Android app on Google Play

 

दबंग धोंडू बाम (लवकर वाचा!)

 

मलईखा पोरा, अर्रर्रबास खान, मसल्स खान हे एका अज्ञात ठीकाणी बसलेले असतात-

मलईखा पोरा:"छैया छैया करून करून मी नाच नाच नाचून दमले गो बाई.मग मी माझे "होंट रसिले" केले आणि नाना, अन्या सोबत नाचले. मग मी नंतर हे बेबी, ते बेबी, घे बेबी, दे बेबी करून पाहीले. मग माझे हाऊस "फुल्ल" झाले. पण म्हणावेसे यश मिळत नाही आहे मला.काय करू मी? मला चित्रपटात फकस्त गाण्यातच आयटम रोल मिळतात. हिरॉईन म्हणून कुणीच घेत नाही."

अर्रर्रबास खान:"आरं आरं आता बास की. काय हे अभद्र बोलतेस! माझ्या डोस्क्यात भन्नाट आयडीया आहे. ती आपण प्रत्यक्षात उतरवू या."

मसल्स खान:"हॅल्लो ब्रदर! सांग ना मला सुद्धा ती आयडीया. मी पण पार्टनर मध्ये शरिराचे सगळे सिक्स पॅक अ‍ॅबचे पार्ट पार्ट दाखवले. "नर" असल्याचा फायदा घेवून मसल्स चे "पार्ट" दाखवून पार्टनर चित्रपट केला.
मग मी अनेकांना "वान्टेड" होतो. मैने प्यार क्यो कीया असा प्रश्न पडेपर्यंत मी चित्रपटांत काम करत राहीलो. मग मध्येच केस दोन्ही बाजूंनी कपाळावर आणले.तेरेच नाम.आता मला एका जबरदस्त हीटची गरज आहे.मी अगोदरच फीट आहे.फक्त एका हिट ची गरज आहे."

अर्रर्रबास खान:"हॅल्लो ब्रदर! ऐक माझी आयडीया! मला सुचली आहे एक भन्नाट स्टोरी. त्यात आहे भन्नाट मारामारी. भन्नाट "इमोसन्स". चित्रपटाच्या टायटलसाठी बोली भाषेतला एक शब्द सापडलाय मला- धोबंग.

मसल्स आणि मलईखा:धोबंग म्हणजे काय रे "भाऊ"?

अर्रर्रबास खान:"धोबंग म्हणजे प्रत्येकाला धो धो धुणारा माणूस.... खजीनी सारखा हा सुद्धा दणक्यात चालेल बघ. तशीच याक्शन टाकू आपण यात. थोडी वान्टेड ची याक्शन मिक्स करु."

तेवढ्यात इनोद खणना, खामोश कन्या, सिंपल कपडेघाला हे तिघे तिथे येतात, म्हणतातः
"आम्हालाही एका हीट्ची गरज आहे. पण तुमच्या आयडीयानुसार सगळं करूनही चित्रपट नाही चालला तर?"

मसल्स खान:"कामीर कान आहे ना स्तुती करायला. तो करेल स्तुती. आपल्या चित्रपटाची."

सिंपल कपडेघाला:"पण इतकंही करून चित्रपट नाही चालला तर? काहितरी वादग्रस्त असलेच पाहीजे. त्याशिवाय चित्रपट चालत नाहीत."

... तेवढ्यात तेथे धोंडू येतो.

धोंडू:"मी सांगतो. आपण एक गुप्त गंमत करार करु.
तुम्ही आमचा "धोंडू बाम" वापरत असालच.
त्याचा शब्द गाण्यात वापरा.
मग आम्ही आक्षेप घेवू.
म्हणजे तुमची जाहिरात होईल.
मग तुम्ही आम्हाला फुकटात मलई द्या म्हणजे मलईखा पोरा हीला आमच्या "धोंडू बाम" च्या जाहिरातीत फुकटात वापरू द्या. म्हणजे आमची जाहिरात होईल आणि तुमचाही चित्रपट हिट होईल.
कशी वाटली आयडीया?

... ही आयडीया सगळ्यांना पसंत पडते.

धोबंग सुरु होतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच मसल्स खान बँक चोरांना धोपाटण्याने धो धो धुतो. अगदी धोबंगासारखा.
इतका धुतो, एवढा धुतो की "धुणे" ही संकल्पना सुद्धा लाजून आंघोळ करून स्वतःचे केस धो धो धुते.

तर मग ते मार खावून पेंगलेले, काळे निळे झालेले त्रस्त गुंड म्हणतात :
"आम्हाला कमरेत दुखतंय. काय करू?"

तो पटापट धोंडू बाम त्यांना वाटतो.
"धोंडू बाम" वापरा ! पुन्हा मारामारीस सज्ज व्हा.

मग एकदा मसल्स खान चोरांचा पठलाग करता करता खामोश कन्या च्या घरात छपरावरून पडतो. खामोश कन्या ने लहानपणी त्याचा "खामोशी" पाहिलेला असल्याने ती त्याला समोर अचानक पाहून कायमची "खामोशश" होते.
मग तो तीला "धोंडू बाम" देतो.
पहिल्या प्रेमाची पहिली पेनकिलर भेट!

त्या गावातला सोन्या खूप मातला असतो. तो इनोद खणना च्या सख्ख्या आणि दुखर्‍या मुलात वैतुष्ट आणण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला यश न आल्याने "धोंडू बाम" लावतो. नंतर यश येते.

पण मग पुन्हा भावातले गैरसमज दूर होतात.

मातलेला सोन्या मुन्नी सोबत नाचतो.
मुन्नी म्हणजे मलाईखा ही आपल्या मादक शरिराची मुक्तहस्ते सगळ्या लोकांत उधळण करत करत नाचते. सोबत हातात "धोंडू बाम" असतो आणि ती गाण्यात अधून मधून शरिराला झेंडू बाम लावते. त्या "धोंडू बाम" ला सुद्धा मुन्नीच्या सगळ्या शरीराला स्पर्श केल्याचे समाधान लाभते.

तेवढ्यात मसल्स खान अचानक तेथे येवून अंगाला ४४० व्होल्टचा झटका आल्यासारखा नाचायला लागतो.
तो असा काही तिरपा तारपा विचित्र पद्धतीने आपल्या शरिराचे विविध मजबूत पार्ट इकडे तिकडे करून नाचतो की त्याला गाणे संपताच "धोंडू बाम" ची आख्खी बाटली लागते.

शेवटी सोन्या खूप मार खातो. मार खावून सूज येते. मग त्याच्या गालाला मुन्नी गालाला पुन्हा "धोंडू बाम" लावते.

धो धो धुतले जावून चित्रपट गृहातून बाहेर प्रेक्षक बाहेर पडतात.
दरवाज्या जवळ हसतमुखाने प्रत्येक प्रेक्षकाला मलईखा पोरा हिच्या नाजूक मुलायम हस्ते "धोंडू बाम" फुकट वाटण्यात येतो.
साक्षात मलईखा पोरा हिला "याची देही याची डोळा" तशाच "बदनाम" कपड्यांत समोर पाहून प्रेक्षक समाधानी होवून घरी जातात.
 

दबंग

Nimish Navneet Sonar
Chapters
दबंग धोंडू बाम (लवकर वाचा!)