क्वीन मेरी
पहिल्या महायुध्दानंतर व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला युध्दनौका ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. सुरवातीची काही वर्षे या कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. काही काळाने ब्रिटनने जर्मनीशी केलेल्या नाविक करारानुसार एका मर्यादेपर्यंत नौदल ठेवण्याची जर्मनीला परवानगी दिली! (हा करार करताना ब्रिटनने पहिल्या महायुध्दातील आपल्या सहकार्यांना एका शब्दाने कल्पना दिली नव्हती!). मात्रं, पुढेमागे जर्मन नौदल आपल्याला वरचढ होऊ नये या उद्देशाने ब्रिटननेही काही मोठ्या नौका बांधण्यास सुरवात केली. (त्यावेळी चेंबरलेनसाहेब पंतप्रधान झालेले नव्हते!).
१९२८ मध्ये क्लाईड नदीवरील गोदीत एका ७५००० टनाच्या जहाजाच्या बांधकामाला सुरवात झाली. त्याकाळातील प्रचंड मोठ्या जहाजांपैकी एक असलेल्या या जहाजाच्या बांधणीला सुमारे ३५ लाख पौंड खर्च आला होता. साडेतीन वर्षांनी हे जहाज बांधून पूर्ण झाल्यावर इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने नाव देण्यात आलं,,
क्वीन मेरी!