीकडे कुठे नाही, तर आपल्याच आत मध्ये राहात असतात. कधीकधी ते आपल्यातल्या माणुसकी वर विजय सुद्धा मिळवतात! -स्टीफन किंग

159.    जगा इतके की, आयुष्य कमी पडेल. हसा इतके की, आनंद कमी पडेल. काही मिळाले किंवा नाही मिळाले, तो नशिबाचा खेळ आहे. पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.

160.    आपण विश्वातील प्रत्येकच गोष्टीत कार्यकारण भाव शोधू नये. काही गोष्टी श्रद्धेने आणि विश्वासाने स्विकाराव्यात. आयुष्यात श्रद्धा जरूर असावी. श्रद्धेची कधी चिकित्सा करू नये. तसेच इतर कुणाच्या श्रद्धेची टर उडवू नये. श्रद्धा आणि विश्वास मोठमोठे बदल आणि चमत्कार घडवतात.

161.    या जगात चांगली माणसे भरपूर असतात आणि चांगले प्रसंग, घटना घडतात आणि यापुढेही घडत राहणार! फक्त तसे होईल असा विश्वास पाहिजे. मग ही चांगली माणसे आपोआप तुम्हाला आपल्या आसपास दिसायला लागतील आणि चांगल्या घटना घडतांना दिसू लागतील.

162.    समोरच्या व्यक्तीला त्याच्या जीवनातल्या त्याच्या एखाद्या भूमिकेबद्दल दूषणे देत असतांना आणि अपेक्षा करत असतांना, आपण त्या भूमिकेत होतो तेव्हा आपण काय केले होते (आणि नव्हते), याची जाणीव आणि आठवण नेहेमी असू द्यावी.

163.    प्रेयसीचा एकनिष्ठपणा तेव्हाच पणाला लागतो जेव्हा तिच्या प्रियकराकडे काहीच नसतं किंवा असलेलं नष्ट होतं. प्रियकराचा एकनिष्ठपणा तेव्हाच पणाला लागतो जेव्हा त्यांचेकडे सगळं काही असतं किंवा मिळतं.

164.    आपण कुणाला कितीही कसेही समजावून सांगितले तरी ज्याने समजून घ्यायचे नाही असे ठरवले आहे, तो आपल्याला कधीही समजून घेणारच नाही कारण झोपेचे सोंग घेणाऱ्याला झोपेतून उठवता येत नाही. ज्याने आपल्याबद्दल गैरसमज करायचे मनाशी ठरवले आहे त्याला कितीही समजावले तरी फायदा नाही.

165.    आपण जर फक्त संपर्कातल्या प्रत्येकालाच खुश ठेवण्यासाठी कर्म करत आणि जगत राहिलो तर आपण झिजून झिजून संपून जाऊ पण इतर लोकांच्या अपेक्षा कधी संपणार नाहीत. आणि तरीही कुणी ना कुणी तुमच्यावर नाखूष असेलच!  हे लक्षात ठेवा की लोक घोड्यावर ही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. त्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहून आणि आपल्या अंतरात्म्याचे ऐकून त्यानुसार कर्म करा.

166.    प्रेम, संवाद, कर्तव्य, हक्क आणि अपेक्षा या गोष्टी कधीच एकतर्फी असू नयेत. असल्यास त्या अयशस्वी आणि निरर्थक होतात.

167.    कुणाजवळही मदत, सल्ला किंवा माहिती मागतांना लाज, भीती आणि संकोच वाटून घेऊ नये कारण आपण परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण नसतो व असहाय्य असू शकतो. पण मागितल्यावर एखाद्याकडून तिन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत तर लगेच त्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून त्याची निंदा व बदनामी करू नये कारण ती समोरची व्यक्ती सुद्धा परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण नसते व असहाय्य असू शकते.

168.    मागीतल्याशिवाय कुणालाही सल्ला, मदत, किंवा माहिती देऊ नये नाहीतर कुणालाच त्यांची किंमत, महत्व आणि आदर राहात नाही.

169.    फक्त आपणच दिलेली माहिती, मदत आणि सल्ला समोरच्याने मानला पाहिजे असा आग्रह धरू नये. मागितल्यावर शक्य झाल्यास देणे आपले काम. घेणे न घेणे हा निर्णय समोरच्या व्यक्तीवर सोडावा.

170.    ही दुनिया दांभिक आहे. या जगात नेहमी सावधतेने पावले टाका.  येथे पावलापावलावर धोके आहेत. "ही व्यक्ती धोकेदायक आहे" असे धोक्याचे इशारे कोणत्याच व्यक्तीच्या कपाळावर चिटकवलेले नाहीत. ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. नाही ओळखता आले तर आपली घोर फसगत होते. त्यातून बाहेर निघता निघता आपल्या जीवनातला अमूल्य वेळही निघून जातो आणि धोका देणारा मात्र नामनिराळा होतो, त्याचा हेतू साध्य होतो आणि आपण मात्र बरबाद होतो.

