Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - नोव्हेंबर २१

एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला , आणि त्याला ‘ तुम्ही कुठले ? ’ असे विचारले , तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल . जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल , इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल ; तसेच दुसर्‍या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल , आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल . म्हणजे , मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात . तसे , मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे , त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच . पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत , जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते .

सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरत आहेत . आपण प्रथम अशी कल्पना केली की , श्रीमंतीमध्ये सुख आहे . त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही , तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे ? एकच वस्तू एकाला सुखरुप वाटते तर दुसर्‍याला दुःखरुप वाटते ; म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही , सुखरुप नाही किंवा दुःखरुपही नाही . जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते , ती उद्या तशी वाटेलच असे नाही . आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाहि स्थिर नाही . म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनादेखील खोटीच असली पाहिजे ; ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे ? जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो . ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो . आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी , नाती , वगैरे गोड लागत नाहीत . त्या वेळी आपल्याला चैनच पडत नाही . हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे . एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे . त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात . कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करु या ; भगवंत हा दाता आहे , त्राता आहे , सुख देणारा आहे , अशी कल्पना आपण करु या . त्यात खरे हित आहे , आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल . कल्पनेचे खरेखोटेपण हे अनुभवांती कळते ; म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे . अशा रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे . भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे . " अमुक एक वस्तू मजपाशी आहे आहे म्हणून मी सुखी आहे , " या वृत्तीमध्ये राम नसून , काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे , आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे . हेच परमार्थाचे खरे मर्म आहे .

ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - नोव्हेंबर १ भगवंत - नोव्हेंबर २ भगवंत - नोव्हेंबर ३ भगवंत - नोव्हेंबर ४ भगवंत - नोव्हेंबर ५ भगवंत - नोव्हेंबर ६ भगवंत - नोव्हेंबर ७ भगवंत - नोव्हेंबर ८ भगवंत - नोव्हेंबर ९ भगवंत - नोव्हेंबर १० भगवंत - नोव्हेंबर ११ भगवंत - नोव्हेंबर १२ भगवंत - नोव्हेंबर १३ भगवंत - नोव्हेंबर १४ भगवंत - नोव्हेंबर १५ भगवंत - नोव्हेंबर १६ भगवंत - नोव्हेंबर १७ भगवंत - नोव्हेंबर १८ भगवंत - नोव्हेंबर १९ भगवंत - नोव्हेंबर २० भगवंत - नोव्हेंबर २१ भगवंत - नोव्हेंबर २२ भगवंत - नोव्हेंबर २३ भगवंत - नोव्हेंबर २४ भगवंत - नोव्हेंबर २५ भगवंत - नोव्हेंबर २६ भगवंत - नोव्हेंबर २७ भगवंत - नोव्हेंबर २८ भगवंत - नोव्हेंबर २९ भगवंत - नोव्हेंबर ३०