सासू सासरे - संग्रह २
२६
सासुरवासामंदी गेली कांकनं कोपराला
बया इच्यारते, काय जाचल लेकराला ?
२७
सासुरवास येवढा नका करु सासूबाई
इतका अन्याव झाला काई
२८
सासुरवास येवढा नका करु सासुबाई
चांदी आलीया सोन्यापायी
२९
सासुरवासनी, बस माझ्या तूं वसरी
तुझ्या शिणंची, माझी सई सासरी
३०
सासूचा सासुरवास, त्यांची निष्ठुर बोलनी
सोसावी माझे गंभीर मालनी
३१
सोईर्याचे बोल जसे मुरुमाचे खडे
बंधुजीचे बहिणीसाठी येणे घडे
३२
सासर्याच्या गोष्टी माह्यारी सांगु नये.
वडील बाप्पाजीचा जीव कातरी घालू नये
३३
सासरच्या गोष्टी , मी हृदय केली पेटी
आईबापाच्या नावासाठी
३४
सासुरवासनीला बोलतं सारं घर
हाई कैवारी तिचा दीर