171.    एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.

172.    आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व बहाल करतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे. तसेच पत्नी, सून ही गृहलक्ष्मी असते. पण तीला देवत्व देताना तीला माणूस म्हणून समजुन घेणे आणि स्वीकारणे जास्त महत्वाचे आहे, नाही का?

173.    स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक आहेत. दोन्ही एकमेकांचे स्पर्धक नसून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.

174.    समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना. तलवार बनलात तर वार होईल. ढाल बनलात तरी वार होईल. म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल.

175.    कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात.

176.    अपयश कायम नसते. यश सुद्धा!

177.    पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.

178.    एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?

179.    कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!

180.    शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो.

181.    चांगल्या गोष्टीचा अतिरेक एका लहान वाईट गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करतो.

182.    कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचे जीवन आणि मार्ग वेगळे असतात.

183.    प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पड़ू नका. ऐकणारे लोक त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात.

184.    तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती हिरावून घेते. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो कधीही खोटा ठरत नाही.

185.    ह्या जगात शोधल्यावर सगळ्या गोष्टी सापडतात फक्त आपली चूक सापडत नाही.

186.    स्वर्गाची आशा सोडा आणि नरकाची भीती सुद्धा सोडून द्या. पाप पुण्याची चिंता सोडा. फक्त तुमच्यामुळे कुणाचे हृदय दुखावणार नाही एवढी काळजी घ्या आणि बाकीचे निसर्गावर सोडा.

187.    माणुसकीच्या भावनेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे प्रेम आणि दानवतेच्या भावनेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे द्वेष.

188.    प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात.

189.    एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक!

190.    स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक आहेत. दोन्ही एकमेकांचे स्पर्धक नाहीत तर दोन्ही एकमेकांना आहे पूरक आहेत.

191.    समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना. तलवार बनलात तर वार होईल. ढाल बनलात तरी वार होईल. म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल.

192.    संशय म्हणजे स्वत:च्या अंगाभोवती लपेटलेला साप होय. तो कधी ना कधी आपल्याला दंश करतो त्याचबरोबर त्याच्या भीतीने इतर लोक आपल्यापासून दूर जातात.

193.    बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे - महाभारत

194.    कधीही कुणाची कुणाशी तुलना करु नये. स्वत:ची सुद्धा कुणाशी तुलना करू नये. कारण कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात.

195.    चांगल्या गोष्टीचा अतिरेक एका लहान वाईट गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करतो.

196.    कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचे जीवन आणि मार्ग वेगळे असतात.

197.    आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे, तेव्हा इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय?

198.    आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही, तेव्हा आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा. पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका. ती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतली गेली तर काय कराल?

199.    तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्ती ची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेते.

200.    दोन व्यक्तींमध्ये तुलना करणाऱ्या व्यक्तींचा हेतू कधीच उदात्त नसतो. कारण तुलना करून त्या दोन व्यक्तींपैकी कुणीच सुधारत नाही पण त्या दोघांमध्ये द्वेष भावनाच वाढीस लागते. लोक तुलनेतून नाही तर प्रेरणेतून सुधारतात. तुलनाबाज लोकांचा हेतू एकच असतो - दोन्ही व्यक्तींची तुलना करून त्या दोघांवर अंकुश ठेवणे.

201.    आपण सर्वजण म्हणजे निसर्ग, प्राणी, पक्षी आणि मानव हे सगळे त्या सर्वशक्तिमान परमात्म्याचे अंश आहोत! लक्षात ठेवा की मृत्यूनंतर आपलं शरीर नष्ट होतं, पण आत्मा नाही. आत्मा अमर असतो! - भगवदगीता

202.    आत्म्याकडून परमात्म्याकडे, प्रदर्शनाकडून दर्शनाकडे, सकाम कर्माकडून निष्काम कर्माकडे, स्वार्थाकडून परमार्थाकडे आणि वासनेकडून उपासनेकडे जाणे हेच आयुष्याचे ध्येय असायला हवे!- भगवदगीता

203.    जीवनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे, जीवनातील सगळ्या समस्यांचे समाधान, जीवनातील सगळ्या शंकांना पूर्णविराम आणि जीवनातील सगळ्या भयांची समाप्ती जेथे होते ते ठिकाण म्हणजे भगवदगीता होय.

