Get it on Google Play
Download on the App Store

फेब्रुवारी २५ - नाम

इथून जाणार्‍या मंडळींना निरोप देताना मला फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आप्ल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखे वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही गरज लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कधी कुणी भोगली नसेल इतकी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी? मी जर काही केले असेल तर मी कधीच कुणाचे अंतकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा. जो जो कुणी मला भेटला, तो तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो; त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्माला आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचे असेल ते मारूतीरायाला सांगावे म्हणजे मला कळते. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुश्चितपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना मी कोण हे कळले नाही; पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण हे त्याहून कळले नाही. प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मी मात्र वागायचा तसाच वागेन; हे कसे शक्य आहे? नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याबद्दल खात्री बाळगा, आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या.

एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. 'मी नाम घेतो' हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षित्वाने वागा; हवे-नकोपण टाकून द्या; राम कर्ता ही भावना ठेवा; विषय मालकीने भोगा; आपला गुण भगवंताकडे लावा; लहान मूल होऊन देवाकडे जा़; रामाला आपले सुखदुःख सांगी; देहभोगाला कंटाळू नका; काळजी 'घ्या' पण काळजी 'करू' नका, आणि निर्भय बना, आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पाहा. 

ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास

स्तोत्रे
Chapters
फेब्रुवारी १ - नाम फेब्रुवारी २ - नाम फेब्रुवारी ३ - नाम फेब्रुवारी ४ - नाम फेब्रुवारी ५ - नाम फेब्रुवारी ६ - नाम फेब्रुवारी ७ - नाम फेब्रुवारी ८ - नाम फेब्रुवारी ९ - नाम फेब्रुवारी १० - नाम फेब्रुवारी ११ - नाम फेब्रुवारी १२ - नाम फेब्रुवारी १३ - नाम फेब्रुवारी १४ - नाम फेब्रुवारी १५ - नाम फेब्रुवारी १६ - नाम फेब्रुवारी १७ - नाम फेब्रुवारी १८ - नाम फेब्रुवारी १९ - नाम फेब्रुवारी २० - नाम फेब्रुवारी २१ - नाम फेब्रुवारी २२ - नाम फेब्रुवारी २३ - नाम फेब्रुवारी २४ - नाम फेब्रुवारी २५ - नाम फेब्रुवारी २६ - नाम फेब्रुवारी २७ - नाम फेब्रुवारी २८ - नाम फेब्रुवारी २९ - नाम