Get it on Google Play
Download on the App Store

आमराईतील भूत

नमस्कार मित्रांनो मी राकेश मोरे राहणारं कर्जत(रायगड)

मी जेव्हा 10ची परीक्षा दिली हि तेंव्हाही गोष्ट आहे. आमची खूप मोठी आंब्यांची बाग आहे , पूर्वी रात्री आंब्यांच्या सिजन असताना रात्री पहारा ठेवण्यासाठी एक म्हातारा माणूस ठेवलेला होता पण ऱ्यांचं आजारानं निधन झालं मग माझे वडील आणि मोठा भाऊ रात्री पहारा ठेवण्यासाठी जात असत.

आमची आमराई (आंब्यांची बाग) गावाच्या बाहेर होती पण तेथे जाण्यासाठी डांबरी रोड होता. आंबे चोरण्याची घटना अनेकदा होत असते त्यामुळे तिथे जर कोणी असेल तर काही होत नाही.

एक दिवस भावाची पोलीस भरतीची परीक्षा असल्याने ते आदल्याच दिवशी अलिबाग ला गेले होते आणि आंब्यांची रात्री पहारा ठेवण्याची जवाबदारी माझ्यावर सोपविली होती . मला बाबांनी रात्री सोबत कोणाला तरी घेऊन जायला सांघितलं होत तस मी मित्र आकाश ला कॉल करून विचारलं तर तो तय्यार झालं.

दुपारीच तो माझ्या घरी आला , आकाश माझा खास मित्र तो हि माझ्याबरोबर 10 वीत सोबत होता. आम्ही 6 वाजता जेवण घेऊन आमराई कडे चालत निघालो.

आमराई च्या मध्यभागी एक पाण्यासाठी बोअरवेल ची खोली बांधलेली होती त्याच्या वरती पाण्याची टाकी हि होती त्या रूमच्या बाहेर दोन खाट होत्या त्यावर आम्ही बसलो आणि शाळेतल्या गप्पा सुरु झाला. हळू हळू अंधार होत चाललेला, अखेर पूर्ण अंधार झाला तसं-तसा रातकीडयांचा आवाज सुरु झाला. जेवणाची वेळ झाली मला तर खूप भूक लागली होती म्हणून मी आकाश ला म्हणालो आपण जेऊन घेऊयात तर तो म्हणाला चल पिकलेले आंबे पडले असतील ते आणून खाऊयात मग मी म्हणालो ठीक आहे चल जाऊया, आम्ही आमराईत आंबे जमा करीत होतो तसं आतून आवाज आलं "कोण आहे तिकडं, आंब चोरताना गावलात तर याद राखा" मी आणि आकाश थोड्या वेळासाठी स्तब्ध उभे राहिलो. आकाश मला म्हणाला कोणीतरी आहे तिकडे, मी म्हणालो चल तिकडे जाऊन पाहूया. पुन्हा तेच आवाज आला आवाज मोठ्या माणसाचा होता मी न घाबरता जोरात ओरडलो कोण आहे, तू कोण आहेस , पुन्हा काहीच आवाज आला नाही आम्ही पूर्ण आमराई शोधली पण कोणीच नव्हतं. पण कोणीतरी असल्याची आम्हाला जाणीव होत होती.

मग आम्ही रूम कडे गेलो,
आम्ही दोघेही थोडे घाबरलो होतो,

आता जेवायचं हे ठरवून डब्बा उघडला तोच आमच्या समोरून कोणीतरी धावत आमराई कडे धावत गेलं, आता आम्ही खूपच घाबरलो दोघांनाही घाम फुटला आम्ही आमराई कडे एकटक पाहायला लागलो तोच आम्ही बसलो होतो तेथील समोरचाच आंब्याचा झाड पूर्ण मुळापासून हलायला लागला असं एक एक करीत संपूर्ण आमराई तील झाडे हलायला लागली, खूप आवाज झाला आमचा तर जीव जायची वेळ आली , आकाश खूप घाबरला जोरात ओरडायला लागला 'वाचावा वाचावा', मला तर काय करावे काळत नव्हते अचानक सर्व थांबलं आणि आमराईतून कोणीतरी व्यक्ती चालत येताना दिसला , असा प्रकार पाहून तो व्यक्ती नसून भूत आहे याची जाणीव दोघांनाही झाली आम्ही तसंच पळत गावाकडे निघालो.

माझ्या घरी गेल्यावर सर्व झालेली घटना सांघितलं, आमची अवस्था पाहून त्यांचा आमच्या बोलण्यावर विश्वास बसलाच, घरच्यांनी गप झोपायला सांघितलं.

सकाळी उठलो आणि दिवसभर घरातच राहिलो आकाश त्याच्या घरी गेला होता.
रात्री बाबा आणि दादा अलिबाग वरून आले त्यांना मी घडलेलं सर्व घटना सांघितली.

बाबांनी आमच्या गावातील भागताला घेऊन आमराई कडे निघाले सोबत मी आणि दादा होतो, मी आकाश ला कॉल केला पण तो इतका घाबरला होता की तो यायला तयारच नाही झाला.
आम्ही आमराईत पोहोचलो आम्हाला पहिल्यांदा जेथे आवाज आला ती जागा भागताने विचारली, त्या जागी भागताने मिठाचे रिंगण घातले लिबु,अगरबत्ती, हळद-कुंकू, असं कायकाय साहित्य त्या रिंगणात ठेवलं आणि मग काही मंत्र म्हटले आणि डोळे बंद केले अचानक डोळे उघडून माझ्या बाबांना म्हणाला इथे एक आत्मा आहे, आपल्यालाच पाहते मी परत घाबरलो आता काय होणार याची उत्सुकता लागली होती.

भागताने बाबांना विचारलं हा बबन कोण, बाबा म्हणाले इथे काम करणाऱ्या म्हाताऱ्याच नाव.
भगत म्हणाला हे त्याचाच भूत आहे
तो त्याच काम मेल्यावरही विसरला नाही आजही त्याच काम करतोय,
आमराईत पहारा ठेवतोय तो,
बाबा म्हणाले मग काय करायचं आहे,
भागताने मंत्र म्हटले कुंकू लिंबूवर उडवलं आणि आमराई च्या दिशेनं फेकलं आणि विचारू लागला,
बबन काय पाहिजे तुला,इथून जाण्याचं काय घेणार
तसा तो लिंबू आमराई मधून फिरत फिरत परत त्या मिठाच्या रिंगणात आला
आम्हाला तर काय आवाज नाय आला पण भगत म्हणाला
त्याला एक विडी बंडल, तंबाकू पुडी आणि एक कोंबडा पाहिजे
बाबानी देतो म्हणाले आणि दुसऱ्याच दिवशी हे सर्व त्या रिंगणात नेऊन बाबानी ठेवलं
आता ही वार्ता गावात पसरली होती
त्या दिवसापासून तर गावातील कोणीही दिवसा हि त्या आमराईत जाण्याची हिम्मत करीत नसे त्यामुळे रात्री पहारा ठेवण्याचे बंद केले.
पण बाबा म्हणत होते की तो बबन आजही आपल्या आमराई चा सुरक्षा रक्षक म्हणून रात्री वावरतो.
यावरून मला एक गोष्ट कळली कि सर्वच भूत हे वाईट नसतात,
तरीही मी आजही परत कधी आमच्या आमराई मध्ये गेलो नाही.

तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:-राकेश मोरे.

टीप:-या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@#भुताच्या_गोष्टी