204.    अंतिम समयी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "एखाद्याचे या जगातील ठरलेले विहीत कार्य संपुष्टात आले की त्याने एखादा जास्तीचा क्षणसुद्धा पृथ्वीवर घालवला तर निसर्गाचे संतुलन बिघडते. या जगात प्रत्येक जण एका विशिष्ट कार्यासाठी आलेला असतो. ते पूर्ण झाले की त्याची जायची वेळ येत असते. माझेही धर्मस्थापनेचे कार्य आता झालेले असल्याने मी एक क्षण सुद्धा आता पृथ्वीवर राहाणे योग्य नाही. मला जायलाच हवे". आधार: सोनी टिव्ही सिरियल - सुर्यपूत्र कर्ण: दिनांक - 5 ऑगस्ट 2016) [राम अवतारात रामाने वालीला बाणाने मारले होते. त्याच वालीने पुनर्जन्म घेऊन श्रीकृष्णाला अनावधानाने तळपायाला बाण मारला होता. त्यात श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता (अवतार संपला)] - भगवदगीता

205.    श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगीतली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही  असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो.

206.    दोन व्यक्तीत कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तर ती लागत नसते, आग लावणाराच जळून राख होतो ...!

207.    कधीही संतापू नका.  कारण लोखंड थंड असते तेव्हा कणखर आणि कडक असते. पण लाल झाले की त्याला लोक हवा तसा आकार देतात.

208.    "नवर्‍याला ‘अहो’ आणि बायकोला ‘अगं’ म्हणणार्‍या जोडप्यांमध्ये कायम एक असमानता राहते. आपल्याकडे बाईला ती पुरुषापेक्षा सर्वार्थाने कमी आहे, कायम त्याच्यावर अवलंबून आहे, असं बजावण्यासाठी म्हणूनच अशा पद्धती रूढ करण्यात आल्या असाव्यात, असं माझं ठाम मत आहे. आपल्या रूढी-परंपरांचा मीही प्रचंड आदर करते पण जे निर्थक आणि असमानता निर्माण करणारं आहे ते सोडून देणंच योग्य! नवर्‍याबद्दलचा आदर ही दाखवण्याची नाही तर बाळगण्याची गोष्ट आहे!'- तृप्ती एकबोटे – देवरुखकर

209.    चांगल्या लोकांची एक कमजोरी असते कि ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला चांगलेच समजतात.

---------- (कलर्स टीव्ही - महाकाली सिरीयल डायलॉग)  ----------

210.    समस्येशी सामना करायला सुरुवात करणे ही समस्या सुटण्याची सुरुवात असते!

211.    एखाद्याकडून ज्ञान ऐकून ते दुसऱ्याला ऐकवणे याला फार तर आपण उपदेश असे नाव देऊ शकतो पण ते सत्य असेलच असे नाही!

212.    ते घर, खरं घर नव्हेच जेथे पुन्हा पुन्हा बेघर व्हायची भीती असते.

213.    ते प्रेम, खरं प्रेम नसतंच जे तर्काच्या आधारे टिकून आहे.

214.    जो फक्त आपल्याला जन्म देतो म्हणून त्याचा अधिकार आपल्यावर असण्यापेक्षा जो आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख देतो त्याचा आपल्यावर खरा अधिकार असतो.

215.    नदीला हे माहित असतं की समुद्रात गेल्यावर तिचे स्वत:चे अस्तित्व नष्ट होणार आहे, तरीही ती पर्वताच्या टोकापासून निघून दूर समुद्रात मिसळण्यासाठी मोठा प्रवास करते कारण तिला समुद्रामुळे एक नवी ओळख मिळणार असते!      

------------------

"धनंजय" च्या 2013 च्या दिवाळी अंकातील "असं घडू शकतं" या भयकथेत आलेले 8 विचार (लेखक : पुरुषोत्तम रामदासी)

216.    ज्या देहाचे चोचले पुरविले तो देह आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो. हे अंतिम सत्य माहित असूनही लोक याच देहाच्या सुखासाठी अविरत झटतात, लबाड्या करतात. शरीर वासनांच्या तृप्ततेसाठी वाट्टेल ते करतात.

217.    प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं. पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो.

218.    पापाच्या पैशातून पुण्याची खरेदी करता येत नाही.

219.    शंका फक्त शंकेलाच जन्म देते.

220.    ज्या समयी माणसाची सावली सुद्धा सोबत देत नाही ती वेळ असते बाराची. म्हणून तर आपण म्हणतो : एखाद्याचे बारा वाजले.

221.    दु:खात वाटेकरी नसतोच.

222.    ज्ञात जगापेक्षा अज्ञात जग फार फार मोठं आहे. अगदी आजच्या कॉम्प्युटर सारखं. त्यामाध्ये अगणित गोष्टी असतात. पण पासवर्ड वापरल्याशिवाय त्या दिसत नाहीत. तसेच सैतानी लोक षटकर्मातील अनेक मंत्र हे अज्ञात जगातल्या शक्तीशी संपर्क साधण्यासाठी वापरतात, जसे सामान्य माणूस प्रार्थनेद्वारे देवाशी कनेक्ट होतो, तसेच!!

२२२ सुपर सुविचार

Nimish Navneet Sonar
Chapters
२२२ सुपर सुविचार