Get it on Google Play
Download on the App Store

कामगिरी

कसोटी क्रिकेट

तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,

  1.     विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान
  2.     सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी सुनील गावसकरच्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये २००५ साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना नोंदवला.
  3.     सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा मोहम्मद अझहरुद्दीन (४८), कपिल देव (४७), इंजमाम उल-हक (४६) आणि वसिम अक्रम (४५) पेक्षा जास्त आहे.
  4.     सर्वात जलद १०००० धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम: हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम १९५ डावांमध्ये केला.
  5.     एकूण कसोटी धावांमध्ये पहिला क्रमांक .
  6.     सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: ५३.७९. ही सरासरी कोणत्याही ११,००० धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे.
  7.     सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
  8.     त्याच्या नावे ३७ कसोटी बळी आहेत (डिसेंबर १४, २००५).
  9.     दुसऱ्या क्रमांकाचा जलद ९,००० धावा करणारा फलंदाज. (ब्रायन लाराने ९००० धावा १७७ डावांमध्ये केल्या, सचिनने १७९ डावांमध्ये ती कामगिरी केली).
  10.     नोव्हेंबर १६, इ.स. २०१३ रोजी, आपली कारकीर्द सुरू केल्याच्या २४ वर्षे १ दिवसांनी तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

एकदिवसीय क्रिकेट

तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी:

  1.     सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम.
  2.     सर्वाधिक (५०) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम.
  3.     सर्वाधिक (८९ वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम.
  4.     सर्वाधिक धावा (मार्च २४, २०११ पर्यंत १८,००८ धावा).
  5.     सर्वाधिक शतके (४९).
  6.     पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे.
  7.     १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
  8.     एकदिवसीय सामन्यांमध्ये १४,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज.
  9.     १०० डांवांमध्ये ५० अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज.
  10.     १०० हून अधिक बळी (मार्च २४, २०११ पर्यंत १५४ बळी).
  11.     १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी (मार्च २४, २०११ पर्यंत).
  12.     भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली न्यू झीलँडविरुद्ध केलेल्या १८६ धावा)
  13.     एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३.
  14.     १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
  15.     १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत.
  16.     फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम.

विश्वचषक

  1.     विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा).
  2.     २००३ सालच्या विश्वचषकामध्ये मालिकावीर.
  3.     २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.

२३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.


आय.पी.एल.

तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून त्यांचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळतो. २००८च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली.


इतर

  1.     सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचाकडून धावचीत केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय १९९२ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला.
  2.     सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर क्रिकेट काउंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
  3.     विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही.