भूमिका
तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात. भारतात भूत-प्रेतांच्या गोष्टी वर्षानुवर्षे लोकांना रोमांचित करत आलेल्या आहेत, परंतु आपल्या देशात अनेक अशी ठिकाणे आहेत, जिथे केवळ गोष्टी नव्हेत तर प्रत्यक्षात भूते दिसतात. अशा एक दोन नव्हे तर अनेक जागा आहेत. ज्यापैकी काही शापाच्या प्रभावाने उजाड झाल्या आहेत, तर काही जागा आत्म्यांच्या मुळे लोकांना भयभीत करत आहेत. त्याच ठिकाणांशी आम्ही आपला थोडासा परिचय करून देणार आहोत.