Get it on Google Play
Download on the App Store

तृतीय मंत्र:

कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||>
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे | नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ||१२||>
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१३||>
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् | सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१४||>
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान्विन्देयं पुरुषानहम् ||१५||

हे कर्दम, तू माझ्यावर कृपा कर. तुझ्यामुळे लक्ष्मी पुत्रवती झाली आहे. कमळाच्या माळा धारण करणारी माता लक्ष्मी माझ्या कुळात स्थिर राहील असे कर. हे जलदेवतांनो, तुम्ही सात्विक, स्निग्ध, उपयुक्त आणि अभ्युदयकारी वस्तू उत्पन्न करा. हे चिक्लीत, तू माझ्या घरात आणि कुळात राहा. त्यामुळे माता लक्ष्मीही तुझ्याबरोबर राहील. हे जातवेद, पुष्करामध्ये राहाणारी, आर्द्र, कमळाच्या माळा परिधान करणारी, पिंगला, भक्तांना पुष्टी देणारी, आल्हाददायक आणि तेजस्वी लक्ष्मी मी बोलावित आहे. हे जातवेद, आर्द्र, कोमल, धर्मदंड धारण करणारी, जिने सुर्वणाची माळा परिधान केली आहे, जिची कान्ती सुर्वणासारखी आणि सूर्यासारखी तेजस्वी आहे अशी लक्ष्मी माझ्या घरात पाठव. हे जातवेद, अशा अक्षय लक्ष्मीला मी बोलावित आहे. त्यासाठी मला पुष्कळ गायी, दासदासी, सुवर्ण आणि पुरूष प्राप्त होवोत.